एप्रिल २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात ब्रिटीश ड्रेस डिझायनर मेरी क्वांटचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. ब्रिटीश मंडळी विविध प्रकारच्या फॅशन स्टाइल्ससाठी ओळखली जातात. याच ब्रिटीश महिलांच्या दैनंदिन वापरातील स्कर्ट ह्या पेहरावाला वेगळा अंदाज देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मेरी क्वांट हिने. मेरीने इथल्या सामान्य वर्गातील पारंपारिक स्कर्टमधे काळानुसार, युवतींच्या विचारांतील फॅशननुसार बदल करून त्यांची उंची पूर्वीपेक्षा कमी करून त्याला ‘मिनी स्कर्ट’ असं नाव दिलं, ही गोष्ट होती १९६० ची. त्यानंतर मात्र मिनी स्कर्ट केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरात मिनी स्कर्ट लोकप्रिय पेहराव ठरला.

आणखी वाचा : महिलांविषयक आक्षेपार्ह बाबींना रोखण्यासाठी कायदेशीर शब्दकोश लवकरच- सरन्यायाधीश चंद्रचूड

vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Father daughter love vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे” VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी
A Bengaluru man shared Diwali photos of women on social media without their consent and referred to the women as patakas
परवानगी न घेता महिलांचे फोटो केले शेअर, महिलांना संबोधले ‘पटाखा’; आक्षेपार्ह पोस्ट पाहून नेटकरी भडकले
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो

ब्रिटनमधल्या महिला गुडघ्यापेक्षा अधिक लांबीचे स्कर्ट परिधान करीत असत. त्यामुळे त्यात स्कर्ट पेहराव त्यांना काही नवा नव्हता. मेरीने डिझाइन केलेला मिनी स्कर्ट हा तत्पूर्वी दुसऱ्या महायुद्धोत्तर काळामध्ये ब्रिटनच्या एका विशिष्ट वर्गातच वापरला जात असला तरी त्याला मिनी स्कर्ट अशी काही ओळख मिळालेली नव्हती. समाजातल्या उच्चभ्रू वर्गातल्या पार्ट्या, फॅशन शोज् यांत असा तोकडा स्कर्ट सर्रास पहायला मिळत असे. साधारणपणे उच्चभ्रू वर्गातील पेहरावांची नक्कल सर्वसाधारण समाजाकडून अनुसरली जाते तेव्हा त्यात समाजाच्या विचारसरणीनुसार बदल घडत असतात. त्याप्रमाणे तिथल्या समाजातील सामान्य नोकरदार स्त्रियांच्या पेहरावातील स्कर्ट गुडघ्याखाली चांगले वीतभर तरी लांबीचे होते. हे स्कर्ट परिधान करून नोकरी, शाळा किंवा काही अन्य कामांसाठी बाहेर पडलेल्या महिला बस पकडण्यासाठी धावत असत. अशावेळी हा लांब स्कर्ट पायात अडकून धावण्यात अडथळा येत असे. या त्रासाबरोबरच दुसऱ्या महायुद्धानंतर वातावरण बऱ्यापैकी निवळले होते. नव्या कल्पना, विचारांना वाव मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. आधीच्या पिढ्यांनी जे वापरलं त्याचं अनुकरण करण्यापेक्षा युवावर्गाला त्यांच्या आवडीनुसार गोष्टी घडलेल्या वा घडवून दिलेल्या हव्या होत्या. याचाच परिणाम स्वाभाविकच कपड्यांवर, वेशभूषेवरही झाला.

आणखी वाचा : गोल्डमन पुरस्काराने सन्मानित अलेस्सांड्रा कोरप मुंडुरूकु आहे तरी कोण?

लंडनमध्ये जन्मलेल्या मेरी क्वांटला सुरूवातीपासूनच फॅशन डिझायनर व्हायचं होतं. मात्र आईवडीलांची त्याला पसंती नसल्याने तिने कलाविषयक शिक्षण घेऊन पदवी मिळवली. किंग्ज रोड येथे तिने बाजार या नावाने तयार कपड्यांचे दुकान थाटले. तिच्याकडच्या कपड्यांच्या डिझाइन्स आकर्षक होत्या. एका अमेरिकन निर्मात्यानेही तिच्याकडे काही डिझायनर कपड्यांची खरेदी केली होती. असं असलं तरीही त्यात तिला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. शेवटी तिने स्वतःच कपडे डिझाइन करायला सुरूवात केली. नवनवीन डिझाइनसोबतच तिने तिच्या बुटीकमधील वातावरणही हलकंफुलकं ठेवण्यास सुरूवात केली. एखादं पेय हातात घेऊन संगीत ऐकता ऐकता बराच वेळ काम करण्याची ही संकल्पना युवावर्गाला आकर्षून गेली. त्याचबरोबर तिने बुटीकच्या बाहेर डिझाइन केलेल्या वेशभूषेतील मॉडेल्सची चित्रंही प्रदर्शित केली. याचा परिणाम असा झाला की, दहा दिवसांच्या आतच तिने डिझाइन केलेल्या कपड्यांची, पेहरावांची विक्री होऊन ते संपू लागले. क्वचितच त्यातला एखादा पेहराव शिल्लक रहात असे. याच काळात स्कर्टसंबंधी आणि तरूणींच्या त्यावेळच्या मागणीनुसार तिच्या मनात विचार सुरू झाले. गुडघ्याएवढ्या लांबीचा स्कर्ट दोन ते तीन इंचांनी कमी करून तिने त्याला तिच्या आवडच्या कारचं मिनी हे नाव दिलं. आश्चर्य म्हणजे, लांबी कमी करून नव्या नावानिशी फॅशन जगतात आलेल्या मिनी स्कर्टने अल्पावधीतच तरूणींच्या मनात घर केलं. तोकडे स्कर्ट हे याहीपूर्वी अस्तित्वात होते, परंतु ते क्वचितच घातले जात, याकडे मेरी क्वांटने आपल्या आत्मचरित्रात लक्ष वेधलं आहे. स्कर्टच्या बदललेल्या रूपड्याला मेरीने तिच्या मिनी कूपर या ब्रँड नेमच्या कारमधील मिनी नाव जोडलं आणि फॅशन जगात क्रांतीच झाली.

आणखी वाचा : दिवास्वप्न का दिसतात?

१९६० च्या दशकातील तरूणींची मागणी, सामाजिक क्रांतीची असलेली किनार असे अनेक पैलू या मिनी स्कर्टच्या निर्मितीशी जोडलेले आहेत. तत्कालिन महिलांची सोय म्हणून तयार झालेल्या ह्या फॅशनने मेरी क्वांटचं नाव जगप्रसिद्ध केलं. या स्कर्टच्या तोकडेपणामुळे तत्कालिन समाजात विचारांची वावटळ उठलीच. मुलींना त्यांच्या वयाच्या दिसण्यासाठी मिनी स्कर्टने मोठाच हातभार लावल्याने ही वादळेही शमली. पुढे जाऊन ही वेशभूषा स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक समजली जाऊ लागली.

२००९ साली क्वांटद्वारा डिझाइन केल्या गेलेल्या मिनी स्कर्टला ब्रिटीश डिझाइन क्लासिक स्मारक टपाल तिकिट होण्याचा सन्मान मिळाला. मेरी क्वांटने यानंतर अनेक प्रकारचे कपडे डिझाइन केले. इंग्लडमध्ये २०१९ साली झालेल्या गुडवुड रिव्हायवल मोटर रेसिंग फेस्टिवलमध्ये तिने डिझाइन केलेले कपडे सादर केले गेले. वी अँड ए मधील वस्त्र आणि फॅशनची क्युरेटर असलेल्या जेनी लिस्टरने असं म्हटलं आहे, की मेरी क्वांटला महिलांनी कशी वेशभूषा करावी, कोणता पेहराव धारण करावा हे अचूक ओळखले. ती फॅशन जगतातील युवा आंदोलनाची गॉडमदर होती. ब्रिटीश फॅशन कौन्सिलच्या हॉल ऑफ फेम पुरस्कारासारखे अनेक पुरस्कार आपल्या नवनवीन फॅशन डिझाइन्सनी कमावणाऱ्या मेरी क्वांटचे १३ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले.