प्राची पाठक

आजकाल दुचाक्या चालवणाऱ्या, कार चालवणाऱ्या कितीतरी मुली, स्त्रिया रस्त्यावर दिसतात. त्याच वेळी मुलींनी ‘बाईक’ चालवायची ‘क्रेझ’ वाटणारे भरपूर लोक आजही देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. याचाच अर्थ, वर्षानुवर्षं वाहनं चालवणाऱ्या स्त्रिया एकीकडे आहेत आणि आजही साधी सायकल हातात येऊ न शकणाऱ्या मुलीबाळीसुद्धा एकीकडे आहेत. एखादी मुलगी एखादं वाहन चालवते आहे, याचं अप्रूप असलेला समाज आपल्याकडे आहे. म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक बदलांच्या टप्प्यावर असलेला, विविध पैलू असलेला आपला समाज आहे. कार चालवता येणं हे बाईसाठी आजही अनेक ठिकाणी धाडसाचं काम मानलं जातं. कित्येक स्त्रियांना गाडी रस्त्यावर चालवायचा आत्मविश्वास नसतो. गाडी चालवण्यात अप्रूप नसलेल्या, चांगला सराव असलेल्या बहुसंख्य स्त्रिया अगदी स्कार्फ वगैरे बांधून दुचाकी चालवतात. स्वतःच्या त्वचेची किती काळजी घेतात. जरा ऊन लागायला नको. धूळ, कचरा नको. पण ज्या गाडीवरून त्या फिरतात, ती गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजला थांबलेली, चाकाचं पंक्चर काढायला आलेली, स्वतःची गाडी स्वतः दुरुस्त करणारी, कारला पार्किंगमध्ये जाऊन फडकं मारणारी एक तरी मुलगी, बाई वरचेवर दिसते का कधी?

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

अगदी तुरळक अपवाद असतात. नाही असं नाही. परंतु, ते अपवादच असतात. अशा स्त्रियांची संख्या अगदी हळूहळू वाढत आहे. काही बायका म्हणतील, ‘आम्हाला घरातच इतकी कामं असतात. त्यात अजून दुरुस्त्या शिकलो, तर तेही काम आमच्याच माथी पडेल!’ किंवा एक ठरलेलं वाक्य असतं- ‘मुलीच्या जातीला हे जमत नाही. कितीही झालं, तरी शरीरात फरक असतो स्त्री-पुरुषाच्या. अशी ताकदीची कामं पुरुषांचीच!’ खरंतर, स्नायू ऊर्जेतला थोडाफार फरक सोडला, तर या मुद्द्यात विशेष तथ्य नाही.

बाईनं घराबाहेर एक पाऊल टाकलं, तर पुरुषानं घरात एक पाऊल टाकायला हवंय, हेही खरं आहेच. परंतु, हे म्हणताना स्त्री, पुरुष सर्वांनीच ‘टूल्स फ्रेंडली’ होणं अतिशय गरजेचं आहे. पुरुषांनी स्वयंपाक केला पाहिजे, घरकामात मदत केली पाहिजे, हे जेव्हा वरचेवर बोललं जातं, तेव्हा स्त्रियांनीही लहानमोठ्या दुरुस्त्या, जबाबदाऱ्या आपल्या आपण निर्णय घेऊन पार पाडल्या पाहिजेत. तशी जाणीव झाली पाहिजे. पैसे देऊनही छोट्या-मोठ्या दुरुस्त्या करून घेता येतात. भलेही स्वतः करू नका ते. पण अगदी लहानसहान गोष्टींकरता ‘बाई माणसाला काय हे येणार?’ म्हणत पुरुषांवर अवलंबून राहणं सोडायला हवंय.

जागोजागी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करणारी तरुण मुलांची/ पुरुषांची दुकानं, आउट्लेट्स दिसतात. अगदी लहानातल्या लहान तालुक्यातदेखील ती दिसतात. मोबाईल दुरुस्त करणाऱ्या तरुण मुलीचं दुकान का नाही दिसत? मिक्सर बिघडला, घरातले नळ बिघडले, दिवे उडाले, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या, मायक्रोवेव्ह नीट चालत नाही, मोबाईल खराब झाला, फ्रिजचे अमके आणि टीव्हीचे तमके पार्ट बिघडले… किती काय-काय सतत बिघडत असतं घरात. पुरुषांनासुद्धा या सगळ्या दुरुस्त्या काही जन्मजात येत नसतात. अंगावर पडतात, म्हणून चौकसपणे निदान त्या कुठे दुरुस्त होतात ते तरी शोधावं लागतं. जर, तितकंच काम करायचं आहे, माणूस नेमून दुरुस्ती करून घ्यायची आहे, तर आपणच का नाही घ्यायचा तो पुढाकार? जसजशी अशा दुकानात स्त्रिया दिसायची संख्या वाढेल, तसतसं तिथे जाणं सहजच होईल. भीती वाटणार नाही. त्या-त्या विषयातल्या वस्तूंची टेक्निकल नावं कळतील. पैशांचा व्यवहार कळू लागेल. त्या त्या विषयांची सवय होईल. त्या त्या दुरुस्त्या करणाऱ्या पुरुषांनादेखील स्त्रीकडून ऑर्डर मिळायची सवय होईल. बाई मालकीण असू शकते, तिच्या नावावर आणि तिची अशी संपत्ती असू शकते, तिला विविध विषयातलं बरंच काही कळू शकतं, याची फारशी सवयच पुरुषांना नाही. अगदी स्त्रियांनाही नाही. कोणतंही काम हे ‘जेंडर’पलीकडे करता आलं पाहिजे. ‘हे काम बाईचं, हे काम पुरुषाचं,’ या वैचारिक भिंती आणि मर्यादा तोडल्या पाहिजेत. भलेही ते काम तुम्ही दरवेळी स्वतः करू नका. परंतु, ते काम मुळात असतं काय, त्याचं आर्थिक गणित कसं असतं, कोण लोक ते कशाप्रकारे नीट दुरुस्त करू शकतात, याची किमान माहिती तर आपल्याला हवीच. तुम्हाला काय वाटतं?…

lokwomen.online@gmail.com

prachi333@hotmail.com