Who is Major Sita Shelke: केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन ३०० हून अधिक लोकांचा जीव गेला. तर शेकडो लोक बेपत्ता झाले. जखमींचीही संख्या मोठी आहे. भूस्खलन झाल्यानंतर मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू आहे. भारतीय लष्कराची एका तुकडीने १९० फुटांचा पूल तयार करून बचाव कार्यात मोलाची जबाबदारी पार पाडली. मद्रास इंजिनिअर ग्रुप (MEG) या पथकाने केवळ ३१ तासात मातीचा ढिगारा, मुळापासून उखडलेली झाडे बाजूला सारत वाहत्या नदीवर पूलचे निर्माण केले. या पथकात मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी आहेत. इतर जवानांप्रमाणेच त्या बचाव कार्यात न थकता, न थांबता अथक परिश्रम घेताना दिसत आहेत.

मला फक्त महिला समजू नका

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना सीता शेळके यांनी म्हटले, “मी एकमेव महिला अधिकारी येथे आहे, असे अजिबात समजू नका. मी सैनिक आहे. मी इथे भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करत आहे आणि मी या बचाव कार्यात काम करणाऱ्या पथकाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो.” मेजर सीता शेळके आणि त्यांच्या पथकाने विक्रमी वेळेत नदीवर पूल बांधल्यामुळे वायनाडमधील बचाव कार्याला वेग आला आहे. भूस्खलनग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे यामुळे सोपे झाले.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
Dr Pardeshi appointment as cms secretary revived old memories in Yavatmal and district is also expressing happiness
डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव होताच यवतमाळात आनंद
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू

बचाव कार्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, हा पूल बांधण्याचे श्रेय फक्त लष्कराचे नाही. तर इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. अनेक यंत्रणांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. मी स्थानिक यंत्रणा, राज्य सरकारचे अधिकारी आणि ठिकठिकाणाहून मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करते. विशेष करून आजूबाजूच्या ग्रामस्थांचे धन्यवाद मानले पाहीजेत, त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य अवघड होते.

हे वाचा >> Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं!

“माझे वरिष्ठ अधिकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले ते ब्रिगेडियर अजय सिंह ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आमच्या एमआयजी केंद्राचे ते कमांडरही आहेत. तसेच आमच्या पथकातील सर्व जवानांच्या सहकार्यामुळे आम्ही हा पूल इथे उभारू शकलो”, असेही सीता शेळके म्हणाल्या.

सदर पूल तयार करण्यासाठी मेजर सीता शेळके यांनी अथक परिश्रम केले. अनेक तासांपासून त्यांनी विश्रांती घेतली नाही, जेवण घेतले नाही. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वाहत्या नदीवर पूल उभा करणे हे तसे आव्हानात्मक काम होते, मात्र एमआयजीच्या जवानांनी आपले तांत्रिक कौशल्य पणाला लावून विक्रमी वेळेत पूल तयार केला.

हे ही वाचा >> ऑलिम्पिकमध्ये पोटातल्या बाळासह तलवारबाजी करणारी इजिप्तची नदा हाफेज

कोण आहेत सीता शेळके? (Who is Major Sita Ashok Shelke)

मेजर सीता अशोक शेळके या मुळच्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. लष्कराच्या बंगळुरूमधील ‘मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप’मधील ७० जवानांच्या पथकातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. मद्रास सॅपर्स या नावाने ओळख असलेले हे पथक लष्करासाठी पूल तयार करण्याचे काम करते. युद्धादरम्यान तात्पुरते रस्ते तयार करणे, भूसुरुंग शोधून तो नष्ट करणे, अशी कामे या पथकाकडून केली जातात.

तसेच नैसर्गिक आपत्ती आली असताना बचाव कार्यातही हे पथक योगदान देते. केरळमध्ये २०१८ साली आलेल्या पूरातही या पथकाने बचाव कार्य केले होते.

Story img Loader