वीणा पाटील

मेन्टॉरिंग म्हणजे शिकलेलं मनात रुजवणं आणि त्यातून शहाणं होत जाणं, संपन्न होत जाणं. व्यक्तिशः आणि संस्थात्मकरीत्यासुद्धा. कसं शक्य होतं हे? संस्थेतल्या माणसांमध्ये किंवा आपल्या सभोवतालच्या माणसांमध्ये आपण सकस विचारांचं धन पेरू शकलो तर प्रत्येकाचंच आयुष्य समृद्ध होत जातं, खरं ना?

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

आणखी वाचा : तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…

मग मी हे असे सकस विचार इतरांमध्ये पेरण्यापूर्वी, मी स्वतः ते व्यक्ती, पुस्तकं, चित्रपट, व्याख्यानं, आमचे पर्यटक, अनाहूत क्षण आणि अगदी आधुनिक तंत्रज्ञान व संघर्षमय परिस्थिती या सगळ्यांतून टिपले आणि त्यांनीच मला वैचारिकदृष्ट्या सक्षम, संपन्न, आणि सकारात्मक केलं. अहो, आपण डिप्रेशनमध्ये जायचं ठरवलं तर काही क्षणसुद्धा पुरतात. पण आयुष्य हसत हसत जगायचं ठरवलं, तर आयुष्यातल्या प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी हे सकस विचार आपल्याला खंबीर साथ देत राहतात.

आणखी वाचा : “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

अलीकडेच मी एक चित्रपट पाहिला. ‘Saving Mr. Banks’ ब्रिटिश लेखिका पॅमेला ट्रॅव्हर्सचा ‘मॅरी पॉपिंन्स’ हा एक उच्च दर्जाचा महाकाव्य ठरलेला चित्रपट कसा तयार झाला, त्यावरची ही फिल्म. वॉल्ट डिस्नेला तिच्या पुस्तकावर ही फिल्म करायची होती. त्यासाठी वॉल्ट डिस्नेने या ब्रिटिश लेखिकेचा अठरा वर्षं पाठपुरावा केला, पण ती काही त्याला चित्रपटाचे हक्क देत नव्हती. शेवटी त्याने तिच्या नकाराचं खरं कारण शोधलं. त्यातून तिला समजावलं तेव्हा कुठे तिनं त्याला चित्रपटाची परवानगी दिली. वॉल्ट डिस्नेसारखी जगप्रसिद्ध व्यक्ती १८ वर्षं जर एवढ्या चिकाटीने काम करत असेल, तर आपण किस पेड की पत्ती!

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

‘Saving Mr. Banks’, ‘Current War’, ‘The Imitation Game’, ‘The King’s Speech’ सारखे चित्रपट आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला पॅशनेटली कसं झोकून द्यावं हे मला शिकवतात. चित्रपटांप्रमाणे पुस्तकही खूप शिकवतात. मी नववीपर्यंत खेड्यात वाढलेली मुलगी. पुस्तकं म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकं एवढंच माहीत. दादरच्या कानेटकर सरांनी मला पहिलं पुस्तक दिलं, डेल कार्नेगीचं ‘How to Stop Worrying and Start Living. त्यातले आणि तेव्हापासून सुरू झालेल्या वाचनातले किती तरी जगण्याचे मंत्र आज एक व्यावसायिक म्हणून उपयोगी पडतात मला.

आणखी वाचा : …अन्यथा ‘डाएट’च्या नादात प्राण गमवाल!

तसं बघितलं तर मी अचानक पर्यटन व्यवसायात आले. तेव्हा त्याचं पद्धतशीर शिक्षण तरी घ्यावं, म्हणून एक कोर्स केला. तो करत असताना एकदा आमचे सर म्हणाले, “दिवसभरातून एखादा जरी चांगला विचार आपल्याला मिळाला तर तो टीपकागदासारखा टिपावा.” तो विचार त्या दिवशी मिळणं आणि तो मिळालाय हे आपल्याला कळणं, म्हणजे आपल्या दिवसाचं सार्थक. सुंदर विचार आणि अशा विचारांचं संमीलन म्हणजे संपन्न आयुष्य. याचं एक उदाहरण सांगते, आम्ही नेहमी असं म्हणायचो की, ‘‘आपण ‘वीणा वर्ल्ड’ला भारतातील सर्वात मोठी पर्यटन कंपनी बनवू या.’’ पण आम्ही हे चुकीचं उद्दिष्ट निवडलंय हे मला कसं कळलं सांगू?

