डॉ. लिली जोशी

लहान मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढत चालला आहे, ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात येतेय. एक वर्षाची बाळंसुद्धा ‘नर्सरी ऱ्हाईम्स’चे व्हिडिओ बघितल्याखेरीज जेवत नाहीत. घरात, हॉटेलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मुलांनी त्रास देऊ नये, म्हणून आता सरसकट त्यांच्या आयाच त्यांना मोबाईलवर व्हिडिओ लावून देतात. थोडी मोठी झाली नाहीत, तोच त्यांचे व्हिडिओ गेम्स सुरू होतात. बहुतेक गेम्समध्ये मुलं एवढी रममाण होतात, की त्यांना आजूबाजूचं भान राहात नाही.

Eating nutritious makhana kheer is beneficial for health
मखाण्याची पौष्टिक खीर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Ghee In Belly Button
Ghee In Belly Button: रात्री झोपताना बेंबीमध्ये तूप सोडल्याने होणारा फायदा डॉक्टरांनीच केला मान्य; तेल का वापरू नये?
sweating heat summer are you sweating more than others find your triggers
तुम्हाला इतरांपेक्षा जास्त घाम येतो का? हे कोणत्या आजाराचे कारण तर नाही ना? वाचा डॉक्टरांचे मत
White Or Brown Which Eggs Are Better For Taste
पांढऱ्या व तपकिरी अंड्यातील बलकाचा रंग का वेगळा असतो? गुणवत्तेवर काय परिणाम होतो? खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?
health first rare case of sexually transmitted fungal infection founds in new york know full details
लैंगिक संबंधांतून वेगाने पसरतोय ‘हा’ नवा दुर्मीळ आजार; कोणाला अधिक धोका? जाणून घ्या लक्षणे
What happens to the body if you have potatoes daily
तुम्हाला बटाटा भजी, फ्रेंच फ्राईज खायला आवडतात का? रोज बटाटा खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Why question the reliability of automated weather stations How true are their predictions
स्वयंचलित हवामान केंद्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का? त्यांचे अंदाज किती खरे?
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल

आणखी थोड्या मोठ्या मुलांना आता वाढदिवसाला आय पॅड मिळत आहेत. शाळेत अभ्यासासाठीच कॉम्प्युटर मिळत आहे. वर्गपाठ-गृहपाठ सर्रास कॉम्प्युटरवर केले जात आहेत. करोना महासाथीच्या तीन वर्षांत हा प्रकार आणखीच वाढला. शहरी उच्चभ्रू वस्त्यांच्या पलिकडे, मध्यमवर्गीय शाळांमध्ये, महापालिकांच्या शाळांमध्ये, ग्रामीण भागात सर्वत्र ‘ई-लर्निंग’ सुरू झालं. परिणामत: ज्या मुलांनी कधी मोबाईल हातळले नव्हते, त्यांच्याही हातात आता स्मार्ट फोन आहे.

आणखी वाचा-बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र! गर्भपातामुळे खचली, पण आता उभारला यशस्वी व्यवसाय

‘ऑनलाइन’ शाळांचे दिवस गेले, पण खूपच मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये त्यामुळे फार फरक पडलाय, असं दिसत नाही. उलट आता शुक्रवार संध्याकाळपासून रविवार रात्रीपर्यंत अखंड यज्ञ चालू असावा तसा मुलांच्या हातात कोणता ना कोणता इलेक्ट्रॉनिक स्क्रीन आला आहे.अवाजवी मोबाइल किंवा टी.व्ही. व्ह्यूइंगमुळे बैठेपणा वाढतो. शारीरिक हालचाल कमी होते. मैदानी खेळ, इतर ॲक्टिव्हिटीज् बंद होतात. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय, ही गोष्ट गेल्या काही वर्षांत डॉक्टर्स तळमळीनं सांगत आहेत.

शरीरात मेदाचा भाग किती असावा? मेदपेशी कधी आणि कशा वाढतात? जन्मापासून मूल १ वर्षाचं होईपर्यंत, त्यानंतर वयात येताना आणि तिसरा टप्पा म्हणजे स्त्रीची गर्भवती अवस्था. एकदा या पेशी निर्माण झाल्या की त्यांची संख्या कायम राहते. आपली जीवनशैली चुकीची असेल तर या पेशी मेदानं पुरेपूर भरतात, मोठ्या होतात. विशेषत: पोटाच्या आतल्या अवयवात हा मेद साचला की ‘भयंकर चांडाळचौकडी’- ‘द डेडली क्वार्टेट’ अशा गोष्टींची लागण माणसात दिसू लागते. ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर, जीवनमर्यादेवर, सुदृढतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो.

आणखी वाचा- भौतिकशास्त्रात नापास, ५३९ कंपन्यांनी नाकारली इंटर्नशिप, ती एक संधी अन्… पाण्यावर उडणारी बोट बनवणारी भारतीय तरुणी

या गोष्टी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तात वाढलेला मेद (कोलेस्टेरॉल), अंतर्गत इन्शुलिनला विरोध, हृदयविकाराची शक्यता आणि अजून खूप काही… या सर्व लक्षणसमूहाला ‘मेटॅबोलिक सिंड्रोम’ म्हटलं गेलं आणि त्याचा प्रादुर्भाव चाळीशीतल्या भारतीय पुरुषांमध्ये वेगाने होतोय. ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वी संशोधकांपुढे आणि एकंदर समाजापुढेही आली.

आज हा लेख लिहिण्याचं खास कारण म्हणजे आता अनेक बालरोगतज्ञ संशोधक मुलांच्या वाढत्या लठ्ठपणाबद्दल पाहण्या व संशोधन करत आहेत आणि त्यांना नेमक्या याच गोष्टी आता लहान मुलांच्यात आढळून येत आहेत. याचा थेट संबंध मुलांच्या चुकीच्या जीवनशैलीशी आहे. आणि तिचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘स्क्रीन टाइम’! बाकीच्या कारणांची चर्चा आपण करूच, पण आत्ता स्क्रीनटाइमबद्दल पालक काय करू शकतील हे थोडक्यात-

  • केवळ सोय म्हणून स्क्रीन आणि जेवण यांची सांगड घालू नका.
  • मुलांनी पळापळ, दंगा करणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी हे चालणार नसेल तिथे मुलांना नेऊच नका.
  • मुलांना अभ्यासाला बसवून तुम्ही घरात टी.व्ही. बघत बसू नका.
  • साप्ताहिक सुटीच्याच दिवशी मुलांना टी. व्ही. बघण्याची परवानगी द्या. पण या वेळेवरही बंधन असलं पाहिजे.
    जास्तीत जास्त २ तास. शाळा चालू असताना स्क्रीन (अभ्यासाव्यतिरिक्त) अजिबात नको.
  • मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्लासेसमध्ये घाला. कोणतेही खेळ, कुंग फू-कराटे, नृत्य किंवा वादन, बाइकिंग, रनिंग, जिमनॅस्टिक्स वगैरे. तुम्ही स्वत:ही शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह रहा. मुलांसाठी रोल मॉडेल बना.
  • मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा उपयोग शिक्षण किंवा काम यांसाठी असतो हे वारंवार मुलांना समजावून सांगा.

lokwomen.online@gmail.com