मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे लोकल ही जीवनवाहिनी आहे. परंतु, रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकलमधून पडून होणारे अपघातही लक्षणीय आहेत. पण कधी आपण विचार केला आहे का, की लोकलमधून पडून जखमी झालेल्यांचे, मृत्युमुखी पडलेल्यांचे पुढे काय होत असेल, हे मृतदेह कोण उचलत असेल ? हे मृतदेह उचलणारे एक महिला पथक माटुंगा रेल्वे स्थानकात कार्यरत आहे. जाणून घेऊया या महिला नक्की कसे कार्य करतात आणि या मृतदेहांचे पुढे काय होते ?

मृतदेह उचलणारी महिलांची संघटना

माटुंगा या उपनगरीय रेल्वे स्थानकावर जुलै २०१७ रोजी महिला संघाद्वारे एका संघटनेची स्थापना करण्यात आली. यांचा उद्देश मुंबईच्या लोकल या कोणत्याही अडथळ्याशिवाय, समस्येशिवाय धावतील, याची काळजी घेण्यात येईल.यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त प्रकाशित केले. त्यामध्ये स्टेशन मास्तर मीना आणि रुपाली यांनी आपल्या कामाबद्दल अधिक स्पष्टीकरण आणि अनुभव सांगितले आहेत.

Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ
guests at home, diwali celebration, tips
दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात…
no alt text set
स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका 
physical presence of couple not insist in mutual consent divorce madras high court
सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही
Nisargalipi, Indoor-outdoor tree design, tree,
निसर्गलिपी : इनडोअर – आऊटडोअर झाडांची रचना
Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
Shahnaz Habib who sees a different world through book Airplane Mode
‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब
Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!

हेही वाचा : चांगल्या पगाराची नोकरी सोडून आईला केली मदत, उभारला २०, ७०० कोटींचा व्यवसाय; जाणून घ्या तिच्याविषयी!
मीना यांनी सांगितले की, त्यांच्या टीममध्ये तिकीट तपासनीस, तिकीट बुकिंग क्लर्क, पॉइंट महिला, सफाई कामगार इत्यादींसह ४० कर्मचारी सदस्य आहेत. छशिमट आणि वाडीबंदर यार्ड सारख्या मोठ्या स्थानकांवर १०० पेक्षा जास्त पॉईंट पर्सन आहेत, तर शीव आणि माटुंगा सारख्या छोट्या स्थानकांमध्ये प्रत्येकी तीन आहेत. यांचा गणवेश लाल सूटवर अर्ध्या बाहीचा निळसर-राखाडी शर्ट, गळ्यात शिट्टी असा आहे. रुपाली, मीना यांच्यासह चंदा, सुरेखा वाघमारे, मंगिता यादव, सोनम वाघचोरे आणि राजश्री कदम या महिला कार्यरत आहे. हे सर्व प्रत्येकी आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम करतात. प्रत्येक दिवशी नवीन काय समस्या समोर असेल यांची त्यांना कल्पना नसते. रूळांवरील पॅडलॉक सारखी धातूची उपकरणे दुरुस्त कारण्यापासून साखळी खेचण्याच्या घटनांमध्ये उपस्थित राहणे, माटुंगा स्थानकाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या ट्रॅकवरून सुमारे २ किमी फेरी मारणे, जखमी प्रवाशांची काळजी घेणे, मृतदेह हटवणे, रुळांवर होणारी भांडणे सोडवणे अशी कामे करावी लागतात.

हेही वाचा : नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात ? सापांची उत्पत्ती कशी झाली ? काय आहेत आख्यायिका…
रुपाली यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. आठ तासांची शिफ्ट संपलेली होती. तेव्हा मीना यांना लोको पायलटचा फोन आला. शीव आणि माटुंगा स्थानकादरम्यान त्यांना मृतदेह दिसला होता. हा मृतदेह आणण्यासाठी रुपाली आणि चंदा कुमारी, दोन सफाई कामगार, रेल्वे पोलीस, रेल्वे संरक्षण दल आणि होमगार्ड रवाना झाले. ३० मिनिटांमध्ये ही टीम ऍम्ब्युलन्समध्ये मृतदेह घेऊन स्थानकात परत आली. स्थानकात परत आल्यावर रुपाली यांनी त्या मृतदेहाचे वर्णन सांगितले. लोकलमधून पडून डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा.
रुपाली यांनी त्यांच्या पाच वर्षातील अनुभवांबाबत सांगितले की, काहीवेळा शरीर असे रुळाच्या मध्ये पडलेले असते, तर कधीकधी त्या शरीराचे तुकडे झालेले असतात. असे आतापर्यंत ५० मृतदेह रुळावरून मी आणि आमच्या टीमने हटवले आहेत.

