नयनाचा सहा वर्षांचा अर्णव आज एकदम खूश होता. त्याच्या घरात त्याच्या आजीच्या पासष्ठीला कितीतरी नातेवाईक आले होते. अर्णवच्या बाबांचे काका, मामा, आत्या आणि मावशी… शिवाय बाबांची मावस-मामे भावंडंही आली होती. नयना आणि सुयश यांना अर्णव हा एकच मुलगा. नयनाला भाऊ बहीण नाही आणि सुयशच्या अमेरिकेतल्या भावाला एकच मुलगी. त्यामुळे अर्णवला तेव्हढी एकच चुलत बहीण, आणि तीही परदेशात. अर्णवच्या इमारतीतदेखील सगळी कुटुंबं मिळून फक्त तीन लहान मुलं. खेळायला कुणीच नाही. अर्णव एकटा पडतो, त्याच्या बरोबरीने वाढणारी भावंडं नाहीत, याची बोचरी जाणीव नयना सुयश यांना होत असे, पण दुसरं मूल न होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते. त्यामुळे आता घरात इतकी सारी मंडळी असताना अर्णव एकदम खूश होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती.

“आई, बाबांना कित्ती दादा ताई, आत्या, मामा काका आहेत, मग मला का नाही मामा? मला आत्या का नाही? मी कुणाला दादा म्हणू?” असे अनेक प्रश्न विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं. नयनासुद्धा विचारात पडली. खरंच आपण कधी विचार नाही केला, पण अर्णवला मामा मावशी ही नाती माहीतच नाहीत. काका काकू असून नसल्या सारखे. उद्या अर्णव मोठा झाल्यावर त्याचं लग्न झालं, की त्याच्या मुलांना कुठलीच नाती माहितीच होणार नाहीत का? ही नात्याची उतरंड कालानुरूप अशी विरळ विरळ होत जातेय. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना भरपूर नातेवाईक आहेत. प्रसंगी त्याचा त्रासही होत असेल, पण गोतावळ्यात मुलं सहजपणे मोठी होत. आपल्या आणि सुयशच्या वाट्याला तुलनेत कमी नाती आली, पण आपल्याला सगळ्या नातेवाईकांनी भरभरून प्रेम दिलं. जितकी आहेत त्यात खूप लडिवाळ कौटुंबिक सुख उपभोगलं आपण. सगळ्या सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणारी, अडचणीला धावून येणारी मंडळी आपल्या भोवती आहेत. जे आहे ते वाटून घ्यावं, आपल्या सुखासोबत इतरांचाही विचार करावा हे विचार आपण बऱ्यापैकी शिकलो. आपल्या चुलत भावंडांसोबत आपले संबंध चांगले आहेत.

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरच्या घरी ओला मसाला

आजच्या बऱ्याच मुलांना त्या सगळ्या सुखापासून वंचित राहावं लागतंय. त्यांना अनेक नात्यांची ओळखच नाही . कुठेतरी एकटेपणाची त्रासदायक जाणीव त्यांना होत असणार. त्या पुढील पिढी म्हणजे अर्णवच्या पुढची पिढी किती एकटी पडेल नाही? आत्या, मामा, काका ही नाती गायब होतील का? त्यांच्या पुढील आव्हानांना त्यांना एकट्याने तोंड द्यावं लागणार आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्यांच्या जीवाभावाचे कुणी त्याच्या सोबतीला असतील का ? मैत्रीची नाती किती घट्ट असतील? कुणाजवळ मन मोकळं करायला न मिळाल्याने त्यांचा भावनिक कोंडमारा होईल का? ऐहिक प्रगती करताना मानसिक एकटेपण त्यांना झेपेल का? असं झालं तर … त्यात नक्की चूक कुणाची? एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांची की बदलत्या परिस्थितीची?

हेही वाचा… समुपदेशन: शरीरसंबंधांचं वय असतं का?

दोन अपत्यांचे संगोपन उत्तम रीतीने करताना अनेक पालकांची कुतरओढ होते हेही एक वास्तव आहे. नयना विचारात पडली. अर्णवनं विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तिच्याजवळ नव्हती. इतक्यात तिला चुलत सासूबाईंनी हाक मारली. “चल गं नयना, आपण पाचजणी मिळून त्यांना ओवाळू. जेवण झाल्यावर मस्तपैकी अंताक्षरीचा कार्यक्रम आहे ना? नयनाच्या मनात मात्र अनेक प्रश्न रुंजी घालत होते…

adaparnadeshpande@gmail.com