जगभरात श्रीमंत व्यक्तींची कमी नाही. दरवर्षी जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या नावाची यादी जाहीर केली जाते. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका श्रीमंत महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींनाही मागे टाकले आहे. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स असे त्या महिलेचं नाव आहे. १०० अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स?

फ्रान्सची रहिवासी असलेली फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्या १२ व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी ९७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १३ व्या क्रमांकावर आहेत. मात्र, बेटेनकोर्ट मेस यांच्याकडे अंबानींपेक्षा जास्त संपत्ती आहे. मेयर्स या प्रख्यात सौंदर्य प्रसाधन कंपनी L’Oréal च्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच L’Oreal ची होल्डिंग कंपनी Tethys च्या त्या अध्यक्षा आहेत.

हेही वाचा- ५४ वर्षांनी घडला इतिहास, CISF ची कमान महिलेच्या हाती; कोण आहेत नीना सिंग?

मेयर्स व त्यांच्या कुटुंबाकडे L’Oreal कंपनीतील ३४ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. जगातील सर्वात श्रीमंत महिला असण्यासोबतच मेयर्स एक लेखिकाही आहेत. L’Oreal कडे Lancome आणि Garnier सारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडची मालकी आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये कंपनीचा महसूल ४१.९ अब्ज डॉलर होता. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, ७० वर्षीय ??? मायाज ??? यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत २८.६ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मेयर्स यांचे नाव असतेच, परंतु पहिल्यांदाच त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

हेही वाचा- जन्मतः अपंग, १५ वेळा जीवघेणा हल्ला, आठ जणांकडून बलात्कार; पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या सुनीता कृष्णन यांचा सामाजिक लढा वाचाच!

मेयर्स यांना ही संपत्ती त्यांची आई लिलियन बेटेनकोर्ट यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे. आईच्या निधनानंतर मेयर्स L’Oreal कंपनीच्या अध्यक्षा बनल्या. मेयर्स यांचे आजोबा यूजीन श्युलर यांनी L’Oreal ब्रँड सुरू केला. मेयर्स १९९७ पासून लॉरिअलच्या संचालक मंडळावर आहेत. मेयर्स या फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. बर्नार्ड आरनॉल्ट हे फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बर्नार्ड जागतिक लक्झरी वस्तू उत्पादन कंपनी LVMH चे अध्यक्ष आहेत. बर्नार्ड यांची एकूण १७९ अब्ज डॉलर आहे. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत १६.९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Francoise bettencourt meyers become first woman in 100 billion dollar fortune dpj
Show comments