डॉ. सारिका सातव

थायरॉइड ग्रंथीचेहार्मोन्स कमी प्रमाणात स्रवल्यामुळे हायपोथायरॉइडिझमची लक्षणे दिसू लागतात. मानसिक थकवा, शारीरिक थकवा, त्वचा आणिकेसांचा कोरडेपणा, झोपेच्या तक्रारी, मासिक पाळीच्या तक्रारी, वजन वाढणे, पीसीओडी, शरीरावरसूजइत्यादी अनेक लक्षणे यामध्ये दिसतात.

what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Eggs and height: We find out if there is any link what do you do for increasing height
आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? डॉक्टरांनी दिलेली माहिती एकदा वाचा
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
diabetes, health issue, tips
Health Special: डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत? – भाग १

थायरॉइड नावाची फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी उपयुक्त असते. तिच्यातून स्रवणाऱ्या T3 व T4 नावाच्या हार्मोन्समुळे श्वासोच्छवास, हृदय गती, वजन, शरीराचे तापमान, चरबीचे प्रमाण, चयापचय प्रक्रिया, मासिक पाळी स्नायूंची शक्ती इत्यादी अनेक गोष्टी नियंत्रित केल्या जातात. या ग्रंथीच्या नियमित कार्यासाठी बरीच जीवनसत्वे उपयोगी पडतात. हायपोथायरॉइडीझमसाठी विशिष्ट असा एकच आहार नसून रुग्णाची लक्षणे, वय, राहण्याचा प्रदेश, रक्त तपासण्या, वजन इत्यादी अनेक गोष्टींवरूनआहाराचे नियोजन करावे लागते.

काय खावे?

१) आयोडिन

थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडिन हा महत्त्वाचा घटक आहे. दूध, अंडी, चिकन, मासे, चीज, केळी, गाजर, दही, ताक, स्ट्रॉबेरी इत्यादी अनेक पदार्थांमधून आयोडिन मिळते. पूर्ण दिवसाची गरज फक्त १५० मायक्रोग्रॅम एवढीचअसते. दूध, दही, भाज्या, फळे, मांसाहार इत्यादीच्या वापरानेती गरज परिपूर्ण होते. कमी प्रमाणात आयोडिनचे सेवन व जास्त प्रमाणात सेवन दोन्हीही अपायकारक आहेत. आयोडाइज्ड सॉल्ट प्रत्येक वेळी घेणे गरजेचे नसते. स्थळानुसार आयोडाइज्ड सॉल्ट घेणे आवश्यक आहे की नाही हे ठरते.

आणखी वाचा – थायरॉइडचा कर्करोग, तर काय कराल?

२) सेलेनियम

थायरॉइड ग्रंथीच्या नियमित कार्यासाठी सेलेनियम हा घटक खूप उपयुक्त आहे. थायरॉइड ग्रंथीला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून दूर ठेवण्यासाठी त्याची मदत होते. अतिरिक्त ताणामुळे मग पुढे जाऊन हायपोथायरॉइडीजम होण्याची शक्यता असते. चिकन, मासे, अंडी, सूर्यफूल बी, मशरूम, ओट्स, पालक, दूध, दही, केळी, काजू इत्यादी पदार्थांमधून सेलेनियमची प्राप्ती होते.

३) झिंक

थायरॉइड हॉर्मोन्सच्या निर्मितीसाठी झिंकची आवश्यकता असते. झिंकच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉइडीजम होतोआणि थायरॉइड हार्मोन्सझिंकच्या शोषणासाठी गरजेचे असतात.अशाप्रकारे ते एकमेकांवर अवलंबून असतात. दूध, दुधाचे पदार्थ, काबुली चणे, भोपळा बी, तीळ, काजू, डाळिंब, पेरू, बेरीज, गव्हांकुर, ओट्स, अंडे, डार्क चॉकलेट, दही, चिकन, बदाम इत्यादी पदार्थांमधून झिंक मिळते.

४) टायरोसिन

टायरोसिन हे एक प्रकारचे अमायनो ॲसिड आहे. जे प्रथिनांचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध, दुधाचे पदार्थ, मासे, मटण, शेंगदाणे, गहू, अंडी इत्यादी अनेक पदार्थांमधून टायरोसिन मुबलक प्रमाणात मिळते. थायरॉइड ग्रंथी टायरोसिन आणि आयोडिन मिळून हार्मोन्स बनवते.म्हणून थायरॉइडच्या योग्य कार्यासाठी टायरोसीन एक आवश्यक घटक आहे.

