कतरीना कैफ

माझा जन्म हाँगकाँगचा. आम्ही सात बहिणी आणि एक भाऊ. मॉम आणि डॅड यांचा डिव्होर्स झाला. ते विभक्त झाले, तशी आयुष्याची परवड सुरू झाली. लवकरात लवकर स्वतःच्या पायांवर उभं राहणं गरजेचं होतं, कॉलेजमध्ये शिकत असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि मग कॉलेजमधून ‘ड्रॉप आऊट’ झाले. मॉडेलिंग करत असतानाच लंडनमध्ये कैझाद गुस्ताद या दिग्दर्शकाने मला त्याच्या ‘बूम’ सिनेमात संधी दिली. सिनेमाला जरी फारसं यश लाभलं नसलं तरी मला चित्रपट हळूहळू मिळत गेले, काही चित्रपट हातातून गेलेसुद्धा, कारण मला हिंदी भाषेचं ज्ञान नव्हतं; पण अक्षयकुमारबरोबरची माझी ‘ऑन स्क्रीन पेयर’ हिट झाली आणि माझ्या करियरला वेग मिळाला.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Ajit Pawar
Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

आणखी वाचा : हिवाळा आला, आहाराची वेळ पाळा

करियरमध्ये मी बिझी झाले आणि मग सलमान खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार अशा नायकांबरोबर माझं नाव जोडलं गेलं. अक्षयकुमार विवाहितच आहे त्यामुळे त्याच्याशी माझा विवाह हा प्रश्न निकालात निघाला. आयुष्यात लग्न हा गुंतागुंतीचा इश्यू होतोय असं लक्षात आल्यावर लग्न मी बॅकसीटवर ठेवलं आणि पुन्हा करिअरकडे अधिक गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून मी अखंडपणे काम करतेय, त्यातून कधी सवड घेतली नाही, जेव्हा लग्न व्हायचं असेल तेव्हा ते होईल, आता शांत राहू, असा विचार केला आणि कामात लक्ष केंद्रित केलं. पुढच्या टप्प्यावर अशा काही सुखद घटना घडत गेल्या, की माझाच माझ्यावर विश्वास बसत नाहीये. ‘मॅरेजेस आर मेड इन हेवन’ याची मात्र मला खात्री पटली आहे.

आणखी वाचा : वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

गेली ४-५ वर्षे आघाडीचा अभिनेता ठरलेल्या विकी कौशलला मी त्या वेळी कधीही प्रत्यक्ष भेटले नव्हते आणि त्याला ‘मसान’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळूनही माझ्या तो गावी नव्हता. दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याच्या ‘मनमर्जीया’ फिल्मची ट्रायल ठेवली होती. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू असे उत्तम कलावंत असूनही एका नवख्या अभिनेत्याने माझे लक्ष वेधून घेतलं, त्याच्या अभिनयाने मी भारावले! मी अनुरागला विचारलं, “हू इज धिस गाय?” अनुरागने अचंबित होत मला विकी कौशल नव्या पिढीचा कसा उत्तम परफॉर्मर आहे हे सांगितलं. विकीला मी तेव्हा प्रथम ऑनस्क्रीन पाहिलं. नंतर करण जोहरने मला त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कुणाबरोबर फिल्म करायला आवडेल, असं विचारलं. मला विकीचा ‘मनमर्जिया’ आठवला आणि मी करणला सांगितलं, “मला विकीबरोबर काम करायला आवडेल.”

आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!

विकी कौशल त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच माझा निस्सीम चाहता होता हे मला नंतर समजलं. ‘काश! मेरी शादी कतरीना से हो!’ अशी सुप्त इच्छा त्याने जवळच्या मित्राकडे व्यक्त केली होती. विकीपेक्षा मी वयाने आणि चित्रपटात अनुभवाने ज्येष्ठ आहे. आमच्यात तशी बरीच तफावत असल्याने आमचं लग्न होऊ शकतं, असा विचार करणंही मूर्खपणाचे आहे, असं त्याचे मित्र सांगत; पण का कुणास ठाऊक तो मात्र विश्वास बाळगून होता, अगर आप सच्चे दिल से किसी को चाहो तो कायनात भी उसे आपको मिला देती है! … याचा साक्षात्कार त्याला झाला.

आणखी वाचा : उपयुक्त : साडीवरचा पेटिकोट… क्षुल्लक नाही, फार महत्त्वाचा

एका शूटिंगनंतर विकीशी ओझरती भेट झाली. त्यानंतर विकीने मला फोन करून त्याच्या भावना व्यक्त केल्या. मी स्तब्ध झाले. कसं रिॲक्ट व्हावं सुचत नव्हतं. नंतर एका पुरस्कार कार्यक्रमात विकी कौशल अँकरिंग करत होता, मी स्टेजवर गेले असता त्याने गुगली टाकली, ‘‘शादियों का सीझन चल रहा है, आप विकी कौशल के साथ शादी क्यों नहीं कर लेती?’’ विकीचा हा प्रश्न सूचक होता, पण बहुतेकांना हा ‘मजाक’ करतोय असं वाटलं! मी फक्त “व्हॉट” म्हणत हा प्रश्न हसण्यावारी नेला! नंतर विकी आणि त्याच्या कुटुंबाकडून मला लग्नाची रीतसर मागणी घालण्यात आली. काही इंडस्ट्री फ्रेंड्सनी विकीबद्दल खूप चांगले मत व्यक्त केले आणि जी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते त्याच्याशी लग्न करावे, असाच सल्ला बडे-बुजुर्ग देतात. विकीला होकार देण्याआधी मी त्याला काही वेळा कॉफीसाठी भेटले. त्याचं माझ्यावर निस्सीम प्रेम आहे याची खात्री पटत गेली आणि दोन्ही कुटुंबांनी लग्नाला सहर्ष होकार दिला. प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांच्या घरी आमचा ‘रोका’ समारोह झाला आणि ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानमधील ‘सवाई माधोपूर’ येथे लग्न झालं.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

अभिनेता- अभिनेत्री वरचेवर एका किंवा अनेक सिनेमांसाठी एकत्र काम करतात, कामानिमित्ताने त्यांच्या भेटीगाठी होतात, सूर जुळतात आणि मग लग्न जुळते. माझा आणि विकीचा तसा काहीच संबंध नव्हता, पण तरीही लग्न झालं आणि आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी समाधानी आहोत… टच वूड !

आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

आमच्या लग्नानंतर मला हनिमून आणि एकत्र प्रवास, एकत्र क्वालिटी टाइम घालवावा, असं खूप वाटत होतं, पण श्रीराम राघवन याच्या ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगसाठी मला वृंदावनला आणि विकीला इंदूरला शूटिंगला जायचं होतं. आम्ही लग्नानंतर लगेच शूटिंगला पोहोचलो, पण एकमेकांना खूप ‘मिस’ केलं. विकीशी लग्न झाल्यांनतर प्रथमच ‘बैसाखी’ सण कसा असतो, तो कसा साजरा करतात हे मी पाहिलं. माझं बालपण अतिशय विस्कळीत, हलाखीत गेलं; पण विकीशी लग्न झाल्यापासून माझ्या जीवनात मानसिक स्थैर्य आलं… एक सुकून, ठंडक महसूस कर रही हूं मै! यापूर्वी अशी मानसिक शांतता मला कधीही लाभली नव्हती. गेली कित्येक वर्षे माझी चिडचिड वाढली होती, नैराश्य-मरगळ आली होती, पण हे सगळं जादूची कांडी फिरल्यासारखं आता अदृश्य झालं आहे.

आणखी वाचा : उपयुक्त : ‘बीबी क्रीम’ आणि ‘सीसी क्रीम’: फरक काय?

आमच्यात कसलीही ‘रिलेटिबिलिटी’ नसताना आम्ही कसे आकर्षित झालो एकमेकांकडे? अपोझिट अट्रॅक्टस् म्हणतात तसंच काहीसं झालं आमच्यात. विकी, खूप हॅपी गो लकी आहे. टेन्शन न घेणारा आहे, त्याच्या हसऱ्या स्वभावाने जग जिंकून घेणारा आहे. मी बारीकसारीक गोष्टींचे टेन्शन घेते, त्याचा स्ट्रेस येतो माझ्या मनावर. रात्री दचकून जागी होत असे मी, विचित्र स्वप्नं पडत. लग्नानंतर प्रथमच आता मला शांत गाढ झोप लागतेय. हा बदल मोठा आहे. जीवनातील सकारात्मकता वाढली आहे, भुट्टा (भाजलेले कणीस ) एकत्र खाण्यात किती मजा असते मला आता जाणवतंय…

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

लग्नानंतर मी प्रथम ‘करवा चौथ’ व्रत केले. विकीच्या आईने मला मी व्रत करणार का, असं प्रेमानं विचारलं, आणि मी त्यांना, ‘ऑफकोर्स!’ म्हटलं, आम्ही दोघींनी हे व्रत केलं अगदी पारंपरिक प्रथेप्रमाणे, चंद्राची पूजा केली आणि विकीनेही माझ्यासाठी हे व्रत ठेवलं आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र सांगता केली. इतकी वर्षे मी माझ्या सिनेमाच्या विश्वात ‘करवा चौथ’ पाहात होते, हे व्रत करण्यामागे भारतीय स्त्रियांची नेमकी काय भावना असते हे कधी समजले नव्हते, पण यंदा मात्र सगळ्या प्रथा, त्यामागची प्रेरणा खऱ्या अर्थाने माझ्या लक्षात आली.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक

माझ्या आणि विकीच्या संसाराची तशी ही सुरुवात आहे, दोघंही सतत शूटिंगमध्ये बिझी असतो, पण त्यातल्या त्यात वेळ काढून विकी माझ्या अवतीभवती असतो. अनेकदा विकीशी मी माझ्या भूतकाळाबद्दल बोलत राहते, पण त्याबद्दल कधीही तो उलट प्रश्न विचारत नाही, उलट त्याच्याशी माझ्या भावना शेअर केल्या की मलाच बरं वाटतं. तो मला समजून घेतो ही भावना माझ्यासाठी मोठी आहे. अगदी परवाची गोष्ट, माझ्या ‘मेरी ख्रिसमस’ फिल्ममध्ये दुसऱ्या दिवशी शूट होणारा तीन पानांचा एक सीन मी पाठ करत होते. तो इतका मोठा होता की, मला तो पाठच होत नव्हता कारण तो हिंदी भाषेत होता. इतक्यात विकीनं म्हटलं, “लाओ, मुझे दो! मी तुझी तयारी करवून घेतो.” त्याने अवघ्या १० मिनिटांत तो सीन मला परफॉर्म करून दाखवलाही. हे पाहून मी विकीला म्हटलं, ‘‘तुम्हारे साथ मै कोई फिल्म नहीं करुंगी विकी. मला जे सीन करण्यासाठी दोन पूर्ण दिवस लागतात ते तुझ्यासाठी १० मिनिटांचे काम आहे. माझा स्पीड आणि तुझा स्पीड यात जमीन आस्मानाचा फरक आहे.’’ असं म्हटल्यावर तो खो खो हसायला लागला . म्हणाला, ‘‘कॅट, पंजाबी सिखने से पहले हिंदी अच्छे से सीख लो.’’
विकी हा कौशल कुटुंबातील मोठा मुलगा, इंजिनीयरिंग पूर्ण करून अभिनयात आलेला, चाळीत जन्म होऊन नंतर श्रीमंती अनुभवत असताना त्याच्यातील माणुसकी हरवली नाहीये, उलट वाढलीये. विकीमधला साधेपणा मला नेहमीच जिंकून घेतो. स्वकष्टाने- स्वतःच्या अभिनयाने त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. त्याच्या घरी फक्त पंजाबी भाषा बोलली जाते, अक्षय कुमारबरोबर मी ज्या ७-८ फिल्म्स केल्या त्यामुळे त्याच्या सहवासात पंजाबी भाषा चांगली समजू लागली आहे. म्हणूनच विकीच्या घरी त्याची आई, विकी, वडील श्याम कौशल आणि धाकटा भाऊ सनी कौशल आपसात काय बोलत आहेत हे मला समजतं, आता मीही पंजाबी भाषा मी बोलायचा प्रयत्न करतेय.

आणखी वाचा : माता आणि स्तनपान

विकीची आई खूप प्रेमळ आहे, सनीशी माझी छान गट्टी जमली आहे. विकीचे वडील श्याम कौशल यांचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘जिनियस’ असा उल्लेख केला जातो. या कुटुंबानं मला आपलंसं केलं. माझी संस्कृती, माझा आहार यात काहीही साम्य नसतानाही आता मी विकीची संस्कृती, विकीच्या घरातील जेवण मला आवडू लागलं आहे. वेळेअभावी मी स्वयंपाक कधी शिकू शकले नाही. आता मात्र हळूहळू कुकिंग शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. विकीला टिपिकल पंजाबी फूड आलू गोबी पराठा, राजमा चावल, छोले-भटुरे आवडतात, मीदेखील हे पंजाबी फूड आता आवडीने खातेय. सिंदूर लावायला शिकलेय. मला आयुष्यात प्रथमच इतकं आनंदी, इतकं समाधानी पाहून माझी मम्मी, माझं कुटुंब खूश आहे. माझ्या अस्थिर जीवनाची घडी विकीच्या प्रेमाने स्थिर होते आहे… गृहिणी-पत्नी-सून या सगळ्या नात्यांचा खरा अर्थ मला उमजतोय.

Story img Loader