सर्वाधिक मृत्यू रेल्वेतून पडल्यामुळे किंवा ट्रेनमध्ये होणाऱ्या घुसाघुशीमुळे होतात. जुलै २०१७ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत माटुंगा स्थानकामध्ये १५५ मृत्यूची नोंद झाली आहे. काहीवेळा हमाल ही मृतदेह साफ करतात. परंतु, माटुंगा हे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्याचे स्थानक नाही. त्यामुळे इथे हमालांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिलाच हे काम करतात. ट्रॅक अडथळ्यांपासून लांब ठेवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असते.
रुपाली तिच्या नीडरपणाविषयी सांगताना म्हणाली की, मी कत्तलखाने असलेल्या भागात वाढले आहे. मृतदेह, त्यांचे अवशेष बघून मला काही वाटत नाही. अनेक लोक ट्रेनखाली आत्महत्या करतात, ट्रेनच्या धडकेने त्यांचा मृतदेह अक्षरश: विच्छिन्न होतो. ते पाहून कधीकधी माझे सहकारी आणि पोलिसांनाही उलट्या होतात. मी कत्तलखाने असलेल्या भागातून आल्यामुळे मला मृतदेह हाताळताना, बघताना काही वाटत नाही. अर्थात मृतदेह उचलणे हा माझ्या कामातील चांगला नसलेला, दुःखदायक भाग आहे.
स्टेशन मास्तर मीना यांनी माटुंगा रेल्वे स्थानकाला कुली मिळावेत अशी विनंती करणारे पत्रक लिहिलेले.ट्रॅकवरील मृतदेह हटवण्याचे काम ते कुली करतील, असा प्रयत्न होता. परंतु, २०० रुपयांत मृतदेह उचलण्यास कोण तयार होईल ? आणि हे नियमित काम नाही. त्यामुळे महिलांच्या या संघाने हे काम स्वीकारले आहे.
बिहारमधून स्थलांतरित झालेली चंदा म्हणते, मला या कामाची आधी सवय नव्हती. आम्हाला अपघाताच्या ठिकाणी कधीकधी एकट्याला जावे लागते. व्यसनी तसेच संतप्त जमावासोबत सामना करावा लागतो . केवळ मृतदेह उचलणे नाही, पर्यायाने लोकलचे मार्ग बदलावे लागतात. जखमी लोकांची मदत करावी लागते. मला माझ्या सहकाऱ्यांनी मानसिक ताकद दिली. आता मी तुटलेले अवयव, रक्त बघू शकते.
रुपाली यांनी या अनुभवाविषयी सांगितले की, “मला दोन वर्षांपूर्वीची एक घटना आठवते. आम्ही आरपीएफ जवानांसह सह घटनास्थळी पोहोचलो. शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते. हे तुकडे गोळा करण्याची मला गळ घातली. म्हणून मी एकट्याने ते तुकडे उचलले, कपड्यात बांधले आणि स्टेशनवर आणले. त्या दिवशी मी ट्रॅक साफ करत असताना एका सहकाऱ्याने व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ वरिष्ठांसोबत शेअर केला होता. मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी व्हिडिओ पाहिला आणि नंतर मला पुरस्कार दिला.

सर्वसामान्यतः व्यक्तींना रक्त, जखमा बघितल्या तरी त्रास होतो. इथे काही महिला ट्रेनमधून पडून जखमी झालेले, मृत्युमुखी पडलेले देह उचलतात. ट्रॅक साफ करतात आणि मुंबईची जीवनवाहिनी सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ही कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे.