-सुचित्रा प्रभुणे
सध्याच्या आपल्या रोजच्या जीवनात पेपर बॅग, डिश वॉशर, वायफाय यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. पण या सर्व गोष्टींचा शोध महिलांनी लावला आहे, ही बाब आपल्यापैकी कित्येकजणांना माहितदेखील नसेल. आज या गोष्टी आपल्याला शुल्लक वाटत असल्या तरीही १८००-१९०० च्या काळाचा विचार करता, या गोष्टींचे महत्त्व आपल्या लक्षात येईल की त्यासाठी या महिलांना काय आणि कसा संघर्ष करावा लागला. काहींच्या पदरात यश पडले, तर काहींचे यश जगासमोर खूपच उशिराने आले.

अशा या महिलांची थोडक्यात ओळख करून घेऊ-

मेलिटा बेन्झ- कॉफी गाळण्यासाठी खास स्वरूपाचा गाळण कागद तयार करण्यासाठी ही जर्मन स्त्री प्रख्यात आहे. हा कागद छोटासा, पण मेलिटाला खूप मोठे नाव देऊन गेला. या कागदाचा शोध कसा लागला याची कहाणी मजेशीर आहे. या कागदाचा शोध लागला तो काळ १९०८ चा. या आगोदर उकळत्या पाण्यात कॉफी पावडर टाकून ती तळाशी बसेपर्यंत वाट पाहावी लागत असे. पावडर पूर्ण तळाशी बसली की वरचे पाणी कॉफी म्हणून प्यायले जात असे. पण या सगळ्या प्रक्रियेत कॉफीमधील दाणेदेखील त्यात येत असत आणि हे दाणे बराचवेळ कॉफीत राहिल्यामुळे कॉफीची चव पार बिघडून जात असे.

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

असेच एकदा आपल्या मुलाच्या शाळेच्या वस्तूंचा खण आवरत असताना तिला त्यात एक टीपकागदाची (बोटींग पेपर) वही सापडली. या कागदाला पंचिग मशिनच्या मदतीने भोके पाडून तिने गाळणकागद तयार केला. या कागदाचा वापर करून तिने कॉफी गाळली तेव्हा तिच्या असे लक्षात आले की, कॉफी तर चांगली गाळली गेली आहे आणि तिचा स्वाददेखील अधिक चांगला येत आहे. पुढे या प्रयोगाची यशस्वी चाचणी केल्यानंतर तिने ७२ पेनिग्ज या भांडवलाच्या जोरावर ‘मेलिटा’ या कंपनीअंतर्गत या कागदाचे पेटंट फाईल केले. तिचा नवरा आणि मुलगा ही दोन मंडळी तिच्या कंपनीतील पहिले कर्मचारी होते. हे उत्पादन बाजारात आणल्यावर अल्पावधीतच लोकप्रिय आणि तितकेच यशस्वी ठरले. तिचा हा व्यवसाय तर भरभराटीला आलाच, याशिवाय जर्मनीत भरणाऱ्या प्रतिष्ठीत इंटरनॅशनल हायजिन प्रदर्शनात तिच्या या उत्पादनाला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

आणखी वाचा-गोव्यात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत पल्लवी डेम्पो?

जसजसा काळ बदलत गेला, तसतसा या कागदाबाबत अधिक संशोधन करून तिने या कागदाचा दर्जा अधिक चांगला आणि तितकाच सामान्यांना परवडण्याजोग्या किंमतीत ठेवला. या व्यतिरिक्त कॉफी संबधित अनेक उत्पादने बाजारात आणली. इतकेच नाही तर आपल्या कामगारांच्या हिताचा विचार करून तिने नाताळ निम्मित्ताने बोनस आणि भर पगारी सुटी या कल्पना आपल्या कंपनीत सुरू केल्या. शिवाय, कामगारांना काही आर्थिक अडचण जाणविल्यास त्या सोडविण्यासाठी ‘मेलिटा एड्स’ या फंडाची स्थापना केली. तिचे हे सारे कर्तृत्व पहिल्यानंतर सहज जाणविते की, व्यवसाय भरभराटीचे तिचे फंडे हे काळाच्या चार पावले पुढे होते.

