Nirbhaya Squad : जून महिन्याची सुरुवातच गंभीर अशा बलात्कार, खून, छेडछाडीच्या घटनांनी झाली. आज महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे आहेत. पोलीस यंत्रणाही दक्ष आहे. तरीही महिलांवरती होणारे हल्ले कमी होत नाहीत. याचे एक कारण म्हणजे काही महिला या सुरक्षा व्यवस्थांबाबत अज्ञात आहेत. काही ‘इमर्जन्सी नंबर’ पोलिसांनी दिले आहेत. त्याच्याआधारे पोलिसांची नक्कीच मदत मिळते. यासाठी ‘निर्भया पथक’ म्हणजे काय, हे पथक कसे कार्य करते, संकटकाळात ‘इमर्जन्सी नंबर’ कोणते आहेत, हे माहीत असणे अत्यावश्यक आहे.

निर्भया पथक म्हणजे काय?

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकारणानंतर देशपातळीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाच्या अनेक राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने नेमन्यात आलेल्या महत्त्वाच्या पथकांपैकी एक म्हणजे निर्भया पथक. २६ जानेवारी, २०२२ मध्ये निर्भया पथकाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. निर्भया पथक हे पोलिसांचे एक उपपथक आहे. हे केवळ महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४x ७ कार्यरत असते. निर्भया पथकासाठी स्वतंत्र वाहन आणि पोलीस केंद्रांची निर्मिती करण्यात आली.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Trainee pilot girl died, Trainee pilot girl organ donation ,
प्रशिक्षणार्थी वैमानिक तरुणीमुळे सहा जणांना जीवदान
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

निर्भया पथक काम कसे करते?

हे पथक प्रो अ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारे आणि रिअ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचे काम करते. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आला आहे. या पथकाच्यावतीने पहिल्यांदा महिलांची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, बाजारपेठा, हॉस्टेल्स, सिनेमा हॉल, उद्याने या सगळ्यांचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन संशयास्पद व्यक्तींचा शोध घेते.

निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला पोलीस अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष हवालदारही असतात. त्यांची नेमणूक तीन महिन्यांकरिता केली जाते. निर्भया पथकाच्या टीमचं अस्तित्व नागरिकांकरिता गोपनीय ठेवण्यासाठी ही टीम खासगी वेशात वावरते. आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो. टीमबरोबर स्पाय कॅमेरा, स्मार्ट फोनचा कॅमेरा किंवा छुपा कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालींचे चित्रीकरण केले जाते आणि या चित्रीकरणाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिस स्टेशनला नेण्यात येते.

तसेच निर्भया पथक समाजजागृतीचे कार्यही करते. महिला आणि तरुणींना त्यांच्या सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देणे आणि पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत किंवा त्याचे परिणाम, शिक्षा याचे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात निर्भया पथकामार्फत प्रबोधनात्मक शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासाठी मार्गदर्शन शिबिरे, पोस्टर्स, वेब साईट, रेडियोवरील महिलांविषयक/ तरुणांचे कार्यक्रम, स्टीकर्स, शॉर्ट फिल्म्स, थिएटरमध्ये सिनेमा मध्यंतरावेळी जाहिरातीद्वारे प्रबोधन केले जाते.

‘इमर्जन्सी नंबर’ आणि ‘निर्भया पेटी’

निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिला १०३, १०० आणि १०९१ या टोल फ्री क्रमाकांचा वापर करु शकतात. व्हॉट्सॲप अथवा प्रतिसाद ऍप (Pratisad App) बरोबरच ई-मेल, फेसबुक या सोशल मीडियावरुनही पोलिसांशी संपर्क साधता येईल. तसेच पोस्टकार्ड आणि पत्राद्वारेही जवळच्या पोलीस स्थानकास कळवू शकतात.
१०३ या हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधल्यावर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना इंटरनेट डेटा सुविधांसह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिलांना तक्रारी देणे सोयीचे व्हावे, यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जातोय. निर्भया पथकाचं फेसबुक पेज असून, यावरही महिला तक्रारी नोंदवू शकतात.
मुंबई पोलिसांनी शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि मुलींच्या वसतिगृहात किंवा खासगी कार्यालयात तक्रारीसाठी ‘निर्भया तक्रार पेटी’ ठेवली आहे. तसेच शहरातील सार्वजनिक उद्याने, तलाव, विरूंगळा केंद्र अशा ठिकाणीसुद्धा तक्रार पेटी आहे.

अत्याचार थांबवण्यासाठी मानसिकता बदलणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच स्त्रियांनी सक्षम आणि आपल्या हक्कांविषयी सज्ञान असणे आवश्यक आहे. संशयास्पद कृती वाटल्यास, असुरक्षित वाटल्यास स्वतःसाठी किंवा पीडित महिलेसाठी निर्भया पथक सदैव तत्पर असते. फक्त महिलांनी या पथकाची मदत घेणे आवश्यक आहे.

Story img Loader