भारतात गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवर कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’ने काही वर्षांपूर्वी एक आकडेवारी समोर आणली होती. त्यानुसार तीनपैकी एक महिला तिच्या आयुष्यात किमान एकदा तरी शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार किंवा दोन्ही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेली आहे. १८ ते १९ वयोगटातील विवाहित पती-पत्नी संबंधांमध्ये कोणा एकाला हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे म्हणतात की, प्रत्येक घरात घरगुती हिंसाचाराचा सामना करणारी एक व्यक्ती ही असतेच. तेव्हा आज आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि २० वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर प्रसन्न गेटू यांच्याबद्दल जाणून घेऊ.

डॉक्टर प्रसन्न गेटू :

इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर क्राइम प्रिव्हेन्शन ॲण्ड व्हिक्टिम केअरच्या सह-संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉक्टर प्रसन्न गेटू एक तज्ज्ञ आहेत. २००१ पासून त्यांनी हिंसाचाराच्या विरोधात मदत करण्यासाठी हेल्पलाइन (संस्था) सुरुवात केली. या क्षेत्रात ते २० वर्षांपासून काम करीत आहेत. १९९८ ते १९९९ मध्ये ते मद्रास विद्यापीठातून क्रिमिनॉलॉजी विभागात पीएच.डी. करीत होत्या. जपानच्या टोकिवा विद्यापीठात पीडितशास्त्रातील पोस्ट डॉक्टरेट डिप्लोमासाठी त्यांना निवडण्यात आले होते. ते ज्या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते, तो ‘वर्ल्ड सोसायटी ऑफ व्हिक्टिमोलॉजी’मार्फत घेतला जाणारा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा होता. डॉक्टर प्रसन्न गेटू नेहमीच गुन्हेगारांविषयीचा अभ्यास करायच्या. पण, इथे त्यांना पीडित व्यक्ती कोणत्या समस्यांना सामोऱ्या जातात याबद्दल अधिक शिकण्यास मिळाले, असे त्यांनी सांगितले आहे.

डॉक्टर प्रसन्न गेटू यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून स्थापन केलेल्या विविध पीडित साह्य केंद्रांनाही भेटी दिल्या. त्यानंतर भारतात परत आल्यानंतर त्यांनी विचार केला आणि चेन्नईमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पीडित मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या केंद्राच्या पहिल्या वर्षी क्रेडिट कार्ड फसवणूक वगळता त्यांच्याकडे आलेली सर्व प्रकरणे घरगुती हिंसाचाराची होती. पण, संकटात असलेल्या या महिलांसाठी निवारागृहे किंवा सामुदायिक आश्रयस्थान नव्हते आणि घरगुती हिंसाचारातून सोडवणारी कोणतीही विशेष सेवा नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सेवा तयार केल्या आहेत. डॉक्टर प्रसन्न गेटू या अमेरिकेला गेल्या. आणि त्यांनी या समस्यांवर अभ्यास केला. निवारागृहांमध्ये राहून ती कशी कार्य करतात हे पाहिले. तसेच डॉक्टरांनी स्वतःची हेल्पलाइन आणि निवारागृहे सुरू करण्यापूर्वी इतर संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांनाही भेट दिली.

हेही वाचा…ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या ‘हरप्रीत’ यांनी रचला इतिहास; सर्वांत वेगवान ट्रेक पूर्ण करण्याचा केला विक्रम…

‘इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर क्राइम प्रिव्हेन्शन ॲण्ड व्हिक्टिम केअर’द्वारे अशा महिला आणि व्यक्तींना सेवा प्रदान केली जाते; ज्यांना परस्पर हिंसाचाराचा सामना करावा लागतो. त्यामध्ये मुख्यतः घरगुती हिंसाचार, डेटिंग हिंसा किंवा नातेसंबंधातील हिंसाचार आदींचा समावेश असतो. २० वर्षांपूर्वी त्यांनी ही सेवा पुरविण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली होती. आता ते ध्वनी (Dhwani) नावाची राष्ट्रीय घरगुती हिंसाचार हॉटलाइन होस्ट करतात.

डॉक्टर गेटू यांच्या हेल्पलाइनवर कोणतीही व्यक्ती त्यांना कॉल करू शकते. स्त्रिया, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आदी अनेक जण इथे कॉल करतात आणि त्यांच्या समस्या सांगू शकतात. तसेच ही संस्था २४ तास तुमच्या समस्या ऐकणासाठी उपलब्ध असते. तसेच तुमच्यातील संवाद अतिशय गोपनीय असतो आणि संस्थादेखील समस्या ऐकून घेण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करते. हेल्पलाइनमध्ये आपत्कालीन किंवा दीर्घकालीन निवारा आहे. तसेच डॉक्टरांना संपूर्ण तमिळनाडू आणि इतर राज्यांतीलही काही भागांतून फोन येत आहेत. ते इतर राज्यांतील संस्थांबरोबर भागीदारीसुद्धा करतात.

आपण हे समजून घेतले पाहिजे की, हिंसाचार या गुन्ह्याला कोणतीही सीमा नसते. हे हिंसाचार कोणत्याही सामाजिक आर्थिक स्तरावर होऊ शकतात. कौटुंबिक हिंसाचार हा केवळ महिलांवरच होत नाही; तर पुरुषांनीही याबद्दल बोलायला हवे. कंपन्या, संस्था व कार्यालयीन जागा यांनीही या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो. केवळ पीडित व्यक्तीवरच नाही, तर संस्था आणि समुदायावरही अशा प्रकारचे हिंसाचार होत असतात. आता हा गुपित किंवा अंडर-द-कार्पेटचा मुद्दा राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असले पाहिजे की, तो अशा काळात किंवा अशा समस्यांना सामना करताना एकटा नाही; त्याला अशा संस्थांचा आणि हेल्पलाइनचा आधार उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor prasanna gettu who has been working last 20 plus year for helping domestic abuse survivors asp
Show comments