तन्मयी तुळशीदास बेहेरे
अनन्या मोठ्याने किंचाळली,“ओह्ह नो गेला… हा पण आउट ऑफ स्टॉक” त्या आवाजाने आई जागी झाली. ”अनू! रात्रीचे दोन वाजलेत. आता पुरे झालं मोबाईल आणि तुझं ऑनलाईन शॉपिंग. पैसे, डोळे आणि वेळेचा अपव्यय नुसता.” अनन्या रडकुंडीला आली, होती, ”आई बघ ना ग, एक ड्रेस आवडला कार्टमध्ये टाकला तर आऊट ऑफ स्टॉक.” आई ओरडलीच,”आधीचे चार रिटर्न केले ना? ड्रेस मध्ये डिफेक्ट, फिटिंग नाही… आता दिवाळी आठवड्यावर आली आहे?” “या दिवाळीला मला जुनाच ड्रेस घालायला लागणार बहुतेक.” आई यावर काही बोलली नाही आणि अनु झोपून गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…
“अनू चल! दिवाळी शॉपिंगसाठी मार्केटला” अनन्या वैतागली ”एवढ्या उन्हात? गर्दी असेल तिथे आणि घामाने भिजणार मी, ए आई त्यापेक्षा मॉल मध्ये चल.” “एसीसाठी वस्तू दुप्पट किमतीत विकत घ्यायच्या? आणि मॉलमध्ये ही गर्दी असतेच? अग… आमच्या वेळी मॉल आणि ऑनलाईन साईट्स नव्हत्या, सगळ्यांसाठी वर्षातून एकदाच दिवाळीला काय ती खरेदी करायची, पण मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळायच्या तेंव्हा चल सोबत.”
आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला
अनन्या एसी टॅक्सी मधून अनिच्छेनेच मार्केटपाशी उतरली. रस्ते माणसांनी भरून वाहत होते. मार्केटमध्ये आकाशकंदिलाचे सौम्य रंग, रांगोळीचे भडक रंग, तोरणांची चमचमते रंग, कपड्यांचे नानाविध रंग… सगळीकडेच रंगांचे साम्राज्य पसरले होते. वातावरणात अगरबत्त्या, उटणे, अत्तर, रांगोळ्यांचे रंग, पणत्यांचा मातीचा गंध असा संमिश्र सुगंध येत होता. अनन्या मात्र चेहेरे न्याहाळत होती काही उत्सुक, काही नापसंती दाखवणारे, काही आनंदी, काही गोंधळलेले. प्रत्येक चेहेऱ्याचे भाव वेगळे पण ध्येय एकच. “दिवाळीची खरेदी”. फेरीवाले बेम्बीच्या देठापासून ओरडत होते. “एकावर एक फ्री, कोणता पण घ्या” “सौ का दो, सौ का दो” काही लोक घासाघिशीचा जुना फॉर्मुला वापरून भाव विचारून पुढे जाण्याचा अभिनय करत होते, पण सरावलेले फेरीवाले ते, कोण परत येणार हे आधीच हेरून ठेवलं असल्यामुळे त्याला भीक घालत नव्हते. मग गिऱ्हाइक दोन पावलं पुढे गेल्यावर तोंड पाडून काउंटर ऑफर देत मागे बोलवत माझं पण नको आणि तुमचं पण नको असं म्हणत मधल्या किंमतीत सौदा करत होते, “कसा स्वस्तात घेतला” म्हणून विजयी मुद्रेने त्या गिऱ्हाईक झालेल्या ताई ड्रेस घेऊन बाहेर पडतात आणि तिथे फेरीवालाही “थोडा जास्तीचा सौदा झाल्यामुळे खूश”
आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…
अनन्याला हा लुटुपुटुचा खेळ कळला, आणि तिने हसून बाजूला पहिलं. तिथे डिझायनर साड्यांच्या स्टॉलवरच्या बायकांनी त्या विक्रेत्याला हैराण करून सोडलं होतं. पुढे लहान मुलांच्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात मागे कुठे तरी फेरीवाल्याचं फक्त मुंडकच दिसत होतं. चपलांच्या स्टॉलवर वाकून वाकून कंबरडं मोडलं तरी बायका हटत नव्हत्या. सगळीकडे नुसता गोंगाट, कल्ला आणि उत्साह भरला होता. ते खरेदीमग्न चेहेरे, ते आवाज, ते रंग, ते सुगंध ह्या सगळ्यामुळे दिवाळी आधीच दिवाळीचा माहोल तयार झाला होता. अनन्याने हे सगळं पहिल्यांदा अनुभवलं आणि तिला दिवाळी आधीच हा माहोल फारच आवडला.
