प्राची पाठक

‘आल्यागेल्याला लागतं’ म्हणून खूप जण ‘आल्या-गेल्याची’ कटलरी, क्रॉकरी वेगळीच ठेवतात. एका अर्थी ही चांगली गोष्ट आहे. आलेल्या व्यक्तीचा पाहुणचार करण्यासाठी घरातले सर्वोत्तम ते वापरणे! भारतात अनेक जणांची कथा ही कष्टातून वर आलेल्या, आर्थिक स्थैर्य हळूहळू मिळवत जाणाऱ्या लोकांची कथा असते. त्यामुळे, आहे त्यात काही गोष्टी काटकसरीने बाजूला काढून आल्यागेल्याला चांगले ते देणे, हे एक छान ‘जेश्चर’ आहे. परंतु, कधी कधी त्याचा अतिरेक होतो कळत नकळत. म्हणूनच आल्यागेल्यालाच केवळ चांगले ते काढून ठेवणे आणि एरवी मात्र फुटक्या-तुटक्या गोष्टींनी आपले दिवस व्यापून टाकणे, अशीही एक सवय अनेक मंडळींना लागते. आपण कायमच फुटक्या कपात चहा प्यायचा, फाटक्या चादरीवर झोपायचे आणि आल्यागेल्यासाठी मात्र ‘दोन तास ते दोन दिवसांसाठी’ सगळं भारीतलं वापरायचं, यालाही तसा अर्थ नाही! आपण आपल्यासाठीच तर कष्ट करतो ना! मग जे आपण आल्यागेल्यासाठी राखून ठेवलेलं असतं, त्यातल्या दर्जाचा काही हिस्सा आपल्याही दिमतीला जरूरच ठेवावा. आपलं रोजचं जगणं सुंदर करायचा तो एक प्रयत्न असू शकतो. आपल्यालाही फ्रेश वाटू शकतं चांगल्या गोष्टी वापरून. आपली आवडीनिवडीची पत सुधारत आणि उंचावत जाऊ शकते. घरातून बाहेर जाताना आपण चांगले कपडे घालून जातो. म्हणून घरात मात्र कसेही कापड विरलेले, फाटलेले कपडे घालून बसायची गरज नसते. आपल्या संपूर्ण अस्तित्वातच चांगल्या वस्तूंचा सुयोग्य वापर आपण आणू शकतो की! तसंच हेही.

Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

आणखी वाचा-भौतिकशास्त्रात नापास, ५३९ कंपन्यांनी नाकारली इंटर्नशिप, ती एक संधी अन्… पाण्यावर उडणारी बोट बनवणारी भारतीय तरुणी

तर, घरोघरी या कटलरी आणि क्रॉकरीच्या बॉक्सेसचा साठाच माळ्यांवर, कपाटांमध्ये करून ठेवलेला असतो. काही जण तर शोकेसेसमध्येसुद्धा हे आयटम्स सजावट म्हणूनच ठेवून देतात. कोणी जगभरातल्या वेगवेगळ्या प्लेट्सचे आपापल्या भिंतीवर आकर्षक प्रदर्शनच मांडतात. ते असतात फक्त आल्यागेल्याला! पाहुणे येतात तेव्हाच या गोष्टी खाली येतात, वापरल्या जातात. पाहुणे जायचा अवकाश, की या गोष्टी परत बॉक्सेसमध्ये पॅक करून माळ्यावर, कपाटात जाऊन बसतात. कालांतराने आल्यागेल्यालासाठीही ते काढायचा कंटाळा येत जातो. ठेवणीतल्या म्हणून ठेवलेल्या वस्तू तशाच पडून राहतात. अनेकदा पडून पडून खराबसुद्धा होतात. त्यांचे रंग उडतात, कधी टवके पडतात. काही आयटम्स कमकुवत प्लॅस्टिकचे असतील, तर ते तडकत जातात. तरीही ते आपले माळे व्यापून असतात! कधी अचानक स्वच्छता मोहीम काढली, तर त्या सामान हलवाहलवीत काही गोष्टी तुटून जातात. त्यांचा पार भुगा झाल्याशिवाय या गोष्टी लोक टाकत नाही. भेट म्हणून ‘पास ऑन’ करायच्या किंवा आवर्जून विकत घेऊन भेट द्यायच्या वस्तूंच्या यादीमध्ये अशाच डिनर सेट्सचा, कपबशा सेट्सचा, इतर कटलरी वस्तूंचा मोठा वाटा असतो.

