‘आई’…या एका शब्दात जग जिंकण्याची ताकद असते असं म्हणतात. पण, हीच ‘आई’ जेव्हा आयुष्यात हरते तेव्हा काय होतं… याची प्रचिती तमाम मुंबईकरांना १९ जुलैला आली. रेल्वे ट्रॅकवरून चालताना एका महिलेचं चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातातून निसटलं आणि नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलं… ‘त्या’ आईच्या आक्रोशामुळे संपूर्ण मध्य रेल्वे जवळपास ३ ते ४ तास ठप्प झाली.

हेही वाचा : “एवढं शिक्षण घेऊन ‘डिग्री’ रुखवतात ठेवणार का?”… या लोकांचं काय करायचं?

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

निमुळत्या वाटेने जाताना आजोबांच्या हातातून अचानक बाळ निसटलं अन् वाहून गेलं… अशा बातम्या काल दुपारी सर्वत्र प्रसारित होऊ लागल्या आणि सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. पण, या सगळ्यात त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल, याचा विचार खरंच कोणी केला का? “एवढ्या पावसात ती उतरलीच का? चूक त्या महिलेची आहे” अशा बऱ्याच प्रतिक्रिया मी स्वत: वाचल्या. या सगळ्यांना एकच प्रश्न विचारेन तिच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? २ तास रखडलेली ट्रेन पुढे सुरु होणार की नाही याची शाश्वती नव्हती. प्रत्येकजण ट्रेनमधून उतरत होता. बरं मुंबईपेक्षा कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती पावसामुळे फार वाईट होती, अशावेळी त्या आईने काय करणं अपेक्षित होतं?

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?

जीवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी ती माऊली आक्रोश करत होती. तिथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे त्या आईला पाहून पाणावले होते. बाळ सापडल्याशिवाय ती महिला तिथून निघायला तयार नव्हती. नाल्याच्या दिशेने उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. त्या महिलेनं तिचं आईपण सिद्ध करण्यासाठी अजून काय पुरावा द्यावा? बरं सोशल मीडियावर ज्ञान पाझळणाऱ्यांना एका आईचं दु:ख ते कसं काय कळणार?

हेही वाचा : बायकोला मारणाऱ्या पुरूषांना धोपटणारी स्त्रियांची ‘ग्रीन आर्मी’!

समाजासाठी ते बाळ फक्त ४ महिन्यांचं होतं. पण, त्या आईने ४ महिन्यांचं बाळ, ९ महिने ९ दिवसांचा सहवास, त्या वेदना, बाळासाठी पाहिलेली स्वप्न सारं काही एका क्षणात गमावलं. बाळ हातातून निसटल्यावर त्या आईचं काय झालं असेल? याबद्दल विचार केल्यावरही मन सुन्न होतं. आज त्या महिलेच्या मनात अपराधीपणाची भावना असेल. आपल्या पोटच्या गोळ्याला आपण सांभाळू शकलो नाही याची खंत असेल आणि आपलं बाळ नक्की परत मिळेल असा तो एक आशेचा किरण अजूनही जिवंत असेल. ती आई भविष्यात स्वत:ला कशी सावरेल याची खरंच काळजी वाटते.

आज कित्येकजण स्वत:ची मतं सांगतील, काहीजण बाळाच्या आजोबाला दोष देतील, त्या महिलेला जबाबदार ठरवतील. याउलट काही लोक सरकारी यंत्रणा, मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित करतील… काहीजण थोडेसे हळवे होतील हे सगळं पुढचे ४ ते ५ दिवस जास्तीत जास्त एक महिना लोक लक्षात ठेवतील. त्यानंतर काही दिवसांनी सगळेजण ही घटना विसरुन जातील. पण, त्या आईचं दु:ख मात्र जन्मभर तसंच राहील!