महिलांसाठी असं वातावरण हवं जिथे त्या मनापासून आनंद घेऊ शकतील, काही काळ सगळ्या चिंता विसरून रिलॅक्स होऊ शकतील.बंगळुरुमध्ये खास महिलांसाठी क्लब सुरू केला आहे. या क्लबमध्ये बाहेरच्या जगाचं कोणतंही अवास्तव दडपण महिलांवर येणार नाही असं वातावरण असेल. इथं नाचताना कोणीतरी आपल्याला बघतंय. आपल्या कपड्यांवरून कमेंट्स करतंय अशी भीती नाही, अशा प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या आहेत. डान्स, म्युझिक, अनलिमिटेड खाणं-पिणं तर इथं आहेच. पण नेल आर्टसारख्या खास महिलांसाठीच्या गोष्टीही इथं असतील. तासानुसार या क्लबमध्ये दर आकारण्यात येत आहेत.  या क्लबमध्ये वेटर, मॅनेजरपासून ते अगदी डीजेपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या महिलाच सांभाळत आहेत.

तुमच्या ‘गर्ल गँग’ बरोबर मजा-मस्ती करायला तुम्हालाही आवडत असेलच ना? अगदी सिनेमा-नाटक पाहण्यापासून ते हॉटेलिंग, नाईट आऊटस् आणि पिकनिक, ट्रेकिंग सगळं काही आपण आपल्या गर्ल गॅंगबरोबर एंन्जॉय करू शकतो. आपला थकवा, टेन्शन्स, ताणतणाव सगळं काही मैत्रीणींबरोबर असताना दूर पळतं. मैत्रीणींबरोबर पार्टी करायची असेल तर चांगली जागा तर हवीच; पण त्याचबरोबर ती जागा सुरक्षितही असणं सगळ्यांत महत्त्वाचं. खरं तर महिलांचं रिलॅक्स होण्यासाठी, मजा-मस्ती करण्यासाठी बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं तरीही फक्त महिलांसाठी अशा जागा भारतात तरी सापडणं अगदीच दुर्मिळ आहे. काहीवेळेस क्लब कास महिलांसाठी नाईट्स आयोजित करतात. पण बंगळुरूमध्ये खास महिलांसाठी असा क्लब सुरू झाला आहे. या क्लब्जमध्ये सबकुछ महिलाच आहेत. म्हणजे ग्राहक म्हणून येणाऱ्या महिलांबरोबरच हा क्लब चालवणाऱ्याही महिला आहेत. खास आपल्या गर्ल गँगबरोबर एखाद्या संध्याकाळी छानपैकी ड्रिंक्स आणि छानसं संगीत असं एन्जॉय करायचं असेल तर ही जागा परफेक्ट आहे. ‘Miss and Mrs’ असं या क्लबचं नाव आहे. तिथे जाऊन आलेल्या एका तरूणीनं या क्लबबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या क्लबमध्ये पुरुषांना प्रवेशबंदी आहे. अशाप्रकारे खास महिलांसाठी म्हणून सुरू करण्यात आलेला हा भारतातील पहिलाच नाईट क्लब असल्याची माहिती आहे.

आठवडाभर जीव तोडून मेहनत केल्यानंतर वीकएंडला कुठेतरी मस्त भटकंती किंवा रिलॅक्स होण्यासाठी जाणं आताच्या पिढीमध्ये नवीन राहिलेलं नाही. क्लब्जमध्ये येणाऱ्या महिला, तरूणींची संख्याही त्यामुळे वाढली आहे. पण त्यांच्यासाठी तितकी सुरक्षितता असते का? किंवा अशा ठिकाणी जे गैरप्रकार घडतात त्यांना आळा घालण्यासाठी काय केलं जातं? असे प्रश्न आहेतच. त्यावर बंगळुरूतला हा क्लब उत्तर असू शकतो. कारण या क्लबमध्ये सगळ्या महिलाच असल्याने छेडछाडीसारखे प्रकार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा क्लब महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. सध्याच्या पिढीचे आवडते स्नॅक्स म्हणजे अगदी पिझ्झा, पास्तापासून ते त्यांच्या आवडीच्या ड्रिंक्सपर्यंत… आणि तेही अमर्याद… इथं सगळंकाही आहे. त्याचबरोबर लाईव्ह डीजे आणि साजेसं लायटिंग हीदेखील या क्लबची वैशिष्ट्ये आहेत. बंगळुरुच्या बाणेरघट्टा रोडवर हा क्लब सुरू झाला आहे. दीपांशी सिंग या तरूणीनं या क्लबबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावर काहीजणांनी विरोधी कमेंट्सही टाकल्या आहेत.

‘खास महिलांसाठी अशा क्लबची गरजच काय?’ पासून ते ‘असे क्लब समाजात चुकीचा पायंडा पाडतात’ अशा प्रतिक्रिया काहीजणांनी व्यक्त केल्या आहेत. याउलट ‘असे क्लब ही काळाची गरज आहे. मुलींचं/ महिलांना त्यांचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी अशा जागा हव्यातच’ अशाही प्रतिक्रिया आहेत. मुळात हीच तर या क्लबमागची संकल्पना आहे. एकीकडे आपण प्रत्येक गोष्टीत स्त्री आणि पुरूष समान असल्याचं सतत म्हणत असतो. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. कोणतंही क्षेत्रं असं नाही की जिथे महिला काम करत नाहीत. मग तरीही फक्त महिलांसाठी असा क्लबची किंवा अशा जागांचीच गरज का भासते? आपल्या समाजात महिलांवरच जास्त बंधनं असतात.

अगदी कपड्यांपासून ते देहबोली, हसण्या-बोलण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवरून महिलांना जज केलं जातं, त्यामुळे महिलांसाठी असं वातावरण हवं जिथे त्या मनापासून आनंद घेऊ शकतील, काही काळ सगळ्या चिंता विसरून रिलॅक्स होऊ शकतील. या क्लबमध्ये बाहेरच्या जगाचं कोणतंही अवास्तव दडपण महिलांवर येणार नाही असं वातावरण असेल. इथं नाचताना कोणीतरी आपल्याला बघतंय. आपल्या कपड्यांवरून कमेंट्स करतंय अशी भीती नाही, अशा प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या आहेत. डान्स, म्युझिक, अनलिमिटेड खाणं-पिणं तर इथं आहेच. पण नेल आर्टसारख्या खास महिलांसाठीच्या गोष्टीही इथं असतील. तासानुसार या क्लबमध्ये दर आकारण्यात येत आहेत.  या क्लबमध्ये वेटर, मॅनेजरपासून ते अगदी डीजेपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या महिलाच सांभाळत आहेत. महानगरांमध्ये नाईट लाईफ हा आता तरुणांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे ‘‘Miss and Mrs’ हा क्लब सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader