संदीप चव्हाण

भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.

woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

फळभाजीसाठी १२ ते १६ इंच खोलीची कुंडी किंवा वाफ्याची गरज असते. भाजीपाल्याच्या नर्सरीत फळभाजीची तयार रोपे मिळतात. ती आणून लागवड करावी. म्हणजे बियाणांचा खर्च वाचतो तसेच ती रोपे मोठी करण्यात पडणारे श्रम वाचतात. रोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी, म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय झाडं यांना फळं येऊन गेलीत की ते महिनाभराचा विसावा घेतात. पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावं त्यास पुन्हा बहर येतो.

विविध वेलवर्गीय भाज्या या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचं, त्याला लागणाऱ्या फळांचं एक नैसर्गिक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो. बऱ्याचदा कुंडीत, गोणीत लावलेल्या वेलाची पाने पिवळी पडतात, फुले गळून पडतात, फळं अर्धवट अवस्थेत गळून पडतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मुळांना पसरायला जागा नसते. त्यांना पोषण कमी पडतं.

वाफा पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, गिलके, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.

कंदवर्गीय भाज्यांना सहा ते आठ इंच खोली लागते. शक्यतो कंदमुळांना जेवढा ऑक्सिजन घेता येईल तेवढे त्याची वाढ व वजन वेगाने वाढते. कंदमुळांना शक्यतो माती किंवा भरणपोषण हे भुसभुशीत असावं. कंदवर्गात मुळा, लाल मुळा, गाजर, रताळी, बीट, बटाटे घेता येतात. यातील गाजर हे प्रत्येक कुंडीत, वाफ्यात लावलं तर उत्तम. कारण दुधाळ वनस्पती मातीतील सूक्ष्म घटकांचं विघटन करून ते इतर झाडांना देते.

वेलवर्गीय वनस्पती…

घराला, बंगल्याला शेताला आपण तारेचे अर्थात जाळीचे कुंपन केलेले असल्यास तुमचे अभिनंदन, कारण जाळीचे कुंपन हे पर्यावरणपूरक आहे. अशा कुंपनाला एक तर आपण प्रायव्हसीसाठी ग्रीन नेट लावू शकता. किंवा त्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीची लागवड करू शकता.

हवा खेळती राहते. कमीत कमी जागा लागते. कुंपनाच्या दोनही बाजूला कुंपनाला खेटून बाग फुलवता येते. तसेच नारळ आंब्याची झाडे लागवड करू शकता. तसेच याभोवती बाग फुलवल्यास आपल्याला नैसर्गिक गारवा अर्थात तापमान नियंत्रित करता येते.

अशा जाळीच्या कुंपनावर नेहमी ऊन येत असल्यास त्या ठिकाणी कोणकोणत्या वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. ते पाहूया..

पॅशन फ्रूट २) गोकर्ण ३) कृष्णकमल ४) मधु-मालती ५) तोंडली ६) बदक वेल ७) गारवेल ८) गुळवेल ९) बोगनवेल १०) रातरानी ११) संक्रातवेल १२) जाई जूई १३) मॉर्नींग ग्लोरी १४) मायाळू १५) विड्याचे पान १६) हंगामी वेलः वाल, कारले, दुधी, चवळी, दोडके, गिलके. १७) रानजाई १८) वेली गुलाब १९) मनीप्लांट २०) कर्टन क्रीपर

औषधी वनस्पती : गुळवेल.

फुलांचे वेल : गोकर्ण, संक्रात वेल, मॉर्निंग ग्लोरी, बदक वेल,

सुंगधी फुलांचे वेल : गावठी गुलाब, मधूमालती, रानजाई, जाई जुई, रातरानी,

फळभाज्यांची वेल : सर्व प्रकारची फळभाज्या देणांरी वेल, तोंडली, तसेच मायाळू, विड्याची पाने.

शोभेचे वेल : गारवेल, कर्टन क्रीपर्स, मनीप्लांट

बरेचदा मंडळी जाळीचे कुंपनांवर वेल लावला तर ते सडून जाईल असा दावा करतात. ते काही अंशी खरेही आहे. पण वाळलेल्या फांद्या, काड्या वेळेवर स्वच्छ केल्या तर तेथे पाणी साचत नाही. त्यामुळे गंजण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच जाळीच्या सडण्यापेक्षा त्यापासून मिळणारा स्वच्छ प्राणवायू, डोळ्यांना सुखवणारी हिरवळ, पक्षांना मिळणारा आसरा तसेच त्यापासून मिळणारे पशू पक्षी व मानवासाठी मिळणारे अन्न हे अधिक सुखदायक आहे.

sandeepkchavan79@gmail.com