साडी हा खरं तर प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. ‘माझ्याकडे नेसायला चांगली साडीच नाहीये,’ असं एवढंसं तोंड करून, हिरमुसून म्हणणाऱ्या कुठल्याही स्त्रीचं कपाट उघडलं, तर परीटघडीच्या, नीटनेटक्या ठेवलेल्या साड्यांची भली मोठी चळत डोळे वटारून पाहताना दिसेल! प्रत्येक साडीची स्वत:ची वेगळी आठवण असते, वेगळं महत्त्व असतं. त्यामुळे साड्या जुन्या झाल्या तरी सोडवत नाहीत. आठवणींची गाठोडी या साड्यांमध्ये बांधलेली असतात. याच साड्यांमध्ये एक चळत वेगवेगळ्या समारंभांत मिळालेल्या ‘मानाच्या’, आहेराच्या साड्यांचीही असते. या साड्या काही आपण स्वत: निवडलेल्या नसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा रंग, पोत आपल्या पसंतीचाच असेल असं नसतं. परिणामी पुष्कळदा या साड्या पडूनच राहतात. अगदी नव्याकोऱ्या. त्यातल्या खूपशा एकदाही नेसल्या जात नाहीत. पण याच आहेरी साड्या गरीब, गरजू स्त्रियांसाठी गेल्या काही वर्षांत ‘साडी बँक’च्या संकल्पनेच्या रूपात सोयीच्या ठरत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा