अपूर्वा घाईघाईने लिफ्टमध्ये शिरली, लिफ्टमध्ये वरच्या मजल्यावरचे आजोबा होते.
“काय अपूर्वा? कसली धावपळ चाललीय? पिहु कुठेय?” आजोबांनी जनरल चौकशी केली. अपूर्वाला सुरू व्हायला
तेवढंही पुरेसं होतं.
“धावपळ म्हणजे काका, उद्या टेस्ट आहे पिहुची. दुसरीत गेलीय आता, पण अभ्यासाचा जराही सिरीयसनेस नाही.
उद्या टेस्ट आहे, तरी नेहमीप्रमाणे दंगा चालू. आम्ही किती घाबरायचो टेस्टला. खेळ कुठून सुचायला? पण पिहु
निवांत. तिलाच बोलवायलाच चाललेय खाली.”
“तुला दुसरीत परीक्षेचं टेन्शन यायचं अपूर्वा? आठवतंय तुला? एवढं स्मरण असेल तर विशेष आहे.” आजोबा हसत
म्हणाले. “माझ्या आठवणीप्रमाणे, पिहुला मार्क तर चांगले असतात. मग तुला का एवढं दडपण? तेही दुसरीच्या
युनिट टेस्टचं?”
आणखी वाचा : बाई मी पतंग उडवित होते…
“तसं नाही, पण वेळच्या वेळी अभ्यासाची सवय असलेली बरी नाही का?”
“दुसरीत मुलांना खरंच किती कळत असतं? तुझ्या दुसरीत तुला किती कळत होतं? मला वाटतंय, की पिहुला
परीक्षेची भीती वाटत नाही याचाच तुला प्रॉब्लेम आहे.”
“म्हणजे काय? भीती वाटली नाही, तर अभ्यास सिरीयसली कसा होणार?” अपूर्वा म्हणाली.
“जास्त भीती वाटल्यावर लक्षात जास्त राहतं का? माझ्या मते तसं नसावं. मुलांना किती समजलंय ते कळण्यासाठी
परीक्षा असते, या वयात तर परीक्षा आणि मार्कांची भीती नकोच. तिला विषय समजलाय आणि साधारणपणे उत्तरं
देता येतायत एवढं पुष्कळ झालं सध्या.” आजोबा हसत म्हणाले आणि लिफ्टच्या बाहेर पडले. पिहु समोरच खेळत
होती.
“काय खेळताय पिहु ? उद्या तुझी टेस्ट आहे म्हणे. अभ्यास झालेला दिसतोय.”
“होऽ, झालाय की आजोबा. आईला ना, जाम टेन्शन आलंय. मागच्या टेस्टला पण टेन्शन आलेलं तिला.” आजोबांना
माहिती पुरवून पिहु पुन्हा खेळायला पळाली.
आणखी वाचा : नातेसंबंध: ऐक ना गं, सूनबाई!
मागून येणारी अपूर्वा ऐकतच राहिली होती. ‘आपली परीक्षा असली की आईला टेन्शन येतं.’ हे गृहीतच झालंय
पिहुसाठी? म्हणजे आपण तिच्या परीक्षेला इतकं टेन्शन घेतो? अपूर्वाने आठवून पाहिलं.
‘पिहुच्या प्रत्येक टेस्टच्या, परीक्षेच्या वेळी आपल्याला स्वत:चीच बारावीची परीक्षा असल्यासारखं दडपण येतं हे
खरंच आहे. आपण दुसरीत दडपण घ्यायचो का? नसेल. आठवत नाही. सातवी आठवीपासून मात्र परीक्षेला
घाबरण्याचा आपला पॅटर्न आठवतो. चांगलं येत असूनही का घाबरायचो आपण? मैत्रिणी घाबरायच्या म्हणून?
थोडंसं दडपण आल्यामुळे अभ्यासाला पुश मिळायचा हे खरंय, पण शांतपणे शिकलेलं आणि समजलेलंच नीट
लिहिता यायचं. प्रचंड भीती मनात घेऊन ऐनवेळी केलेलं लक्षात रहात नव्हतंच आपल्या. बरेचदा आठवायचं नाही
कारण भीतीला हँडल करण्यातच एनर्जी संपायची नाही का?’
आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या
पूर्वाला एकदम जाणवलं, पिहु अभ्यास संपवून खेळायला आलीय, तरीही आपली चिडचिड थांबत नाहीये. याचा
अर्थ, आपल्याला वाटायची तशी भीती तिलाही वाटली तरच ते बरोबर आहे असं आपण गृहीत धरतोय. आजोबांचं
म्हणणं खरंय. पिहु परीक्षेचं दडपण घेत नाहीये याचाच आपल्याला प्रॉब्लेम आहे. अपूर्वाला उलगडलंच एकदम.
असा अतिरेकी आटापिटा करूंन पिहुला परीक्षेला घाबरायला शिकवायचं, की तिचा सहजपणा टिकवायचा? ती जे
करतेय त्यावर थोडे प्रश्न विचारून समजलंय किती तेवढं पाहायचं, आवश्यक तिथे मदत करायची? की आपल्याही
नकळत बनलेला परीक्षेच्या वेळी पॅनिक होण्याचा पॅटर्न पिहुकडे पोहोचवायचा? हे पिहुला ठरवता येणारच नाहीये
कारण ती अजून लहान आहे. हा चॉइस तर आपलाच आहे.’
पिहुला हाक न मारताच अपूर्वा परत फिरली आता तिला एकदम हलकं वाटत होतं.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com