सुदृढ, निरोगी, घट्ट मैत्री ही मानवी नातेसंबंधांमध्ये फार वरच्या स्थानावर असते. अपेक्षाविरहित आणि निर्व्याज मैत्रीसारखं दुसरं वरदान नाही. जेव्हा दोन भिन्नलिंगी मित्रांचं नातं ‘फक्त मैत्री’च्या पल्याड जातं तेव्हा ते प्रेमी युगल होतं. आपला बेस्ट फ्रेंडच आपला आयुष्यभराचा जोडीदार होणार असेल तर फारच उत्तम, पण हा असा योगायोग प्रत्येकाच्या बाबतीत जुळून येत नाही. बेस्ट फ्रेंड नंतर ‘बॉयफ्रेंड’ होतोच असं मुळीच नाही. अशा वेळी ही दोन्ही महत्त्वाची नाती व्यवस्थित सांभाळता न आल्यास नात्यात विनाकारण गैरसमज होऊन तडा जाण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
Toddlers strugglet to help family to sale Diwali diya heart touching video
VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
eknath shinde attack uddhav thackeray
आपटीबार : हल्ला पुरे!
Viral black cat vs golden retriever trend
Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Kajol
“तितकाच तिरस्कार…”, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर काजोलची प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्हाला या सगळ्याला…”

बेस्ट फ्रेंडला आपल्या मैत्रिणीबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल सगळे बारकावे माहीत असतात. तिच्या बारीकसारीक आवडीनिवडी, तिचे ‘वीक पॉइंट्स’, तिची बलस्थानं हे सगळं माहीत असतं. इतकंच काय, पण तिच्या बॉयफ्रेंड निवडीतदेखील त्याचं मत खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा बेस्ट फ्रेंड आपल्या मैत्रिणीला चुकीच्या नात्यापासून सावध करतो किंवा कुणाशी जवळीक वाढवली तर चालेल हे सुचवतो. इतकं सगळं होत असताना अनेक वेळा असे प्रसंग येतात, जेव्हा बेस्ट फ्रेंडला तिच्या मदतीची खूप गरज असते आणि नेमकं त्याच वेळी बॉयफ्रेंडनं दुसरा काही कार्यक्रम आखलेला असतो. अशा वेळी आपली खरी गरज नेमकी कुठे आहे हे समजून निर्णय घेता आलं पाहिजे. असे प्रसंग म्हणजे तिच्या आयुष्याच्या भावी जोडीदाराला जोखण्याचा काळ असतो. तिच्या निर्णयाचा आदर करणं त्याला जमलं आणि तिच्यावर विश्वास दाखवून तोही तिच्या मित्राच्या मदतीला धावला तर त्यांचा भावनिक बंध आणखी मजबूत होऊ शकतो. हेच भान तिच्या बेस्ट फ्रेंडलाही ठेवावं लागेल. आपण आपली मैत्रीण आणि तिचा भावी जोडीदार यांना त्यांची ‘स्पेस’ देणं गरजेचं आहे आणि आता ती पूर्वीसारखी आपल्याला वेळ देऊ शकणार नाही हे त्याला समजून घ्यावं लागेल. एक तर मी, नाही तर ‘ती’ (किंवा ‘तो’) अशी टोकाची असमंजस भूमिका घेऊन कसं चालेल? किंवा आपल्या बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंडवर सतत संशय घेऊन कसं चालेल? असं होऊ नये यासाठी नात्यात पुरेसा पारदर्शीपणा असायलाच हवा.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

शिवांगी आणि पराग हे अगदी बालवाडीपासूनचे मित्र. पराग गणितात कच्चा, तर शिवांगीचं केमेस्ट्रीशी वाकडं. त्या वेळी दोघांनी एकमेकांना कायम अभ्यासात मदत केली आणि दोघांनाही उत्तम यश मिळालं. कालांतराने पराग त्याच्या ऑफिसमधील तेजस्विनीच्या प्रेमात पडला. तेजस्विनीला पराग आणि शिवांगी यांच्या फार जुन्या मैत्रीबद्दल पूर्ण कल्पना होती, पण तरीही ती शिवांगीचा राग करू लागली. आपला बॉयफ्रेंड मैत्रीतदेखील कुणासोबत विभागून घेणं तिला सहन होत नव्हतं. पराग आणि शिवांगी यांचे शिक्षण आणि करियर आणि पूर्वीपासूनची मैत्री असल्यानं त्यांच्या सतत गप्पा, चर्चा होत. पराग तिचा सल्ला घेऊनच निर्णय घेतो याचा तिला प्रचंड राग येई. तेजस्विनी त्याच्याबाबतीत खूपच स्वामित्वाची भावना बाळगून होती. दोघांत बेबनाव होऊ लागला. शेवटी शिवांगीला आपल्या मित्राची हतबलता समजली आणि तिनं दुसऱ्या शहरात नोकरी मिळवून स्वतःला परागपासून दूर केलं. तेजस्विनीजवळ समजूतदारपणाचा अभाव होता, ज्यामुळे एका उत्कृष्ट नात्याचा हकनाक बळी गेला.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : लीना मोगरे – अनुभवच माझे मेन्टॉर्स

विभाला मात्र याच्या उलट अनुभव आला. तिचा बॉयफ्रेंड अनय इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. अनय आणि त्याची बालमैत्रीण काया यांची फार घट्ट मैत्री. कायाला जेव्हा जेव्हा अनयच्या मदतीची गरज असायची तेव्हा विभाने कधीही त्याला जाण्यापासून रोखलं नाही. तिला अनयवर आणि त्याच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास होता. एखाद्या मुलीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, ती मुलगी, तिचा बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड हे नात्याच्या त्रिकोणाचे असे तीन शिरोबिंदू असतात. त्यांना जोडणाऱ्या भुजा मजबूत असल्यास त्रिकोण अबाधित राहू शकतो अन्यथा जे नेहमी घडतं तेच होईल. तिचा बेस्ट फ्रेंड हळूहळू तिच्यापासून दूर होत जाईल. एक खूप छान विशुद्ध नातं संपुष्टात येईल.

आणखी वाचा : केस सरळ करण्यासाठी नेमका किती वेळा स्ट्रेटनर वापरावा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

आणखी एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लग्नानंतर हळूहळू विरत जाणारं बेस्ट फ्रेंडचं महत्त्व. दोन मुली किंवा दोन मुलगे जर बेस्ट फ्रेंड असतील तर बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडमुळे मैत्रीवर फारसा परिणाम होत नाही, परंतु भिन्नलिंगी अविवाहित मित्रमैत्रीण असतील तर भावी जोडीदारांना सोबत घेऊन ती मैत्री पुढे तशीच कायम राहाणे जरा कठीणच. कुठे सहज म्हणून ‘हँगआऊट’ करताना, नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना, सणावारी एकत्र भेटताना बॉयफ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड यापैकी कुणा एकाची निवड करायची झाल्यास बहुतांश वेळी बेस्ट फ्रेंड माघार घेतात, कारण आपल्या बेस्ट फ्रेंडच्या जुळत आलेल्या नवीन रेशीमगाठी किमान आपल्यामुळे तरी उसवू नयेत ही त्याची प्रामाणिक इच्छा असते.
adaparnadeshpande@gmail.com