Chinu Kala Success Story: स्वप्न पाहण्यासाठी हिंमत लागत नाही, पण ते पूर्ण करण्यासाठी खूप हिंमत लागते. मेहनत घेण्याची जर तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रात्रंदिवस मेहनत घेणारेच पुढे इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे चिनू काला. जाणून घेऊ उद्योजिका आणि रुबेन्स ॲक्सेसरीजच्या फाऊंडर चिनू काला यांचा संघर्षमय प्रवास…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी केवळ ३०० रुपये हातात घेऊन चिनू घराबाहेर पडली. अनेक अडचणींचा सामना केला, अगदी दोन दिवस मुंबईच्या रेल्वेस्थानकावर तिने रात्र काढली. पण, तिने हार मानली नाही आणि अखेर ती रुबेन्स ॲक्सेसरीजची मालक बनलीय.
घराबाहेर पडले खरं, पण आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, नाव कमवायचे हे चिनूने ठरवलं. सुरुवातीच्या काळात तिने सेल्सगर्लची नोकरी केली. तिने घरोघरी जाऊन चाकू, सुरे, कोस्टर सेट विकायला सुरुवात केली, त्यामुळे तिला रोजचे जीवन जगण्यासाठी मदत झाली. दिवसाला फक्त २० रुपये कमाई व्हायची, पण हेच आयुष्य नाही हे तिला कळून चुकले आणि तिने जीवापाड मेहनत घेतली.
यादरम्यान चिनू कालाने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने मार्केटिंगचा अभ्यास केला. व्यवसायातील खाचखळगे समजून घेतले. २००४ मध्ये चिनूने अमितशी लग्न केले, जो आता तिच्या रुबेन्समध्ये डायरेक्टरदेखील आहे.
यानंतर २००७ ला तिने ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्या १० अंतिम स्पर्धकांमधून ती दुसरी आली. तिचा पहिला क्रमांक आला नाही, पण यावेळी तिला दागिन्यांचे महत्त्व कळले. यात मॉडेलिंगमधून तिला चांगली कमाई मिळत होती, तरीही तिला माहीत होते की, यात आपल्याला दीर्घकालीन करिअर करता येणार नाही.
यावेळी व्यवसायाविषयीची समज आणि बाजारपेठेतील दागिन्यांचे महत्त्व लक्षात घेत चिून कालाने स्वत:चा एक ज्वेलरी ब्रँड सुरू केला, रुबेन्स ॲक्सेसरीज असे तिने ब्रँडचे नाव ठेवले. दरम्यान, २०१४ मध्ये तिने बंगळुरूच्या एका मॉलमधील छोट्या किओस्कमधून रुबेन्स ॲक्सेसरीज सुरू केली. तेव्हापासून ब्रँडने एक दशलक्ष ॲक्सेसरीज विकल्या, जे दाखवून देते की चिनू किती दृढनिश्चयी आहे. आज स्टोअर्स व्यतिरिक्त Flipkart आणि Myntra सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरदेखील तिच्या ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत.
चिनू काला सध्या तिचा पती आणि मुलीसह बंगळुरूमध्ये एका मोठ्या घरात राहते, आज तिच्याकडे बीएमडब्ल्यूच्या पाच सीरिज आहेत, पण या सर्व यशानंतरही आजही ती दररोज १५ तास काम करते. भारतातील फॅशन ज्वेलरी मार्केटमध्ये रुबेन्सचा २५% हिस्सा मिळवणे हे तिचे ध्येय आहे.
२०१८ पर्यंत रुबेन्स ॲक्सेसरीजची बंगळुरू, हैदराबाद आणि कोची येथे पाच आउटलेट झाली. दरम्यान, करोना काळातही ती थांबली नाही. चिनूने तिच्या मार्केटिंग स्टॅटजीत बदल केला आणि आपला व्यवसाय ऑनलाइनकडे वळवला, ज्यामुळे तिच्या उत्पन्नातही वाढ झाली. आज रुबेन्स ॲक्सेसरीज हा १०४ कोटी रुपयांचा फॅशन ज्वेलरी ब्रँड आहे, जो चिनू कालाची ताकद आणि व्यावसायिक कौशल्ये दाखवून देतो.