-केतकी जोशी

भारतीय सैन्यात विविध पदांवरील महिला जवान आणि अधिकारी ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर सैन्यदलातील नारीशक्तीच्या सामर्थ्याचं यथार्थ दर्शन घडलं आहे. त्यातच सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी एक घटना नुकतीच घडली आहे. याला कारणीभूत ठरल्या आहेत प्रीती रजक. प्रीती रजक यांना लष्करानं नुकतीच सुभेदार पदावर पदोन्नती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सैन्यामध्ये सुभेदारपद मिळवणारी प्रीती रजक ही पहिलीच महिला ठरली आहे.

woman from Buldhana missing after Prayagraj stampede has been found in Varanasi
कुंभमेळ्यात बेपत्ता महिला सापडली, वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत; पालकमंत्र्यांनीही…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video of girls undergoing training in Shivkalin martial art
Video : “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा” लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी, व्हिडीओ एकदा पाहाच
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर परिचय मेळावा नागपुरात
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर

प्रीती चँपियन ट्रॅप शूटर आहेत. त्यांच्या खेळातील कर्तृत्वामुळेच त्यांना लष्करात सन्माननीय प्रवेश देण्यात आला होता. त्यांची लष्करात हवालदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. चीनमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई स्पर्धेमध्ये महिलांच्या गटात प्रीती रजक यांनी भारतासाठी रौप्य पदक पटकावलं होतं. सध्या ट्रॅप शूटींगमध्ये प्रीती भारतात सहाव्या स्थानावर आहेत. त्यांच्या उत्तम खेळामुळे लष्करानं त्यांना थेट पदोन्नती दिली. सहसा सैनिकांना १८ ते २० वर्षांच्या कालावधीत केडर व कनिष्ठ लीडर्सच्या (junior leaders) प्रावीण्य चाचणीचे निकष पार केल्यानंतरच ‘जेसीओ’ म्हणजे ‘ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर’ची पदोन्नती दिली जाते. याआधीही राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या अनेक खेळाडूंना लष्करात थेट हवालदार पद देण्यात आलं होतं. तसंच सैन्यात सहसा शस्त्रास्त्रं व सेवा क्षेत्रात महिलांना अन्य रँकवर नियुक्त केलं जात नाही. सैन्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या महिलांना आता ‘अग्निवीर सीएमपी’चा पर्याय आहे. एखाद्या महिला खेळाडूला सुभेदारपद देणं हे मात्र लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.

आणखी वाचा-वडिलांना लहानपणीच गमावले, आई शेतावर मजूर; क्लास न लावता बनलेल्या IAS अधिकारीचा खडतर प्रवास पाहा..

प्रीती रजकला देण्यात आलेलं पद हे भारतीय सैन्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणींसाठी प्रोत्साहनपर ठरु शकतं. त्याशिवाय शूटींगसारख्या खेळात करिअर घडवण्यासाठीही अनेक मुलींना हुरूप येईल. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये नारीशक्तीच्या गौरवाचं हे प्रतीक आहे, असं लष्करातर्फे म्हटलं आहे. प्रीती यांना देण्यात आलेल्या या पदामुळे देशभरातील तरुणींना भारतीय लष्करात महिलांसाठीही अमर्याद संधी उपलब्ध आहेत हे लक्षात येईल, असंही लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे.

सुभेदार प्रीती रजक २२ डिसेंबर २०२२ रोजी लष्करी पोलीस कॉर्प्समध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शूटींगमध्ये स्वत:चं नैपुण्य सिध्द केलं आणि नेमबाजी क्षेत्रातील खेळाडू म्हणून लष्करात हवालदार पदावर नियुक्त झाल्या. प्रीती मूळच्या मध्य प्रदेशातील इटारसीच्या आहेत. कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय. त्यांचे वडील दीपक यांचा ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय आहे, तर आई ज्योत्स्ना सामाजिक कार्यकर्ती आहे. प्रीती यांना एक मोठी बहीणही आहे. तीच त्यांची पहिली प्रशिक्षक. प्रीती यांच्या वडिलांना खेळाची खूप आवड आहे. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती नसतानाही वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी २०१५ मध्ये नेमबाजीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. मध्य प्रदेशच्या क्रीडा अकादमीमध्ये प्रशिक्षक इंद्रजित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती यांनी प्रशिक्षण घेतलं.

आणखी वाचा-बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा? 

संघर्ष करावा लागला तरी प्रीती यांनी खेळाच्या प्रशिक्षणातलं सातत्य सोडलं नाही. कितीही अडथळे आले तरी नेमबाजीचा सराव करत राहिल्या. करोनामुळे मात्र त्यांचा प्रत्यक्ष स्पर्धांच्या जगातला प्रवेश दोन वर्षांनी लांबला. स्वयंशिस्त आणि ‘जे करायचं ते सर्वोत्तम’च या ध्यासामुळे प्रीती यांनी नेमबाजीत प्रावीण्य मिळवलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी त्यांना मिळाली. चीनमध्ये आशियाई स्पर्धेत त्यांनी घवघवीत यश मिळवलंच, पण त्याचबरोबर अझरबैजान, इजिप्त, कझाकस्तान आणि कतार इथल्या स्पर्धांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं. आता ऑलिंपिकमध्ये देशाला नेमबाजीत पदक मिळवून देणं हेच त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी सध्या प्रीती यंदा पॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी कसून प्रयत्न करत आहेत.

आपल्याकडे मुली क्रीडा क्षेत्रात करिअर करु शकतात याचाच गांभीर्यानं विचार केला जात नाही. त्यामुळे खेळात करिअर करण्याची इच्छा असूनही कितीतरी जणींचं करिअर सुरु होण्याआधीच संपतं. दुसरीकडे देशसेवेची इच्छा असलेल्या मुलींसाठीही आता आता सैन्यात संधीची दारं उघडली आहेत. अशा वेळेस खेळातून देशसेवेपर्यंतचा प्रीती यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

lokwomen.online@gmail.com

Story img Loader