Who is Mohana Singh Indian Women First Women Fighter Pilot: भारतीय हवाई दलाच्या प्रतिष्ठित १८ फ्लाइंग बुलेट स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग यांनी इतिहास रचला आहे. मोहना सिंग यांनी स्वदेशी विकसित LCA तेजस हे लढाऊ विमान चालवले. जोधपूरमध्ये झालेल्या तरंग शक्ती सरावादरम्यान त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. हा सराव मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमेरिका, ग्रीस, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासह जगभरातील प्रमुख हवाई दलांचा सहभाग होता. २०१६ च्या धोरणातील बदलानंतर भारतीय हवाई दलात आता सुमारे २० महिला फायटर पायलट आहेत, ज्यांनी महिलांना लढाऊ क्षेत्रात प्रवेश दिलाय. आता जाणून घेऊयात मोहना सिंग कोण आणि त्यांनी इथवर कशी मजल मारली?

मिग २१ चे केले होते उड्डाण

मोहना सिंग या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक आहेत. त्यांनी मिग २१ चे उड्डाण केले होते. नंतर त्या गुजरातच्या नलिया हवाई तळावर प्रतिष्ठित फ्लाइंग बुलेट्स स्क्वाड्रनमध्ये सामील झाल्या. २०१९ मध्ये दिवसा हॉक विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक बनून त्यांनी इतिहास रचला होता. सहकारी अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्याबरोबर त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन २०२० मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हेही वाचा >> फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंहने रचला इतिहास, हॉक विमान उडवणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक

कोण आहेत मोहना सिंग?

जानेवारी १९९२ मध्ये झुंझुनू, राजस्थान येथे जन्मलेल्या मोहना सिंग यांना कुटुंबातूनच लष्करी कामाचं बाळकडू मिळालं आहे. त्यांचे वडील प्रताप सिंग जितरवाल हे सेवानिवृत्त IAF मास्टर वॉरंट अधिकारी आहेत आणि त्यांच्या आजोबांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कौटुंबिक लष्करी पार्श्वभूमीने प्रेरित होऊन, सिंह यांनी लहानपणापासूनच लढाऊ पायलट बनण्याची आकांक्षा बाळगली. शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत प्राविण्य मिळवूनही , लढाऊ विमाने उडवण्याचे त्यांचे स्वप्न कायम राहिले.

२०१६ मध्ये, मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्याबरोबर भारतीय वायुसेनेच्या लढाऊ पायलट कार्यक्रमात सामील झालेल्या पहिल्या महिलांपैकी एक बनल्या. लष्करातील दीर्घकालीन लिंगभेद दूर करून त्यांनी महिलांसाठी करिअरची नवे कवाडे उघडून दिली. सिंग यांनी तेलंगणातील हकीमपेट येथील आयएएफ तळावर व्यापक प्रशिक्षण घेतले, उच्च तीव्रतेच्या लढाऊ भूमिकांमध्ये त्यांनी पुरुष सहकाऱ्यांबरोबर सेवा करण्याची तयारी दर्शवली.

२०१९ मध्ये त्यांनी IAF मध्ये हॉक Mk.१३२ प्रगत जेट ट्रेनरवर संपूर्ण ऑपरेशनल स्थिती प्राप्त करणारी पहिली महिला लढाऊ पायलट बनली. सिंग यांनी तोपर्यंत ३८० तासांहून अधिक अपघातमुक्त उड्डाण केले होते, एअर-टू-एअर आणि एअर-टू-ग्राउंड दोन्ही लढाऊ पद्धतींमध्ये प्रभुत्व मिळवले होते. IAF ने म्हटल्याप्रमाणे, “त्यांनी अनेक सराव मोहिमा हाती घेतल्या आहेत ज्यात रॉकेट, तोफा आणि उच्च-कॅलिबर बॉम्ब टाकणे यांचा समावेश आहे आणि विविध हवाई दल-स्तरीय उड्डाण सरावांमध्ये भाग घेतला आहे.”

महत्वाकांक्षी महिला पायलटसाठी एक आदर्श

मोहना सिंग यांच्या कर्तृत्वाचा विस्तार कॉकपिटच्या पलीकडे आहे. ९ मार्च २०२० रोजी त्यांच्या अग्रगण्य सहकारी अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्यासह, तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने भारताच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक म्हणून त्यांच्या उत्कृष्ट भूमिका आणि राष्ट्रीय संरक्षणातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल त्या म्हणाल्या, “नारी शक्ती पुरस्कार… हा पुरस्कार मिळाल्याने आम्हाला विशेष आणि सन्मानित वाटत आहे कारण ही केवळ राष्ट्रसेवा करत राहण्याची आम्हाला प्रेरणा नाही तर इतर महिलांसाठीही प्रेरणा आहे.”