गुगलने देखील प्राचीच्या कार्याची दखल घेऊन तिने केलेल्या कामाविषयी एक जाहिरात बनवली. ही जाहिरात पाहून भारतातील अनेक लोक या ॲपशी जोडले गेले. या ॲपच्या माध्यमातून जोडले गेलेल्या लोकांनी स्वत:च्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून २५ लाख कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक लाख झाडे लावल्याने जेवढं कार्बन उत्सर्जन कमी होईल ते ‘कूल द ग्लोब’ या ॲपनं करून दाखवलं आहे.

पर्यावरणाविषयी सजग असलेल्या लोकांना प्राची शेवगांवकर’हे नाव तसं नवखं नाही. शार्क टँक इंडियामुळे आता हे नाव घरोघरी पोहोचलं आहे. जग जितक्या झपाट्याने प्रगती करत आहे, तितक्याच झपाट्यानं प्रदूषण, जागतिक तापमान वाढ या समस्या संपूर्ण जगालाच भेडसावत आहेत. वातावरणात झपाट्यानं होणारे बदल तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक देश, अनेक संस्था, शास्त्रज्ञ यांचे जागतिक पातळीवर प्रयत्न चालू आहेत. सर्वसामान्य माणूसही दैनंदिन जीवनात यावर फक्त चर्चा करतो, पण काहीच कृती करत नाही. मात्र ही समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील एक तरुणी पुढे आली तिचं नाव प्राची शेवगांवकर. तिनं ‘कूल द ग्लोब’ या ॲपची निर्मती करून ग्लोबल वार्मिंग कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल उचललं आहे. प्रदूषण कमी करण्याच्यादृष्टीने आपण स्वत: काय काय करू शकतो या विचारातून प्राचीला ‘कूल द ग्लोब’ या ॲपची कल्पना सुचली. म्हणजे रोजच्या जीवनातील गरजेची, पण कोणती अनावश्यक गोष्ट न केल्यास किती कार्बन उत्सर्जन कमी होईल किंवा बाहेर जाताना चालत गेल्यास, सायकलने गेल्यास किंवा लांब जायचे झाल्यास खाजगी वाहनाने न जाता सरकारी वाहनाने गेल्यास किती कमी कार्बन उत्सर्जित होईल. तसंच झाडे लावणे वगैरे गोष्टींचा त्यात समावेश आहे.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rbi Sanjay Malhotra
‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

हेही वाचा : Election 2024 : पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान अधिक, यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या का वाढली?

संयुक्त राष्ट्रांतर्फे हवामान बदलावरील चर्चेसाठी जागतिक परिषद भरवली जाते. २०२२ साली इजिप्त येथे झालेल्या या परिषदेत प्राचीने भारताचं नेतृत्व करत एक अनोखा प्रयोग सादर केला होता. आपल्या दैनंदिन जीवनातही प्रदूषणाला कशा प्रकारे आळा घालू शकतो, पर्यावरण संरक्षण करू शकतो हे तिनं तयार केलेल्या ॲप मधून दाखवून दिलं.

प्राचीचं ‘कूल द ग्लोब’ हे ॲप आजमितीस जगभरात १०० हून अधिक देशांमध्ये २५ हजाराच्या वर लोक वापरत आहेत. या ॲपच्या सहाय्याने आजपर्यंत २५ लाख किलो कार्बन उत्सर्जित कमी करण्यास मदत झाली आहे.

शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनमध्येदेखील प्राचीनं सहभाग घेऊन अमन गुप्ता व राधिका गुप्ता यांनी ‘कूल द ग्लोब’ या ॲपमध्ये गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा : सिंगापूरमध्ये उभारली शाळा, सुरू केला ‘३३० कोटी’ रुपयांचा स्टार्टअप! जाणून घ्या कोण आहे ही भारतीय इंटरप्रेन्योर?

जागतिक तापमानवाढ कमी करण्याच्या दृष्टीनं उचललेल्या पावलानं प्राचीला हिंदू बिझनेसलाईन चेंजमेकर तर्फे २०२२ साली क्लायमेट ॲक्शन वॉरियर, COP27 यंग स्कॉलर अवॉर्ड असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊ गौरविण्यात आले आहे. तसंच प्राचीनं ग्लोबल वार्मिंगसंबंधित जागतिक पातळीवरच्या अनेक परिषदांमध्ये देशाचं नेतृत्व केलं आहे. तिच्या या कामाची दखल घेऊन सोशल इम्पॅक्ट म्हणून फोर्ब्स मासिकाने २०२४ आशियामधील तीसवर्षा खालील वयाच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिनं स्थान पटकावलं आहे.

हेही वाचा : रेखा लोहानी पांडे : उत्तराखंडमधील पहिली महिला टॅक्सी चालक

गुगलने देखील प्राचीच्या कार्याची दखल घेऊन तिने केलेल्या कामाविषयी एक जाहिरात बनवली. ही जाहिरात पाहून भारतातील अनेक लोक या ॲपशी जोडले गेले. या ॲपच्या माध्यमातून जोडले गेलेल्या लोकांनी स्वत:च्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून २५ लाख कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक लाख झाडे लावल्याने जेवढं कार्बन उत्सर्जन कमी होईल ते ‘कूल द ग्लोब’ या ॲपनं करून दाखवलं आहे. प्राची सांगते की, कार्बन उत्सर्जन कमी करणं ही एक निव्वळ जबाबदारी नसून, जगाला वाचवण्याची संधी आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ, जागतिक संस्थांची गरज नाही. तुम्ही आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल करून हे करू शकतो.

Story img Loader