उष्ण हवामानात उगवणारी नाचणी ही वनस्पती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून, शरीरास पोषक आहे. भारत, तसेच आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमधून नाचणीचे पीक घेतले जाते. साधारणतः ३,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून नाचणीचे पीक भारतात आले असावे. भारतातील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात नाचणीचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये कोकण भागात नाचणी जास्त प्रमाणात तयार होते. दिसायला आकर्षक व पौष्टिक गुणधर्माच्या नाचणीच्या पिठापासून भाकरी, पापड्या, खीर, लाडू, नाचणीसत्त्व असे अनेक प्रकार बनविले जातात.

हिंदीमध्ये ‘मंडुआ’, इंग्रजीमध्ये ‘फिंगर मिलेट’, संस्कृतमध्ये ‘राजिका’, तर शास्त्रीय भाषेत ‘एल्युसाईन कोराकॅना’ (Eleusine Coracona) या नावाने ओळखली जाणारी नाचणी (नागली) ‘पोएसी’ कुळातील आहे. नाचणी धान्य दिसायला मोहरीप्रमाणे दिसते. नाचणी या वनस्पतीच्या रोपांना कणसे येऊन त्यातील दाण्यांना नाचणी असे म्हणतात. हेच दाणे खाद्यस्वरुपातील धान्य असून, त्याचाच उपयोग भाकरी, आंबील, पापड, लाडू बनविण्यासाठी केला जातो.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये

हेही वाचा – नातेसंबंध: माहेरच्या कार्यात तुमचाही नवरा ‘फजिती’ करतो?

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : नाचणी तुरट, मधुर रसात्मक, मधुर विपाकी व शीत वीर्यात्मक आहे. हीच नाचणी पित्त व रक्तशामक असून, स्तंभक व तर्पण गुणाची आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, गंधक, आयोडिन, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ यांचाही साठा विपुल प्रमाणात असतो.

उपयोग :

१) नाचणी कॅल्शिअमने समृद्ध असते. इतर कोणत्याही धान्यात नाचणीइतके कॅल्शिअम नसते, म्हणून मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांच्या आहारामध्ये नाचणीपासून बनविलेल्या विविध पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्यांचे दात, हाडे, स्नायू यांची घडण चांगली होऊन मुले सुदृढ व निरोगी बनतात.

२) नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह व ‘ब’ जीवनसत्त्वाचा साठा भरपूर प्रमाणात असल्याने गर्भवती व बाळंतिणीच्या आहारामध्ये तिचा वापर नियमित करावा. बाळाच्या पोषणामुळे गर्भवतीला व बाळंतिणीला शरीरामध्ये कायमच कॅल्शिअमची कमतरता भासते. ही कमतरता भरून काढण्यासाठी व हाडांची झीज रोखण्यासाठी आहारामध्ये कायम नाचणीची भाकरी गायीचे साजूक तूप लावून खावी. तसेच दुधामधून नाचणीसत्त्वाची खीर बनवून खावी.

३) अति कष्टाची कामे असणाऱ्यांनी नाचणीची भाकरी आहारामध्ये आवर्जून खावी. यामधून अगदी कमी किमतीत शरीराचे पोषण करणारे सर्व घटक मिळतात. ‘स्वस्त आणि मस्त’ या उक्तीप्रमाणे गरिबांचे धान्य म्हणून नाचणीचा उल्लेख केला जातो.

४) मधुमेही रुग्णांमध्ये अनेक वेळा ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी नाचणीचा आहारामध्ये उपयोग करावा.

५) मूळव्याधीतून रक्त पडत असेल, तर ते थांबविण्यासाठी व रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नाचणीची पेज करून त्यामध्ये गायीचे तूप टाकून ती प्यावी. नाचणीच्या स्तंभक गुणधर्मामुळे मूळव्याधीतून रक्त पडण्याचे लगेचच थांबते.

६) लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी स्थूलता कमी करण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात उपयोग करावा. नाचणी खाल्ल्यामुळे तिचे सावकाश पचन होते. परिणामी भूक लवकर लागत नाही. तसेच तिच्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असून, कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरास आवश्यक ते पोषक घटक मिळून वजन कमी व्हायला मदत होते.

७) अंगावर बेंड आले असेल, तर ते पिकण्यासाठी नाचणीच्या पिठाचे पोटीस बांधावे. यामुळे बेंड लवकर पिकून ते फुटते.

८) रक्ताची कमतरता असणाऱ्या अशक्त रुग्णांनी, तसेच अपंग असणाऱ्या व्यक्तींनी नाचणीसत्त्व दुधात उकळून घ्यावे. यामुळे शरीरास शक्ती मिळून उत्साह निर्माण होतो.

९) नाचणीच्या पानांचा रस त्वचेवर लावल्यास त्वचेवरील जखमा, व्रण, फोड, खरूज, त्वचाविकार बरे होतात.

१०) वृद्ध व्यक्तींची हाडे कमजोर झाली असतील किंवा एखादे हाड मोडले असेल, तर ते भरून येण्यासाठी नाचणीसत्त्व दुधात उकळून सकाळ-संध्याकाळ दोन वेळा प्यावे.

हेही वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४x ७ कार्यरत असणारे पथक माहीत आहे का ? ‘निर्भया पथक’ म्हणजे काय ?

सावधानता :

सहसा नाचणीची भाकरी गायीचे साजूक तूप लावून खावी. नाचणीसत्त्व तयार करताना तिला प्रथमतः मोड आणून ती वाळवून दळून आणून त्यामध्ये दूध व साखर टाकावी. यामुळे नाचणीचे गुणधर्म दुप्पट प्रमाणात वाढतात.

(dr.sharda.mahandule@gmail.com)