आणखी वाचा – थायरॉइड आणि सहव्याधी

५) खोबऱ्याचे तेल

मीडियम चेन ट्रायग्लिसरॉईड्स जे खोबऱ्याच्यातेलामध्ये भरपूर असते ते शरीराचाऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठीखूपमदत करते व त्यामुळेच ते थायरॉइड ग्रंथीलासुद्धा नियमित कार्यासाठीखूपमदतकरते.

६) बी व्हिटॅमिन

थायराइड ग्रंथीच्याकार्याचे नियमित राहणे बऱ्याचअंशी बी व्हिटामिन्स वर अवलंबून असते. हिरव्या पालेभाज्या, दूध, वाटाणा, धान्य, मोड आलेली कडधान्य, मांसाहार इत्यादी अनेक खाद्यपदार्थांमधून वेगवेगळ्या प्रकारचे बी व्हिटामिन मिळतात.

७) प्रोबायोटिक्स

दही, ताक, पनीर, आंबवलेले पदार्थ इत्यादींमधूनआपल्याला प्रोबायोटिक्स मिळतात.आपल्याआतड्यांमध्ये असणाऱ्या नॉर्मल गटफ्लोराला (normal gut Flora) मदत करण्यासाठी प्रोबायोटिक्स गरजेचेअसतात. विविध घटकांचे आतड्यांमधून शोषण, विविध न्यूट्रियंट्सची निर्मिती, प्रतिकारक शक्ती इत्यादी अनेक घटकांसाठी याची आवश्यकता असते.

काय खाऊ नये ?

१) गाॅयट्रोजेन

थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये अडथळाआणणारा घटक जो बऱ्याच अन्न घटकांमध्ये नैसर्गिकरित्याअसतो तो म्हणजे गाॅयट्रोजेन. उदाहरणार्थ सोयाबीन, ब्रोकोली, कोबी, शेंगदाणे इत्यादी पदार्थ. प्रक्रिया न केलेल्याअवस्थेत पण शिजवून, उकडून विविध प्रक्रिया करून या गाॅयट्रोजेनचे प्रमाण बऱ्याचअंशी कमी होते म्हणून पूर्ण बंद न करता कमी प्रमाणात खाऊ शकता.

२) ग्लूटेन

ग्लूटेन म्हणजे गव्हामध्ये असलेले एक प्रकारचे प्रोटीन जे कमी प्रमाणात घेतल्यास किंवा बंद केल्यास थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात सुधारणा दिसून येते.ऑटोइम्युन थायरॉइडीसमध्ये ग्लूटेन बंद करण्याची गरज जास्तअसते.

३) कॉफी

बरीचशीजीवनसत्वेकॉफीमुळेशोषली जात नाहीत.म्हणूनकॉफीचा वापर कमी असावा.

४) मैदा, मैद्याचे पदार्थ आणि गोड पदार्थ

हायपोथायरॉइडीजममुळे चयापचय क्रियेचा वेग मंदावलेला असतो.त्यामुळे वजन वाढत असते. वरील सर्व पदार्थ त्या वजन वाढीत भर घालतात. म्हणून ते टाळावेत.

५) प्लास्टिक कंटेनरमधील पदार्थ

प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्नपदार्थ साठवल्यामुळे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनहार्मोन्सच्या प्रमाणात अनावश्यक वाढ होताना दिसते. आणि ते वाढलेले इस्ट्रोजेन थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात ढवळाढवळ करते.

६) प्रोसेस्ड/ पॅकेज फूड/ सॉल्टी फूड

विविध रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ नकळत उष्मांक आणि चरबी वाढवतात. म्हणून ते टाळावेत. प्रीझर्वेटिव्हजमध्येबऱ्याच अंशीमिठाचे प्रमाण असते. ते शरीरामध्ये अतिरिक्त द्रव पदार्थ साठवून वजन वाढविण्यास कारणीभूत ठरते. थोडक्यात सांगायचे झाले तर विविध अन्न घटकांनी युक्त संतुलित आहार घेणे जास्त गरजेचे आहे.

dr.sarikasatav@rediffmail.com