Female Cab Driver From Ahmedabad: आव्हाने अनेकदा माणसाला इतकी खंबीर बनवतात की, ती व्यक्ती आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकते. मग तिच्या धैर्यापुढे प्रत्येक अडचण लहान वाटते. अलीकडे एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशीच एक गोष्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदाबादमध्ये असलेल्या एका माणसानं ओला कॅब बुक केली आणि तेव्हा एक महिला कॅब ड्रायव्हर त्याला घेण्यासाठी आली. त्यानं याआधी महिलांना ऑटोरिक्षा चालवताना पाहिलं होतं; पण कॅब ड्रायव्हर महिला पहिल्यांदाच पाहिली. त्या महिलेला पाहताच त्यानं ती कार का चालवते, असा प्रश्न केला. तेव्हा त्या महिला कॅब ड्रायव्हरने जे उत्तर दिलं, ते ऐकून तो माणूस भावूक झाला. त्या व्यक्तीनं नुकतीच फेसबुकवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आणि त्या महिला कॅब ड्रायव्हरचा फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

ओजस देसाई यांच्या फेसबुक अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून, त्यांनी या फोटोला कॅप्शन देत लिहिलं, “आज अहमदाबादमध्ये मी रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली. कॅब बुक करताच कन्फर्मेशन मेसेजमध्ये ड्रायव्हरचे नाव अर्चना पाटील, असे नमूद केलेले मला दिसले.”

हेही वाचा… महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

त्याने पुढे सांगितले, “अर्चना एक उल्लेखनीय महिला आहे. ओला कॅब चालवणे कदाचित इतके उल्लेखनीय नसेल; पण तिला इतक्या सहजतेनं आणि इतक्या चांगल्या प्रकारे गाडी चालवताना पाहून मला आनंद झाला. जुन्या शहरातून अहमदाबाद रेल्वेस्थानकाकडे जाणे आणि खूप ट्रॅफिक असलेल्या या रस्त्यातून गाडी काढणे हे खरेच खूप त्रासदायक व कठीण काम आहे. पण, त्या महिलेला गाडी चालवताना पाहून मी प्रभावित झालो. शेवटी ओला किंवा उबेरमध्ये महिला ड्रायव्हरशी भेट होण्याची ही माझी पहिलीच संधी होती. माझ्या सुरत शहरात, मी महिला ऑटो ड्रायव्हर्स पाहिल्या आहेत; पण मी कधीही ओला किंवा उबरमध्ये महिला ड्रायव्हर्ससह प्रवास अनुभवला नव्हता.”

“कदाचित तुम्ही म्हणू शकता की, यात इतकं उल्लेखनीय असं काहीही नाही. पण, सांगायचं झालं, तर तिची गोष्ट खरी उल्लेखनीय आहे. तिचा नवरा ओला ड्रायव्हर होता. प्रकृतीच्या समस्यांमुळे तो हे काम पुढे करू शकला नाही. ही कॅब कर्जावर घेतली होती. या सगळ्या परिस्थितीत महिलेनं ओलामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, मला माहीत होतं की यातून चांगला पैसा मिळतो,” असे त्याने तिचे म्हणणे मांडले.

“खरं तर तिला सायकल कशी चालवायची हेदेखील माहीत नव्हतं. परंतु, सहा महिन्यांत ती गाडी शिकली आणि लायसन्स मिळवलं. जे गुजरातमध्ये आहेत, त्यांना माहीत आहे की, पक्कं लायसन्स मिळवणं हे किती कठीण काम आहे. कारण- इथे ड्रायव्हिंग टेस्ट खूप कठीण असतात. संभाषणादरम्यान ती महिला असंही म्हणाली की, आता मी १३ ते १४ तास गाडी चालवते आणि दोन घरांची कामंदेखील करते”, अशी मन हेलावणारी तिची कथा त्याने मांडली.

हेही वाचा… २० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा

त्या माणसानं पोस्टमध्ये म्हटलं, “मी हे स्त्रीशक्तीचं उदाहरण म्हणून किंवा ‘बदलत्या समाजाचा’ पुरावा म्हणून ठळक करू इच्छित नाही. मला याचा आनंद आहे की, मला आज एक उत्साही व्यक्ती भेटली; जिनं नशिबाला दोष देत पराभव मानला नाही. मी त्या महिलेला म्हणालो की, मी तुमचा नंबर सेव्ह केला आहे. यावर ती महिला म्हणाली की, तुम्ही असं नाही बोलावू शकत मला. तुम्हाला बुकिंग ‘ओला’नेच करावी लागेल.”

“आयुष्य कोणासाठीही सोपे नसते.” असंही ते म्हणाले.

ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अगदी काही वेळातच या पोस्टला १८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आणि ९००हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.