प्रश्न : मधुमेह झालेल्या पुरुषांमधे लैंगिक दुर्बलतेची तक्रार असते असं म्हणतात, ते खरं आहे का? आणि खरं असल्यास नेमकं ते कसं व कधी होते, या मागचं शास्त्रीय स्पष्टीकरण द्यावं. मी एक ३४ वर्षांचा विवाहित पुरुष असून अलीकडेच मला मधुमेह झाल्याचं माझ्या रक्ततपासणीत निदर्शनास आलं. सध्या मला लैंगिक दुर्बलतेचा काहीही त्रास नाही. पुढे कधी काळी मधुमेहामुळे येणारी लैंगिक दुर्बलता टाळण्यासाठी काही उपाय आहेत का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा : मधुमेह : लक्षणे, चाचण्या व उपचार
उत्तर : मधुमेहाचा परिणाम शरीराच्या सर्व रक्तवाहिन्या व मज्जातंतूवर होतो. पुरुषाच्या शिश्नात, समागम करता येण्यास गरजेची असलेली ताठरता (erection) येण्यासाठी मज्जातंतू व रक्तवाहिन्या दोन्ही सशक्त व कार्यक्षम असणं गरजेचं असतं. मेंदूच्या तळाशी असलेल्या हायपोथलॅमस या भागामधे सेक्स सेंटर असतं. मनात लैंगिक भावना निर्माण होताच हायपोथलॅमसमधून मज्जातंतूंमार्फत जननेंद्रियाकडे संकेत पाठवले जाऊ लागतात. जननेंद्रियाकडे संकेत पोहोचताच शिश्नामधे रक्त भरत जाण्याची क्रिया जात सुरु होते. रक्त भरलं जाईल तितकं शिश्न ताठ होत जातं.
आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!
या प्रक्रियेमधे मधुमेह नक्की कसा अडथळा निर्माण करतो, हे आता समजून घेऊया. मधुमेहाचा परिणाम सर्व रक्तवाहिन्या व मज्जातंतूंवर होत असतो. शिश्न ताठ होण्याची पूर्ण प्रक्रियाच (neurovascular phenomenon) मज्जातंतू व रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याकारणाने साहजिकच मधुमेहाचा परिणाम शिश्नाच्या ताठ होण्यावर घडू शकतो. हा परिणाम अचानक मात्र घडत नाही. मधुमेहाची सुरुवात झाल्यानंतर लैंगिक क्षमतेवर असा परिणाम घडून येण्यासाठी काही अवधी जावा लागतो. आपल्याला मधुमेहाची सुरुवात झाली आहे, हेच जर व्यक्तीच्या ध्यानात आलं नसेल व त्यामुळे त्यासाठी लागणारी उपाययोजनाच जर व्यक्तीने केली नसेल; तर मात्र मधुमेह मज्जातंतू व रक्तवाहिन्यांवर सुप्तपणे आघात करत राहातो. या आघाताचे दुष्परिणाम व्यक्तीच्या ध्यानात येईपर्यंत अनेकवेळा खूप काळ जातो व व्यक्तीची लैंगिक क्षमता कमी होऊ लागते.
पण मधुमेहाचं निदान लवकर व योग्य वेळी केलं गेलं, तर मधुमेह आटोक्यात आणणं सोपं होतं व त्याचे शरीराच्या विविध संस्थावर होणारे दुष्परिणामही टाळता येऊ शकतात.
आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?
मधुमेहाचा परिणाम मज्जातंतूंवर झाल्यास त्याला neuropathy असं म्हणतात. मधुमेहामुळे होणाऱ्या न्युरोपॅथीमधे मज्जातंतूंवर जे परिणाम होतात ते बऱ्याचअंशी कायम स्वरूपाचे असतात. पण असं असलं तरी न्युरोपॅथी उद्भवण्याच्या सुरुवातीच्या काळात बी जीवनसत्त्वाचे (large doses of vitamin B complex) मोठे डोस रुग्णाला दिले तर त्याचा चांगला गुण येतो, हे निदर्शनास आलं आहे. असे डोस रुग्णाने स्वतःहून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. मधुमेहाचं निदान लवकर झालं व मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे योग्य असे उपचार वेळीच केले गेले, तर मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या लैंगिक तक्रारी टाळता येऊ शकतात.
आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?
लैंगिक दुर्बलतेचा त्रास
प्रश्न : मी ५६ वर्षांचा विवाहित पुरुष आहे. मला गेली १२ वर्ष मधुमेह आहे. गेली चार वर्ष मला लैंगिक दुर्बलतेचा त्रास होतो आहे. यावर काही इलाज आहे का?
उत्तर : मधुमेहामुळे लैंगिक दुर्बलता आलेल्या रुग्णांवर इलाज केला जाऊ शकतो. त्यासाठी वॅक्यूम डिवाइस (vacuum device) किंवा शिश्नामधे दिली जाणारी इंजेक्शन्स (Intracavernous injections) व अलीकडच्या काळात उदयास आलेलं वायग्रा (Sildenafil citrate) हे औषध वापरता येऊ शकतं. पण उपाय योजनांची निवड तज्ञ डॉक्टरांनी करावी लागते, रुग्णाने स्वत: नव्हे; हे मला इथे आवर्जून सांगावसं वाटतं. कारण, हे उपाय योग्य काळजी न घेता केल्यास ते हानीकारक अगदी प्राणघातकही ठरू शकतात. मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम (impaired circulation) झाल्यामुळे जर लैंगिक दुर्बलता आली असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी डॉप्लर तपासणी (doppler study) करून घ्यावी लागते. डॉप्लर तपासणीचा शोध लागण्याआधी शिश्नातील रक्तदाब व हातातील रक्तदाब यांच्या भागाकाराच्या संख्येवरून याचं निदान केलं जाई. शिश्नातील रक्तप्रवाह मधुमेहामुळे कमी झाला असल्यास त्यासाठी शंट (shunt) ऑपरेशन करण्याचा उपाय काही डॉक्टर सुचवतात. पश्चिमी देशांत अशी ऑपरेशन्स आता मोठ्या संख्येने होऊ लागली आहेत.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलींना वडिलांबद्दल आकर्षण वाटणारा ‘इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स’?
प्रश्न विचारा बेधडक
तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.