ग्लेडी वेस्ट- गणिततज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलेल्या या कृष्णवर्णीय महिलेच्या यशाचा प्रवास साधा सरळ नव्हता. अमेरिकेतल्या ग्रामीण व्हर्जेनिया भागात एका शेतकरी कुटुंबात हिचा जन्म झाला. कोणत्याही शेतात किंवा तंबाखूच्या शेतात काम करीत राहायचे, हेच काय ते आयुष्यभराचे ध्येय. अशा वातावरणात रहाणाऱ्या ग्लेडीला शिक्षणामध्ये खास करून गणितामध्ये प्रचंड रस होता. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवत तिने १९५२ साली व्हर्जेनिया कृष्णवर्णीय विद्यापीठाचीही शिष्यवृत्ती मिळवली. पुढे काही वर्षांनी अमेरिकन नौसेनेच्या धाल्ग्रेन येथील शस्त्र प्रयोगशाळेत तिची नियुक्ती करण्यात आली. तेथील अनेक किचकट गणितांची सूत्रे ती अगदी सहजरित्या तोंडी सोडवीत असे. इथे तिची ओळख इरा वेस्ट या तरुण कृष्ण वर्णीय गणितज्ज्ञा बरोबर झाली आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

या नौसेनेच्या प्रयोग शाळेत खऱ्या अर्थाने ग्लेडीच्या हुशारीला वाव मिळाला. अनेक नवनवीन उपक्रम- जसे नेपच्यून व प्लूटोचा भ्रमण करताना येणारा नेमका संबंध, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षणामुळे घडणाऱ्या अनेक घडामोडींचे- जसे लाटा, वाऱ्याचा वेग, समुद्रतील पाण्याचे तापमान, हिमकडा यांची गणितीय मांडणी करून नौसेनेसाठी पहिली जीपीएस प्रणाली तयार केली.

आणखी वाचा-हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

परंतु खेदाची गोष्ट अशी की, वर्णभेदामुळे तिच्या या कर्तृत्वाला खूप उशिराने ओळख मिळाली. आज जीपीएस प्रणाली ही अनेक ठिकाणी सहजपणे वापरली जाते. परंतु ती निर्माण करणाऱ्या महिलेला ही ओळख खूप संघर्ष सहन करून मिळाली. अलीकडे २०१८ साली जेव्हा बीबीसीने १०० कर्तृत्ववान महिलांची यादी जाहीर केली, त्यात ग्लेडीची ओळख खऱ्या अर्थाने जगाला झाली.

मेरी ॲण्डरसन- महिला कारचालक हा आजही आपल्या समाजात विनोदाचा विषय ठरतो. पण या कारच्या समोरच्या काचेवर जे विंड वायपर असतात, त्याचा शोध एका महिलेनेच लावला आहे, हे किती जणांना माहितेय. ती महिला आहे मेरी ॲण्डरसन. अमेरिकेतील अलाबामा येथे१८६६ साली जन्मलेल्या मेरीची कहाणी गमतीशीर आहे. तिचे वडील रिअल इस्टेट दलाल होते. अचानकपणे वडिलांचे १८७० साली निधन झाले आणि सारं कुटंब बर्मिंगहॅम येथे स्थयिक झालं. तिथे द्राक्षाच्या बागा चालविणे, गुरेढोरे सांभाळणे अशी अनेक लहानसहान कामे ती करीत असे.

असेच एकदा हिवाळ्याच्या दिवसांत ट्रॉली कार चालवित असताना समोरच्या काचेवर खराब हवामांमुळे बाष्प साठलेले दिसले. ही काच साफ करण्यासाठी चालकाला थोड्यावेळाने खिडकी उघडून ती साफ करावी लागत असे. सततच्या या प्रक्रियेमुळे अनेक चालक वैतागत असत. परिणामी, अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यास खूपच वेळ लागत असे. ही बाब लक्षात घेऊन मेरीने असे उपकरण तयार केले की, जे गाडीच्या आतूनच चालकाला, खिडकी न उघडता काच साफ करता येईल. हे उपकरण म्हणजेच हे विंड शिल्ड वायपर होय. १९०३ मध्ये जेव्हा तिने या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज केला तेव्हा कारचा व्यवसाय भरभराटीस आला नव्हता. त्यामुळे तिच्या या शोधाचा तिला खऱ्या अर्थाने फयदा लाभला नाही. ही तिच्या आयुष्याची शोकांतिका ठरली.

आणखी वाचा- वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

ॲलिस पार्कर- १९१० च्या काळातील हार्वड विद्यापीठातील हॉनर्स मिळवून पदवी मिळवणारी ती महिला होती. तिला संशोधनामध्ये प्रचंड रस होता. न्यू जर्सीच्या कडाक्याच्या थंडीत केवळ लाकूड व कोळसा वापरून सारे घर उबदार ठेवता येणार नाही, याची तिला जाणीव होती. म्हणून तिने संपूर्ण घरात केंद्रीय पद्धतीने उबदारपणा जाणवेल अशी गॅसभट्टी (हिटिंग फर्नेस) तयार केले. पण तिच्या या मशिनमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक त्रुटी होत्या. याबाबत पुढे अनेकांनी संशोधन करून सुरक्षित अशा सुधारणा केल्या. पण याचा पाया रचल्याचे सारे श्रेय आजही ॲलिसकडे दिले जाते, हेही नसे थोडके.

जोसेफिन क्रोकेन- अमरिकेतील ओहिओ गावात जन्मलेल्या जोसेफिनला देखील इतर बायकांप्रमाणे जेवणानंतर भांडी घासण्याचा प्रचंड कंटाळा होता. एकदा एका डिनर पार्टीला गेल्यानंतर तिथे भांडी घासताना अनेक पिढीजात भांडी तुटल्याचे तिच्या निदर्शनास आले. आणि या प्रसंगातून तिला भांडी घासण्यासाठी हाताचा वापर करण्यापेक्षा एखादे मशिन तयार करता आले तर बरे होईल ही प्रेरणा मिळाली. मग १८८५ मध्ये तिने आपल्या घराच्या मागच्या अंगणात एका शेडमध्ये डिशवॉशर मशिन तयार केले. यात तिने प्लेट्स, बश्या, वाट्या वेगवेगळ्या खणात राहतील आणि ते धुण्यासाठी कोणत्याही घासणीचा वापर न करता साबणाच्या पाण्याचा वापर करून त्या धुतल्या जातील अशी सोय केली. सुरुवातीच्या काळात या मशीनची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळे हॉटेल किंवा रुग्णालये या ठिकाणीच त्याचा वापर होत असे. मग काळानुसार त्यात अनेक बदल करून ते सर्व सामान्य गृहिणीला परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध करून दिले. यानंतर हे मशिन घराघरात चांगलेच लोकप्रिय ठरले.

आणखी वाचा-आजारी पत्नीला काम करायला लावणं ही क्रूरता! न्यायालयाचं स्पष्ट मत, पण निकाल मात्र पतीच्या बाजूने, कारण..

हेडी लॅमर- हिची ओळख म्हणजे १९४०च्या काळातील प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आणि दुसरी म्हणजे तिला ‘मदर ऑफ वाय-फाय’ असे देखील म्हटले जाते. आहे की नाही मजेशीर बाब. एखादा नट किंवा अभिनेत्री संशोधक असू शकतो ही कल्पनाच करवत नाही. रेडिओ लहरींचा नेमका वापर करून वायरलेस वायफाय, ब्लू टूथ, जीपीएस प्रणाली कार्यरत करता येते हे तिने जगाला दाखवून दिले.

मेरी केनर- १९७६ चा सुमार अमेरिकेतील करोलिना येथे रहाणाऱ्या मेरीच्या बहिणीला एका विशिष्ट प्रकारच्या रोगाचे निदान झाले. यामुळे तिचे अनेक अवयव निकामी झाले तेव्हा तिच्या या अवस्थेत तिला सहजपणे रोजच्या हालचाली करता याव्यात यासाठी मेरीने अनेक युक्त्या लढविल्या. जसे तिला वॉकरने चालणे सुलभ व्हावे यासाठी तिने त्यात एक ट्रेची व्यवस्था केली. जेणेकरून तिला चालताना हव्या असलेल्या गोष्टी ती त्यात ठेवू शकेल. यातूनच टॉयलेट पेपर होल्डरची कल्पना प्रत्यक्षात आली. कारण हा होल्डर बनविल्यामुळे बहिणीला रोजच्या दैनंदिन गोष्टी करणे सहज सुलभ झाले. पुढे ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय ठरली.

अलीकडेच महिला दिनाच्या निमित्ताने या कर्तृत्ववान महिलांची ओळख जगासमोर यावी यासाठी एक छोटीसी क्लिप तयार केली गेली. विशेष म्हणजे त्यासाठी मॉडेल म्हणून पुरुषाचा वापर करण्यात आला, ही देखीलदखल घेण्याजोगी बाब आहे, हेही नसे थोडके.

suchup@gmail.com