गीताताई घरचं काम आवरून खुर्चीवर जरा विसावल्या होत्या. एरवी गणपतीच्या आगमनाचे, विशेषत: घरी त्यांची लाडकी गौरी येण्याचे दिवस म्हणजे खूप धावपळ असायची. यंदा मात्र घर शांतच होतं. सुरेशरावांचं- पतीचं आठ-नऊ महिन्यांपूर्वी निधन झालं होतं आणि गीताताईंच्या घरात यंदा गौराईही येणार नव्हती!

त्यांची जीवाभावाची गौराई यंदापासून घरी येणार नाही, म्हणून त्यांना अधिकच एकटेपण जाणवत होतं. सुरेशरावांच्या जाण्यानं गीताताईंच्या वाट्याला वैधव्य आलं. पती नसण्याचं दु:ख त्या पचवत होत्या, स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवत होत्या. पण नावाच्या मागे ‘विधवा’ हे लेबल लागल्यानंतर त्यानं त्यांच्या आयुष्यातल्या पूर्वी जिव्हाळ्याच्या असलेल्या अनेक गोष्टीही हिरावून घेतल्या होत्या. खास सवाष्णीनं करायचे सण तर त्या करू शकणार नव्हत्याच. अर्थात या नऊ महिन्यांत त्याची त्यांना सवयही झाली होती म्हणा! पण आता आपल्या घरी लाडकी गौराई येणार नाही, या भावनेनं मात्र त्या फार व्याकूळ झाल्या.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…

गेला एक महिना त्यांच्या कुटुंबातील अन्य मंडळींमध्ये हीच चर्चा सुरू होती. या चर्चेमुळे गौराईसाठी गीताताई अधिकच हळव्या होत होत्या. त्यांच्या चुलत नातसुनेला मात्र हे सर्व पटत नव्हतं. वैधव्य आलं म्हणून गीताताईंनी गौराईला न पुजणं तिला पटत नव्हतं. तिनं ते बोलूनही दाखवलं, पण घरच्या वरिष्ठांपुढे तिचं काही चाललं नाही. गीताताई त्यानं अधिकच निराश झाल्या.

हेही वाचा… आरोग्य पालकत्व: स्क्रीन टाइम आणि मेटॅबोलिक सिंड्रोम

जसजसे गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले होते, तसतशी गीताताईंची तगमग वाढत होती. इतक्या वर्षांची ही आपली सखी आपल्यापासून कायम दूर जाणार या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या होत्या.

सुरेशरावांबरोबरचा थोडाथोडका नाही, तब्बल पन्नास वर्षांचा संसार. जानेवारी महिन्यात ते गेले आणि गीताताई एकट्याच माघारी राहिल्या. पण हे एकटेपण फक्त आपलं लाडकं माणूस नसण्याचं नव्हतं, तर सवाष्ण म्हणून साजऱ्या होणाऱ्या घरातल्या प्रत्येक सणापासून त्या दूर होत गेल्याचं ते अधिक होतं. ते त्यांनी पचवलं होतं, मात्र सुरेशराव नाहीत म्हणून आपण गौराई आणायची नाही, या कल्पनेनं मन कातर झालं. हेही खरं होतं, की वयोमानानुसार गौराईची पूर्वीसारखी बडदास्त राखणं शक्यही होत नव्हतं. पण तरीही या सखीसाठी जमेल तसा त्या आजवर नैवेद्य करत. गौराई तो आनंदानं स्वीकारते असा त्यांचा विश्वास.

सुरेशरावांशी लग्न करून त्या घरात आल्या नि त्यांचं गौराईशी नातं जुळलं ते कायमचं. कोण होती ती गीताताईंची? जीवाभावाची मैत्रीणच ती! गणपतीच्या आगमनापेक्षाही गौराईच्या येण्याकडे त्यांचे डोळे लागलेले असत. पाहायला गेलं, तर एक मुखवटाच तो… पण तो गीताताईंसाठी सख्या मैत्रिणीपेक्षा कमी नव्हता. सुरुवातीला स्वभावानं जरा खाष्टच असलेल्या सासुबाईंची तक्रार त्या मनातल्या मनात का होईना गौराईशीच करत. मनातल्या या कथनानंही त्यांना हलकं वाटे. गौराईच्या मुखवट्यावरल्या हास्यानंच त्यांना दिलासा मिळे. मग एरवी ही गौराई समोर नसली, कीसुद्धा मनोमन त्या तिच्याशी बोलत राहात. तिच्याशी आनंदाच्या गोष्टी करत, कधी कधी दु:खाचाही निचरा करत. गौराई येणार म्हणून सासूबाईंना सगळं कसं ‘शुद्ध’ लागे. मग या दिवसांत पाळी येऊ नये म्हणून गीताताई गौराईलाच साकडं घालत. मनोमन त्यांना वाटे, ‘काय या प्रथा! अर्थहीन आहेत साऱ्या!… गौराईपण एक बाईच की! ती माझं ओवळंपणही स्वीकारून घेईल की! सखीच ती माझी. ती समजून घेणार नाही, तर कोण समजून घेईल मला?’ असा विचार त्यांच्या मनात येई अनेकदा. पण सासूबाईंसमोर काही बाेलायची सोय नव्हती. पण इतक्या वर्षांत गाैराईनंच त्यांच्या संबंधांत त्यांची ‘पाळी’ आड येऊ दिली नाही, ही तिचीच त्यांच्यावरची माया असं त्यांना उगाच वाटे.

