“आरती, तू अविनाश बरोबर परदेशात का जात नाहीस? तीन ते पाच वर्षं त्याला तिकडे राहावं लागणार आहे, असं तूच म्हणालीस ना. मुलांना घेऊन तूही त्याच्यासोबत जायला हवंस. तुझी तर खासगी नोकरी आहे त्यामुळं ती सोडायला काहीच हरकत नाही.” रोहिणीताई आपल्या नातीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या.

आरती आणि अविनाश यांनी आज सर्व नातेवाईकांसाठी गेट-टुगेदर ठेवलं होतं. अविनाशला त्याच्या कंपनीकडून परदेशात जाण्याची संधी मिळाली होती आणि पुढच्या आठ दिवसांतच तो भारतातून निघणार होता. सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं, पण त्याचं असं एकटं जाणं रोहिणीताईंना खटकतं होतं, परंतु आरती तिची बाजू आजीला पटवून देत होती. “आजी, माझी खासगी नोकरी असली तरी, ती मिळवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत आणि माझ्या नोकरीत मी समाधानी आहे. शिवाय मुलांना चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं आहे. त्यांचंही रुटीन व्यवस्थित चालू आहे. अविनाश त्याच्या कंपनीच्या प्रोजेक्टसाठी परदेशात चालला आहे. तो पुन्हा भारतात येणारच आहे, मग मी माझं सगळं सोडून त्याच्या मागे कशाला जायचं?”

How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव

हेही वाचा : अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

“ आरती, तुझ्या संसाराची मला काळजी वाटते गं. साता समुद्रापलीकडे राहणारा तुझा नवरा, तिथं कसा राहील? कसा वागेल? तो परत येईल का? असे असंख्य विचार माझ्या मनात येतात. मागच्या सोसायटीतील लिलाचा नवरा २ वर्षांसाठी म्हणून दुबईला गेला तो परत आलाच नाही. तिला दुबईला स्थायिक व्हायचं नव्हतं. झालं. संसार मोडला. आणि ती कमल ताईंची सून, मोठ्या हुद्यावर नोकरी करते. सतत दौऱ्यावर असायची. कुटुंबापासून बाहेर राहिली. एकटं राहायची सवय झाल्यावर तिला पुन्हा एकत्र कुटुंबात राहणं अवघड झालं. दोघांच्यात दुरावा आला. त्यांचंही लग्न फार काळ टिकलं नाही. अशी खूप उदाहरणं मी बघितली आहेत. असं वेगळं राहण्यानं भावनिक दुरावा निर्माण होतो. दोघांच्या नात्यातील खासगी नाजूक बंध कळत-नकळत तुटत जातात. आरती, अजूनही विचार कर. तू अविनाश सोबत परदेशात जा. तुझ्या संसाराची मला काळजी वाटते म्हणून तुला सांगते आहे.”

“आजी, सगळीच ‘लाँग डिस्टन्स’ मधील लग्न तुटतात, असं तुला म्हणायचं आहे का?अगं,आता परिस्थिती बदलली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या तर सतत बदल्या होत असतात. प्रत्येकवेळी विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन धावता येत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, जोडीदाराच्या करिअरसाठी ‘लाँग डिस्टन्स’ मध्ये राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो. एकमेकांच्याबद्दलचा विश्वास,जोडीदाराच्या कामाचं स्वरूप आणि त्याचं महत्व समजून घेण्याची प्रगल्भता दाखवली, की दूर अंतरावर राहूनही सहजीवनाचा आनंद घेता येतो. व्यक्ती दृष्टीआड झाली तरी मनाआड होत नाही.”

हेही वाचा : घटस्फोटाने कौटुंबिक हिंसाचार कायद्यातले अधिकार संपुष्टात येत नाहीत

“अगं, पण हा विरह, दुरावा स्वतःहून का ओढवून घ्यायचा? फक्त करिअर आणि पैशांसाठी?” “आजी, अगं, बदलत्या काळानुसार लग्नाची समीकरणं आणि पती-पत्नीच्या नात्याच्या जुन्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत. एकमेकांत विरघळून जाऊन सर्वस्वाचा त्याग करण्यापेक्षा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपूनही परस्परांवरचं प्रेम जिव्हाळा टिकवता येतो. पूर्वी सारखं गावाबाहेर अर्थार्जनासाठी गेलेल्या जोडीदाराची वर्षानुवर्षं गाठ होत नाही, त्याच्याशी बोलताच येत नाही, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळं सारं जग जवळ आलं आहे. मी आणि मुलं व्हीडिओ कॉल द्वारे अविनाशशी दररोज संपर्क साधू शकतो. एसएमएस, इमेल, चॅटिंग इत्यादींद्वारे आम्ही एकमेकांशी सतत संवाद करू शकतो. आता एकमेकांच्या पायात पाय घालून अडकून राहण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दोघांनाही निर्माण करता येणं सहज शक्य झालं आहे, फक्त दोघांनीही एकमेकांचा समंजस स्वीकार करणं महत्वाचं असतं.”

हेही वाचा : पर्यावरणरक्षणार्थ झाडं लावणाऱ्या चामी मुर्मू

“ मला तुमच्या नवीन पिढीचं गणितच कळत नाही. सेलफोन आणि त्या संगणकाच्या कुशीत शिरून एकमेकांच्या सहवासाचा आनंद कसा घेता येईल?” “आजी, अगं केवळ शरीरानं एकमेकांच्या सहवासात एकत्र राहणारी जोडपी मनानं एकत्र असतातच असं नाही, पण शरीरानं दूर राहूनही मनानं एकत्र येणाऱ्या जोडप्यांची नाती अधिक घट्ट असतात. एकमेकांना भेटण्याची ओढ आणि असोशी कायम टिकून राहते.” आरतीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर आजीनं आपल्या मनाची समजूत घालून घेतली आणि बदलत्या जीवनशैलीचा स्वीकार करायलाच हवा हे त्यांनाही पटलं. त्या नातीला म्हणाल्या, “तुमचं ‘लाँग डिस्टन्स’ नातं तुम्हांला कायम एकत्र ठेवो. हाच तुला आशीर्वाद देते.”
आजीचं बोलणं ऐकून आरतीही मनापासून हसली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)

Story img Loader