तंतुमय पदार्थ रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक, याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही. तंतुमय पदार्थ आपणास पुढील अन्नघटकांपासून मिळतात. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या इत्यादी.

आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?

eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
do patti
अळणी रंजकता
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
The election commission announced the schedule of campaign expenses
शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे

तंतुमय पदार्थांचे प्रामुख्याने पुढील फायदे असतात.

  1. रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते.
  2. वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात.
  3. कोलेस्टरॉल कमी होते.
  4. मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते.
  5. खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव देत असल्याने वजन वाढवणारे अतिरिक्त अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.
  6. स्वयंपाकादरम्यान काही जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो. काही तंतुमय पदार्थ कच्चे खाल्ल्याने शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ सांगतेय, करिअर- विदेशातील शिक्षणाचा समृद्ध करणारा अनुभव (पूर्वार्ध)

हिवाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली असल्याने कच्च्या पदार्थाचे प्रमाण जेवणामध्ये जास्त असण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ कच्चे सॅलड, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचा ज्यूस, कच्ची मोड आलेली कडधान्ये इत्यादी. चपाती/ भाकरी कोंड्यासकट करावी. भाज्या जास्त प्रमाणात शिजवू नयेत. सॅलड, भाज्या कापून जास्त वेळ उघड्या वातावरणात ठेवू नयेत. चवीप्रमाणे मीठ/ सैंधव, मिरेपूड, जिरेपूड, धणेपूड, लिंबू आदी पदार्थ वापरून सॅलड/ कडधान्ये खावीत. जे पदार्थ आपण कच्चे खाऊ शकत नाहीत ते पदार्थ शिजवून/ वाफवून घेण्यास हरकत नाही. तसेच ज्यांची पचनशक्ती मंद आहे, अपचनाचा ज्यांना त्रास होतो त्यांनी पदार्थ कच्चे न खाता शिजवून घ्यावे.

आणखी वाचा : अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे साकारण्याचा कालावधी वाढतो परिणामी अन्न एका जागी जास्त वेळ पडून राहते व आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, ढेकर भूक न लागणे इ. अनेक तक्रारी सुरू होतात. हिवाळ्यात पाणी व तंतुमय पदार्थ कमी पडले व त्याबरोबर शारीरिक हालचाली कमी पडल्या की बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. तसेच मांसाहाराचे प्रमाण आहारात जास्त असेल आणि त्याबरोबर तंतुमय पदार्थ कमी असतील तरी या तक्रारी वाढू शकतात. म्हणून हिवाळ्यात तंतुमय पदार्थ अवश्य घ्यावेत व आपल्या पचनशक्तीनुसार कच्चे/ शिजवलेले यापैकी कोणत्याही स्वरूपात घ्यावे. शरद ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली असते. भूक चांगली लागते आणि पचनही चांगले होते. त्यामुळे दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका तसेच एका वेळी खूप जेवू नका. दिवसभरातल्या जेवणांमध्ये सकाळची न्याहारी जास्त चांगली असावी.
dr.sarikasatav@rediffmail.com