राधिका घई, तिच्या शॉपक्ल्यूज [ShopClues] मार्केटप्लेससह प्रतिष्ठित ‘युनिकोर्न क्लब’मध्ये सामील झाली असून, या क्लबमध्ये नाव झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. जे स्टार्टअप्स अब्ज-डॉलर किंवा बिलियन डॉलरच्या घरात पोहोचतात तेव्हा त्यांना युनिकोर्न क्लब म्हटले जाते. राधिकाच्या शॉपक्ल्यूजचे मूल्यांकन तब्बल १.१ बिलियन डॉलर्सवर [९१ अब्ज अंदाजे] पोहोचले आहे. राधिकाने मिळवलेले एवढे प्रचंड यश हे तिची कुशलता, हुशारी आणि बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी तर दाखवून देतेच; मात्र त्याच्या जोडीने व्यावसायिक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठीही तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते.

राधिकाचा प्रवास हा २०११ साली सुरू झाला. या प्रवासाची सुरुवात तिने संजय सेठी आणि संदीप अग्रवाल यांच्यासोबत मिळून शॉपक्लूजची सह-स्थापना करण्याने केली. शॉपक्लूजचे उद्दिष्ट हे भारतातील विविध व्यवसाय, बाजार ऑनलाइन घेऊन येणे आणि लहान शहरांमधील ग्राहकांना पुरवणे असे होते. या प्लॅटफॉर्मला मिळालेल्या भरघोस यशामुळे २०१६ साली त्यांना युनिकोर्नचा दर्जा प्राप्त झाला होता.

savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
swiggy employee stock option scheme
स्विगीचे ५०० कर्मचारी कोट्याधीश
syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

हेही वाचा : ‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

सौंदर्य आणि आरोग्य या उद्योग क्षेत्रांमधील क्षमता लक्षात घेऊन राधिकाने २०२१ साली काइंडलाईफ [Kindlife] लाँच केले. ही नवीन आणि आधुनिक इको-सिस्टीम होती, जी इ-कॉमर्स आणि कम्युनिटी बिल्डिंग तसेच ब्रँड कोलॅब्रेशनवर भर देते. गोल्डमन सॅचेस आणि नॉर्डस्ट्रोम येथे केलेल्या कामामुळे राधिकाचे उद्योजकीय कौशल्य वृद्धिंगत झाले.

एक मार्गदर्शक आणि गुंतवणूकदार म्हणून पुढील पिढीच्या उद्योजकांना, विशेषतः महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी राधिका कायम तत्पर असते. व्यवसायी जगात तिच्या कामाला अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. यामध्ये तिला सीईओ ऑफ द इयर आणि आउटलुक बिझनेस वुमन ऑफ वर्थ अशा पुरस्कारांनी नावाजले आहे.

हेही वाचा : अपघात, १४ सर्जरी अन् मोडलेला संसार; तरीही जिद्दीने बनली IAS अधिकारी! पाहा प्रीतीची प्रेरणादायी गोष्ट

राधिकाचा एक युनिकोर्न कंपनी स्थापन करण्याचा हा प्रवास मेहनत, कष्ट आणि जिद्द यांचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. राधिका तिचा प्रवास सुरू ठेवत, नवनवीन शोध आणि कल्पनांवर काम करतच राहील, मात्र तिच्या या कामगिरीने भावी पिढीतील उद्योजकांसाठी एक प्रचंड मोठे उदाहरण आणि वारसा मागे ठेवला आहे.