खूप शहरांत ‘टप्परवेअर’ म्हणून चौकाचौकात स्टॉल लागलेले असतात. ते विकणारे लोक ऑफिसांमध्येही जात असतात. एकानं घेतलं काही, की दुसऱ्यावर नाक मुरडत का होईना, त्यातल्यात्यात काहीतरी खरेदी करायचं प्रेशर येतं. त्यातूनसुद्धा असे विविध कंपन्यांचे डबेडुबे विकत घेतले जातात. ते मुळातच गरज ठरवून घेतलेले नसल्याने आधीचे डबेडुबे हद्दपार होत नाहीत, तोवर यांना विशेष ‘रोजगार’ मिळत नाही घरात! किंवा कधी यांच्यामुळे आधीच्या बऱ्या वस्तू बाजूला टाकून यांचा वापर सुरु होतो. म्हणजे दोन्हीकडून जास्तीच्या वस्तू साठत जातात, बाजूला पडतात आणि पडून राहतात. मायक्रोवेव्हला चालणारी भांडी म्हणून विविध मॉल्समध्ये वस्तूंचे ढीगच्या ढीग लागलेले असतात. तिथूनसुद्धा अनेक वस्तू ‘वापरू… वापरू’ करत आणून ठेवल्या जातात. मायक्रोवेव्हला चालणाऱ्या अनेक वस्तू विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या असतात. त्या कालांतरानं अतिशय खराब दिसू लागतात! त्यात भाजलेल्या, गरम केलेल्या गोष्टी जरा जळाल्या, की त्यांचे डाग त्या वस्तूंवर पडतात. तरीही आपण त्या तशाच वापरत राहतो. मग टूम निघते मायक्रोवेव्हसाठी प्लॅस्टिकच्या वस्तू टाकून काचेच्या वस्तू घ्यायची. म्हणजे सामानच सामान पुन्हा साठत जाते! आपला वापर नेमका किती आहे आणि काय काय आपल्याला अगदीच गरजेचं आहे, त्यानुसार स्वयंपाकघरात वस्तू येत नाहीत. त्या येतच राहतात सतत! कधी गिफ्ट रूपात, कधी आपली हौस म्हणून. काचेची भांडी हाताळायला, धुवायला विशेष लक्ष द्यावे लागते. मग आपल्याला हे जास्तीचे काम वाटायला लागते. परत त्या वस्तू बाजूला पडतात!

आणखी वाचा- भारत-पाकिस्तानमध्ये मैत्री सांधण्याचे आव्हान पेलतील का गीतिका श्रीवास्तव?

जसं काचेच्या भांड्यांचं होतं, तसंच एकेकदा लोक घरातली सर्व भांडी मातीची असावी, या मिशनवर काम करायला लागतात. हा सगळा व्याप सांभाळायला घरात कोणी हौशी असेल, तर ठीकच असते. परंतु, रोजच्या धबडग्यात, कामाच्या धावपळीत या वस्तू वापरायला तितका वेळ आपल्याला देता येतोच, असं नाही. मग अशी सर्व ‘समृद्ध अडगळ’ आपल्या घरात साचत जाते! नव्याने काही टूम निघाली की त्याही सर्व वस्तू आपल्याकडे येऊन पडतात. आल्यागेल्याला लागेल म्हणून, ते नकोशा गिफ्ट्स पास ऑन करणे, ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वस्तू विकत घेत जाणे, अशा अनेक प्रकारांतून आपण घराचे कप्पे कप्पे वस्तूच वस्तूंनी भरून ठेवतो. एकदा या सगळ्याची झाडाझडती घेऊनच टाकू आता!

prachi333@hotmail.com