डावीकडून पती सुधीर पाटील यांच्यासमवेत वीणा पाटील आणि उजवीकडे मुलगा नील

एकदा सायमन सीनेक या मोटिव्हेशनल स्पीकरचं व्याख्यान मी ऐकलं. त्यात तो म्हणाला, “सर्वांना ‘बिगेस्ट’ व्हायचं असतं, सर्वात मोठी कंपनी म्हणजे किती मोठी? कशाच्या आधारावर आपण हे म्हणतो? एकदा मी व्याख्यानासाठी ‘ॲपल’ कंपनीत गेलो आणि एकदा ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये. मला तिथे असं आढळलं, की ‘मायक्रोसॉफ्ट’मधले लोक एकच विचार करत होते, की आपण ‘ॲपल’ला स्पर्धेत कसं हरवायचं, तर ‘ॲपल’मधले लोक असा विचार करत होते, की आपण आपलं तंत्रज्ञान कसं विकसित करायचं की त्याचा शिक्षकांना चांगलं शिकवायला आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिकायला उपयोग होईल? आता बघा, दोघांचे विचार किती वेगळे होते. ‘मायक्रोसॉफ्ट’चं उद्दिष्ट सीमित होतं, तर ‘ॲपल’चं उद्दिष्ट विशाल होतं. ‘ॲपल’चं उद्दिष्ट लोकांचं भलं करण्याचं होतं, त्यामुळे ते कधीही वैफल्यग्रस्त होणार नाहीत.” तुम्हाला सांगते, मी हे व्याख्यान ऐकलं आणि त्या क्षणी ‘युरेका’ वाटलं मला. त्यामुळे पुढे ‘वीणा वर्ल्ड’ ही विशाल कंपनी बनवण्यापेक्षा बेहतरीन कंपनी बनवण्याचं उद्दिष्ट आम्ही आमच्या टीमसमोर ठेवलं. कारण विशाल कंपनी बेहतरीन असेलच असं नाही; पण बेहतरीन कंपनी नक्कीच विशाल होऊ शकते. हे असे प्रेरणादायी विचार आपल्याला मोबाइलच्या एका क्लिकवर मिळतात. आज तंत्रज्ञान आपल्याला किती शिकवून जातं बघा. अगदी तसंच आपल्या जवळची माणसंसुद्धा खूप शिकवतात आपल्याला.

मुलगा राज याच्यासमवेत वीणा पाटील

आणखी वाचा : हिवाळ्याच्या आहारात असा करा बदल!

जवळपास तीस वर्षांपूर्वी एकदा मी बाबांबरोबर (केसरी पाटील) काठमांडूला गेले होते. तिथल्या हॉटेलच्या मॅनेजरने मला सांगितलं, “आपके पिताजी बहुत काम करते हैं.” मी त्यांना विचारलं, “आपने कैसे जाना ये?” त्यांचं उत्तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांसकट मला आजही जसंच्या तस्सं आठवतं. ते म्हणाले, “तुझ्या वडिलांच्या बुटांचा झिजलेला जो सोल आहे ना, त्याच्यावरून मला कळलं.” माय गॉड. मी अवाक् झाले. ‘जोडे झिजवणे’ या शब्दांचा अर्थ आणि कष्टांची किंमत त्या दिवशी मला पहिल्यांदा कळली. आई-बाबांचे कष्ट आठवल्यावर ‘मी दमले’ असं म्हणायचा मला काय हक्क आहे?

आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !

