लहानपणी आपण आजी-आजोबांकडून अनेक कथा ऐकल्या असतील. आई-वडील आणि घरातील वडीलधारी मंडळीही मुलांना गोष्टी सांगतात. कथा सांगण्याची ही प्रथा शतकानुशतके चालत आली आहे, मात्र गेल्या काही वर्षांत या कलेला रोजगाराची जोडही मिळाली आहे. यूट्यूबनेही या कलेला नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. कथाकथन करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींसाठी आज नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. कथाकथनातून नावारुपास आलेलं नाव म्हणजे फौजिया दास्तानगो. फौजिया देशातील पहिल्या महिला कथाकार (स्टोरीटेलर) आहेत. जाणून घेऊया तिचा प्रेरणादायी प्रवास.
हेही वाचा- ‘त्या’ एका क्षणानं बदललं आयुष्य, डॉक्टर अक्षिता गुप्ता ते IAS अधिकारीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
फौजियाचे वडील मोटारसायकल मेकॅनिक होते. फौजिया घरी आणलेल्या प्रत्येक पुस्तकातील सगळ्या कथा वाचायची. जेव्हा तिची आई तिला उर्दूतील कथा वाचून दाखवायची तेव्हा फौजिया त्या खूप लक्षपूर्वक ऐकायची. किस्से ऐकत मोठी झालेल्या फौजिया कथाकथनाच्या कलेत पारंगत झाली आणि आज तिचे नाव देशातील सर्वोत्तम उर्दू कथाकारांमध्ये घेतले जाते.
हेही वाचा- ईशा अंबानीपासून अनन्या बिर्लापर्यंत: ‘ह्या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील यशस्वी उद्योजिका
फौजियाची कथाकथनाची शैली वेगळी आहे. तिच्या कथांमध्ये थरार आणि एक प्रकारची जादू असते. १३ व्या शतकात उदयास आलेली कथाकथनची कला फौजियाने आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या एका शोसाठी फौजिया ६ महिने अगोदरपासूनच तयारी करत असते.
हेही वाचा- ‘माझ्या उमेदीच्या काळात बॉलिवूड ‘स्टीरिओटिपिकल’च होतं!’- अभिनेत्री नीलम कोठारी-सोनी
फौजियाला तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. अनेकदा तिच्यावर टीकाही करण्यात आली. सुरुवातीला तिच्या कथा ऐकायला लोक येत नव्हते, पण तिने हार मानली नाही. फौजियाने कथा सांगण्याच्या आपल्या पद्धतीवरुन हळूहळू लोकांची मने जिंकली. फौजियाने आपले संपूर्ण आयुष्य कथाकथनाच्या कलेसाठी समर्पित केलं आहे. कथाकनच्या क्षेत्रातील फौजियाचा प्रवास अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायक आहे.