काही प्रकारचे कपडे केवळ ठराविक प्रसंगी किंवा ठराविक ऋतूंमध्येच वापरले जातात. ‘डंगरी’ आणि ‘बीनी’ हा त्यातलाच प्रकार आहे. यातली ‘बीनी कॅप’ अर्थात केसांवर पूर्णपणे बसू शकणारी किंवा थोडी सैलसर बसणारी आणि कान झाकणारी टोपी. तर ‘डंगरी’ म्हणजे अर्थातच डेनिमच्या कापडापासून (किंवा तशाच जाडसर कापडापासून) शिवलेली सैलसर जीन्स किंवा स्कर्ट आणि त्याला जोडलेला पोट आणि छातीवर येईल असा चौकोनी फ्लॅप.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

डंगरी हा खरंतर एक वेगळ्या प्रकारच पोशाखच. आपल्याकडच्या उन्हाळा आणि पावसाळ्यात डंगरी किंवा बीनी यातलं काहीही घालणं केवळ अशक्यच म्हणता येईल! पण हे दोन्ही कपडे घालून छान मिरवता येईल असे सध्याचे दिवस आहेत. वेगवेगळ्या शॉपिंग ॲप्सवर सध्या हे कपडे नवीन कलेक्शनमध्ये दिसत आहेतच, पण शहरांमध्ये रस्त्यांवर घोळक्यांनी फिरणाऱ्या तरूणाईतही मुली डंगरी आणि बीनी यातलं काही ना काही मिरवताना दिसू लागल्या आहेत.

आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !

मोठ्यांसाठीच्या डंगरीज् विविध प्रकारांत दिसतात. साधी जीन्सवाली ‘डेनिम डंगरी’, डंगरी स्कर्ट, डंगरी ड्रेस (म्हणजे डंगरीसारखा शिवलेला डेनिमचा ड्रेस), डंगरी शॉर्टस् आणि डंगरी क्युलोटस् . यातली सैलसर जीन्सची डंगरी अधिक लोकप्रिय. डंगरीज् मध्ये कापड हे जाडसरच असतं. डेनिमचं कापड वापरलेलं असेल, तर त्यात कॉटन आणि स्पँडेक्स असा ‘ब्लेंड’ असतो, त्यामुळे ते काहीसं ‘स्ट्रेचेबल’ असतं. जीन्सला पुरेसे खिसेही असतात. त्यामुळे संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बाहेर फिरायला जाताना छान ‘कॅज्युअल वेअर’ हवं असेल तेव्हा किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाताना ताबडवण्यासाठी हा पोषाख उत्तम ठरतो. यात एकाच बाबतीत सुटसुटीतपणा नाही, तो म्हणजे डंगरी घातल्यानंतर टॉयलेटला जावं लागलं, तर डंगरीचे खांद्यावर घट्ट बसलेले बंद आधी खाली घ्यावे लागतात. तुरळक वेळेस डंगरी विकत घेतानाच डंगरी आणि टी-शर्ट अशी जोडी मिळते, तर बहुतेक वेळा आपल्याला वेगळा टी-शर्ट हा डंगरीबरोबर ‘मिक्स अँड मॅच’ करावा लागतो. सध्याच्या वातावरणात ‘टर्टल नेक’ किंवा बंद गळ्याचे आणि थ्री-फोर्थ बाह्या असलेले टी-शर्ट डंगरीबरोबर घातलेले पाहायला मिळत आहेत, तर काही मुली डंगरीबरोबर ‘क्रॉप टॉप’ घालण्यास पसंती देत आहेत.

आणखी वाचा : तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…

बीनी कॅपसुद्धा विविध मटेरिअल्समध्ये मिळतात. तरुण मुलांमध्ये स्ट्रेचेबल कॉटनच्या बीनी कॅप्स या बाईक चालवताना वापरण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. मुलींमध्ये मात्र थंडीच्या दिवसांतच लोकरीची किंवा होजिअरी कापडाची बीनी कॅप फॅशनमध्ये दिसते. यातल्या लोकरीच्या बीनी कॅप्स खूपच आकर्षक असतात आणि त्या डोक्याच्या आकारापेक्षा जरा ‘ओव्हरसाईज’ असल्यामुळे कान आणि केस अर्धवट झाकले जातील, अशा त्या ‘स्टायलिश’ पद्धतीनं घातल्या जातात. बीनींमध्ये लोकरींचे आकर्षक आणि बहुतेक वेळा फिके रंग वापरले जातात आणि त्या घालताना केवळ सोईपेक्षा ‘सोय आणि स्टाईल’ यावरच भर अधिक असतो.

आणखी वाचा : “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

काही बीनी कॅप्सना टोपीच्या वरच्या टोकाला क्यूट दिसणारा लोकरीचा ‘पॉम पॉम’ जोडलेला असतो, तर बहुतेक बीनींचा आकार मोदकासारखा असतो. फार थंडी नसेल आणि केवळ केस आणि कान झाकायचे असतील तर मुलींनाही स्ट्रेचेबल कॉटन कापडाच्या बीनी घालता येतील, मात्र त्यात लोकरीच्या बीनी कॅप्ससारखी स्टाईल करता येत नाही.
प्रसंगानुरूप फॅशन करण्याची आवड असणाऱ्या ‘चतुरां’च्या बासनात हे दोन्ही कपडे असणार यात काही शंका नाही. पण तुम्ही अद्याप ते वापरलेले नसतील आाणि वापरून पाहाण्याची इच्छा असेल, तर हेच ते दिवस!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion trending beanie cap and dangri jeans lifestyle vp