आईवडील, सासू-सासरे, माझे पती आणि भेटलेली अनेक चांगली माणसे, त्यांच्याकडून शुद्ध आचरणाचे संस्कार होत गेले. आजही आम्ही पर्यटन व्यवसाय करताना सरकारी कायदे व नियम मोडत नाही. त्यामुळे काही वेळा हातातला बिझनेस जातोही; पण चौकटीत राहून व्यवसाय करण्याचं तसंच आपण प्रतारणा करत नाही याचं समाधान फार मोठं असतं. माझ्या सासूबाई एकदा मला म्हणाल्या होत्या, “वीणा, लोकांचे कष्टाचे पैसे आहेत, तुमच्याकडून चुका होऊ देऊ नका.” अशी वाक्यं मी नेहमी लक्षात ठेवते व ती आचरणातही आणते.
नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य आहे. “तुम्ही रोज दोन तास लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या आयुष्याची दोन वर्षं वाढवू शकता.” मला पटलं ते. खरंच पहाटेची वेळ नेहमीच प्रसन्न, उत्साहाची आणि नवीन विचार सुचण्याची असते. मी लवकर उठून लिखाण करू लागले. नवीन कल्पक योजनांची आखणी करू लागले. आमच्या कंपनीला त्याचा फायदा होऊ लागला. आमच्या ऑफिसमधल्या दोन मुली विरारला राहतात, पहाटे चार वाजता उठून ऑफिसला येतात, उत्साहात काम करतात. त्या चार वाजता उठू शकतात तर मी का नाही उठू शकत? प्रेरणा मिळते ती अशी.

आणखी वाचा : …त्याचं कारण फक्त ‘बिग बॉस’च!

मला नेहमी वाटतं, की कार्यालयातील सर्व स्तरांवरच्या प्रत्येकामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचं धन पेरलं, तर ते अधिक जोमाने, आनंदाने काम करतात व त्याचा फायदा त्यांना स्वतःला आणि त्यांच्या करिअरला आणि संस्थेलाही होतो. माझे पती सुधीर यांच्याकडून शांतता, संयम आणि उत्साहाचं टॉनिक मला सातत्याने मिळत राहतं. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी सतत काही तरी चांगलं करीत राहण्याची त्यांची वृत्ती माझ्या मनात कधी तरी डोकावणारा खुजेपणा नष्ट करते. आमचा मोठा मुलगा नील २०१३ मध्ये ‘वीणा वर्ल्ड’ सुरू करताना म्हणाला, “कोणत्याही गोष्टीची काळजी तीन दिवसांपेक्षा जास्त केली तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, सो मूव्ह ऑन.” आमचा धाकटा मुलगा राज हा मिनिमलिस्ट संकल्पना प्रत्यक्षात आणणारा. ‘I don’t need it’ ही त्याची लाइन. कोणतीही गोष्ट हवी असते तेव्हा मी हा प्रश्न स्वतःला विचारते, ”Do I need it?’ सो आपली मुलं आपलं मेन्टॉरिंग करतात ते असं.

आणखी वाचा : अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?

एकूणच माझ्या आयुष्याचा लेखाजोखा मांडला तर बाबांनी पहिल्यांदा संस्था सुरू केली तेव्हा मी त्यांच्याबरोबर होते. पुढे ‘वीणा वर्ल्ड’ सुरू झालं तेव्हा मी परत स्क्रॅचपासून सुरुवात केली. करोनाने तर या इंडस्ट्रीला पूर्ण भुईसपाट केलं. तरी आम्ही उभे आहोत. प्रत्येक दिवस आपण आज छान काही तरी करू या, या आशेने उगवतो आणि संध्याकाळ झाली की दिवस सार्थकी लागला या भावनेत मावळतो.
आजवर मी खूप जग फिरलेय. अनुभवाचं खूप संचित गोळा केलंय. त्यामुळे प्रत्येक विचाराचा उगम नाही सांगता येणार मला; पण जे विचार, संस्कार माझ्या व्यक्तिमत्त्वात झिरपले, त्यातून माझं व्यक्तिमत्त्व संपन्न झालं, विचार सुसंस्कृत झाले. आजही ही प्रक्रिया सुरूच आहे. निरंतर सुरू राहणार आहे…”
(वीणा पाटील या ‘वीणा वर्ल्ड’च्या व्यवस्थापकीय संचालिका व प्रसिद्ध पर्यटन व्यावसायिक आहेत)
madhuri.m.tamhane@gmail.com

Story img Loader