अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA)मध्ये गेल्या १३ वर्षांपासून काम करणारी भारतीय महिला अक्षता कृष्णमुर्ती यांनी इतिहास रचला आहे. डॉ. अक्षता कृष्णमूर्तीने तिचे बालपणीचे स्वप्न सत्यात बदलले आहे. मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक म्हणून तिच्या कारकिर्दीतील एक अतुलनीय कामगिरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षता नासाच्या त्या मोहिमेमध्ये सहभागी होती ज्यामध्ये अंतराळ संस्था मंगळ ग्रहावरील नमुने गोळा करत होती. या मोहिमे दरम्यान तिने मंगळ ग्रहावर रोव्हर चालवून एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. या मोहिमेंतर्गत गोळा केलेल्या सर्व नमुन्यांना पृथ्वीवर आणणार असल्याचे समजते.

हेही वाचा – सुपारीचे फळ कसे असते? राप्याने सुपारी कशी सोलतात? पाहा व्हायरल व्हिडीओ

अक्षताने इंस्टाग्रामवर आपला प्रवास जाणून घेऊन शेअर केला आहे. मी १३ वर्षांपासून अमेरिकेतील नासाबरोबर काम करू शकते. पृथ्वीवर आणि मंगळावर विज्ञान आणि रोबोटिक ऑपरेशन्सचे नेतृत्व करण्याच्या स्वप्नाशिवाय माझ्याकडे काहीही नव्हते. मला भेटलेले लोक म्हणाले की, “हे माझ्यासाठी शक्य नाही, म्हणून मी माझे क्षेत्र बदलावे. पण मी जिद्द सोडली नाही. आपले काम करत राहिले. पीएचडी पूर्ण केल्यानंतर मला नासामध्ये नोकरी मिळाली. काम करण्याचे असेल तर वेडेपणा असावा लागतो.

अक्षता सांगते की, “एनआयटीमधून पीएचडीची डीग्री घेतल्यानंतर नासामध्ये पूर्णवेळ काम करण्यापर्यंत माझ्यासाठई काहीही सोपे नव्हते, पण आज कित्येक वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेसाठी मी काम करते. कोणतेही स्वप्न अवघड नसते. स्वत:वर विश्वास ठेवा आणि प्रंचड मेहनत करा, तुम्हाल तुमचे यश नक्की मिळेल. माझे उद्देश्य दहा लाख लोकांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे.”

हेही वाचा – GPay वापरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? कोणतेही शुल्क न भरता कसा करावा रिचार्ज, जाणून घ्या खास ट्रिक

कोण आहे अक्षता कृष्णमुर्ती?
अक्षताने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिक्स आणि अॅस्ट्रोनॉटिक्समध्ये पीएचडी केली आहे. तिने NASA जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) येथे फ्लाइट सिस्टम इंजिनीअरिंग, छोटे उपग्रह, इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन, परफॉर्मन्स मॉडेलिंग, सायन्स डेटा प्रोसेसिंगचा व्यापक अनुभव आहे. अक्षताला नासाच्या अनेक मोहिमांसाठी तिच्या सेवांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr akshata krishnamurthy woman becomes first indian citizen to operate a rover on mars snk