आणखी वाचा : उपवस्त्र ते प्रतिष्ठितवस्त्र
या सगळ्या गजबजाटात तिची आई मात्र सराईतपणे चालली होती. अनन्याने आईकडे पाहिलं, आईचा चेहरा ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा. ती शांत होती कारण तिला माहीत होतं की तिला कुठे जायचंय आणि काय घ्यायचंय. आई एव्हाना रांगोळीवाल्या बाईकडे पोचली होती. “काय म्हणता आजी. नातं वाटत तुमची? ठिपक्यांचा कागद नको मला. हल्लीच्या मुलींना हे काही जमत नाही. तुम्ही मला लाल, हिरवा, पिवळा रंग द्या आणि हे रांगोळीचे पेन ही द्या.” आईने सगळं सामान कापडी पिशवीत कोंबलं आणि ती पिशवी अनन्याच्या हातात दिली. अनन्याला कापडी पिशवी जरा आऊटडेटेड वाटत होती पण आई पुढे तिचं काही चाललं नाही. आई आता तोरणं बघत होती “हे वसंतदादा आहेत ना ते स्वतःच सोल्डरिंग करून इलेकट्रीक तोरणं बनवतात. ह्यांच्याचकडचं तोरण गेली आठ वर्ष वापरलं आपण, चायनीज तोरणाएवढ्या व्हरायटी नसतील पण हमखास टिकाऊ आणि स्वतःच्या शहरात तयार झालेलं हे तोरण म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” आईचा हा बाणा तिला नवीन नव्हता.
आणखी वाचा : ‘ये लडकी बहुत आगे जाएगी!’
आता आई एका दिव्यांग मुलाकडे थांबली, ”राजू मला दोन डझन पणत्या दे पाहू.” अनन्याची प्रश्नार्थक नजर बघून आई म्हणाली “अग हे सगळे वर्षभर इथेच या रस्त्यावर काहीतरी विकत असतात म्हणून माझी ओळख आणि राजूच म्हणशील तर तो स्वतः पणत्या बनवतो आणि रंगवतो, बघ ना काय कला आहे हो ह्याच्या बोटात.” आई पुढे म्हणाली “अनू, आपली जशी दिवाळी तशी यांचीसुद्धा दिवाळीच, यांनाही नवे कपडे घ्यायचे असतील, ओवाळणी टाकायची असेल, फराळ करायचा असेल, आपल्याला काय शॉपिंग तर करायचंय. मग ऑनलाईन शॉपिंग करून अजून नको त्या चार गोष्टी आणण्यापेक्षा हवं तेवढचं आपल्या ओळखीच्या लोकांकडून घेतलं तर त्यांच्याही घरी दिवे लागतील.” अनन्या म्हणाली “म्हणजे तू समाजसेवा…” तिला मधेच थांबवत आई म्हणाली “समाजसेवा खूप मोठा शब्द आहे ग, एकमेकांच्या उपयोगी पडलो तरी खूप झालं.”
आणखी वाचा : घर, करिअर आणि मातृत्त्व… संतुलन सांभाळणं अशक्य नक्कीच नाही!
“आई पण माझं शॉपिंग?” अनन्याला मध्येच आठवलं. आईने तिला एका प्रदर्शनातच नेलं, देशभरातल्या कारागिरांच हस्तकलाप्रदर्शन होतं ते. इथे प्रत्येक राज्याचा स्टॉल होता. त्या त्या राज्याची कपड्यांची जी काही खासियत आहे ती तिथे उपलब्ध होती. आई ओरिसाच्या स्टॉलवर थांबली. “मला फोडा कुंभा साडी दाखवा” अनन्याला हे काहीतरी नवीन होतं ते ओळखून स्टॉलवरच्या विक्रेत्याबाई एक मस्त रंगसंगती असलेली साडी दाखवत बोलल्या, “कुंभ फोड म्हणजे मंदिराचा कळस” चक्क मराठी ऐकून अनन्या तिच ऐकू लागली, “ही साडी ओरिसामधील बुऱ्हाणपूर इथे होते. मलबार सिल्क आहे हे. हिला विणायला दोन विणकर दोन बाजूनं बसतात आणि विणत विणत मध्यापर्यंत येतात. ही एक साडी विणायला दोन महिने लागतात आणि हो या साडीच युनेस्कोमध्ये नामांकनसुद्धा झालं आहे. फोडा कुंभासोबत चंबा रुमाल, उदयपूरचे डंका भारत काम, लडाखचे थीमा कापड, आंध्र प्रदेशच्या सिद्ध पेट साड्या ह्यांचाही नामांकन झालं आहे.” “क्या बात, मी एक सेल्फी काढू का?” असं म्हणत अनन्याने ती साडी खांद्यावर ठेवून एक मस्त सेल्फी घेतला.
आणखी वाचा : सेवानिवृत्तीनंतर काय करू…
आई म्हणाली, “अंग ही रितिका त्रिपाठी माझी मैत्रीणच आहे, ओरिसाची अम्बॅसेडर पण”. रितिका पटकन म्हणाली “अगं महाराष्ट्राची पण, इथल्या पैठण्या मी ओरिसाला घेऊन जाते, या निमित्ताने पूर्व आणि पश्चिम भारताची सांस्कृतिक देवाणघेवाणही होते. फक्त साड्याच नाही तर हे सगळे कारागीर आपापल्या राज्याची संस्कृती परंपरा ह्या साड्यांसोबत घेऊन येतात. यातून पर्यटनालाही चालना मिळते.” ऑनलाइन खरेदीमुळे सांस्कृतिक आदान प्रदानाचं केवढ मोठ दालन आपण बंद करतो आणि किती कला उद्योगांना आपण मुकतो हे अनन्याला पटलं.
आणखी वाचा : तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?
अनन्या विचार करत पुढे आली, “फायनली मेरा वाला मिंट ग्रीन” अनन्या ते पिस्ता कलरचे ड्रेस मटेरियल न्याहाळत राहिली. त्यावरच्या नाजूक जरीच्या बुट्ट्या आणि जरीच्या छोट्याशा किनारीमुळे ते खूपच मोहक दिसत होते. मागून आई म्हणाली “हे रॉयल आहे बरं का, हातमागावर विणलेलं हे महेश्वरी वस्त्र, इंदौरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची महेश्वर ही राजधानी. इथल्या वस्त्रउद्योगाला चालना मिळण्यासाठी त्यांनी सुरत, माळवा, हैद्राबाद येथून कुशल कारागीर आणून राजघराण्यातील व्यक्तींसाठी आणि पाहुण्यांसाठी ह्या साड्या स्वतः विणुन घेतल्या. मग हीच महेश्वरी साडी मध्यप्रदेशची ओळख झाली.” त्या ड्रेस मटेरियलसोबत आजीसाठी आमसुली रंगाचं नऊवारी लुगडंसुद्धा आईने तिथूनच घेतलं. बिल करताना मात्र किंमत ऐकून अनन्या चरकली ”आई हे बघ ऑनलाईन किती कमी किमतीत मिळते हे ड्रेस मटेरियल?”
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : प्रेमाचे काचणारे बंध
“अग या हातमागावरच्या साड्या. या एका साडीला विणायला जो वेळ लागतो त्या वेळात मशीनवर त्याच्या कितीतरी पटीने साड्या तयार होतील. तू हात लावून बघ, किती बारीक काम आहे ते. या कष्टाचे मोल आहेत ते. शिवाय हा सिल्कमार्कसुद्धा त्या कापडाच्या अस्सल असण्याची खात्री देतो. थोडे जास्त पैसे देऊन का होईना आपण अस्सल माल विकत घेतो आणि आपल्या कारागिरांना प्रोत्साहन देतो ह्या सारखं दुसरं समाधान नाही. आणि बर का हा ड्रेस घालून तू एवढी रॉयल दिसशील ना. कोणाकडेच असा ड्रेस नसेल कारण हातमागावर एकासारख दुसर कापड विणलंच जात नाही.” अनन्याला आठवलं गेल्याच दिवाळीत एक महागडा ऑनलाईन कुर्ता तिने घेतला होता. तो घालून ती खुश होऊन कॉलेजमध्ये जाते तो काय तिथे आणखी दोन मुलींनी सेम कुर्ता घातला होता, त्यामुळे ती अख्खी दिवाळीभर हळहळली होती.
आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?
आईने आता मोर्चा वळवला बाबा आमटे यांनी सुरु केलेल्या आनंदवन ह्या कुष्टरोग्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या स्टॉलकडे. तिथे अनन्यानेच आजोबा आणि बाबांना खादीचा कुर्ता, जॅकेट्स, पंचे आणि रुमाल घेतले. अनन्याला हात लावल्यावर ते जरा जाडे भरडे वाटले. तेंव्हा आई म्हणाली “महात्मा गांधींनी स्वतः सूत कातून खादी वापरण्याचे धडे जनतेला घालून दिले. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभक्तीचे स्टेटस ठेऊन काय होणार? आपण ऑनलाइन खरेदी करून दुसऱ्या देशांच्या तुंबड्या भरतो त्यापेक्षा देशावर खरंच प्रेम असेल तर स्थानिक बाजारात जाऊन ह्या आपल्या मातीत बनणाऱ्या स्वदेशी वस्तू घेतल्या पाहिजेत. त्यातूनच आपल्या कला, आपले उद्योग, आपली संस्कृती आणि परंपरांच जतन होईल आणि माणसेही जोडली जातील.”
आणखी वाचा : स्तनपानाचे फायदे आई आणि बाळालाही!
एव्हाना संध्याकाळ झाली होती. रस्त्यावर दुतर्फा विक्रीसाठी लागलेल्या कंदिलांचा प्रकाश झिरपत होता. साध्या टॅक्सीत बसून भान हरपून अनन्या बाहेरचं दृश्य बघत होती आणि तिने प्रदर्शनात काढलेले सेल्फी रील सोशल मीडियावर “कॅन व्ही स्किप टू द गुड पार्ट” या गाण्यासोबत #लोकलदिवाळी करून पब्लिश केलं.
tanmayibehere@gmail.com