हेही वाचा… कागदाच्या लगद्यापासून रेखीव गणेशमूर्ती बनवणारे हात!

गीताताईंनी इतक्या वर्षांत कधीही गौराईच्या सरबराईत कमतरता ठेवली नाही. घरात तीन दिवस गौराईचा साग्रसंगीत स्वयंपाक असे. आपल्या हातची पुरणपोळी गौराईला फार आवडते असं त्यांना वाटे. त्यामुळे वयपरत्वे पुरणपोळी करणं जमत नव्हतं तरी छोटीशी पुरणपाळी का होईना, तिच्यासाठी घरात होईच.

… पण आता हे सारं नाही, कारण सुरेशराव हयात नाहीत. ज्या सुरेशरावांमुळे गौराईशी त्यांचा कायमचा संबंध जोडला गेला होता, तेच या जगातून निघून गेल्यावर गौराईशी जडलेलं नातंही संपलं होतं. कायमचंच. सुरेशरावांच्या जाण्यानं पन्नास वर्षांचा सहवास तर संपला होताच, पण त्याचबरोबर गौराईशी- तिच्या हसऱ्या मुखवट्याशीही नातं कायमचंच तुटलंय या विचारानं त्या पुन्हा हळव्या झाल्या.

एकाएकी हे नातं असं कसं तुटू शकतं? मग आठवलं, गेल्या वर्षी त्यांच्या सख्या बहिणीला आणि तिच्या जावेला दोन महिन्यांच्या अंतरानं आलेल्या वैधव्य आलं होतं. ‘घरात कुणी पुरुष नाही’ म्हणून त्याही गौराईपासून अशाच तुटल्या होत्या की! घरात एक पुरुष नाही, म्हणून एकाएकी या सखीशी आपण कसे दुरावले जाऊ शकतो? सुरेशरावांच्या निधनानं त्यांच्या आयुष्यात रितेपण आलं होतंच, पण आता गौराई आपल्या अंगणी कधीच येणार नाही या विचारानं त्यांच्या मनी अठराविश्व एकटेपण दाटून आलं. ‘गौराई… ये गं बाई माझ्या अंगणी’ असंच त्यांना ओरडून सांगावंसं वाटत होतं…

हेही वाचा… आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणं तुम्हालाही शक्य आहे!

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची नातसून दारात उभी. गीताताईंची तगमग तिला जाणवत होती. ती एका निर्धारानंच गीताताईंकडे आली होती. तिनं कुटुंबातल्या वडीलधाऱ्या मंडळींना काही महत्त्वाचं बोलायचंय म्हणून मुद्दाम गीताताईंकडे बोलवून घेतलं होते. तीही मंडळी आली. नातसुनेनं घरच्या मंडळींची पुन्हा समजूत काढली आणि गीताताईंची होणारी घालमेल त्यांच्या लक्षात आणून दिली. सगळ्यांना यासाठी राजी केलं. ‘‘गीताआजी, तुम्ही मनापासून घातलेली साद तुमच्या गौराईनं ऐकलीय. ती तुमच्या अंगणात पुन्हा येतेय… कायमची!’’ नातसुनेनं जाहीर करून टाकलं.

गीताताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सुरेशराव नाहीत आता, पण माझी गौराई माझ्यासोबत कायम आहे, या भावनेनंच त्यांना भरून आलं. आता त्या त्यांच्या बहिणीला आणि जावेलाही त्या त्यांच्याकडे गणपतीत राहायला बोलावणार होत्या आणि तिघी मिळून गौराईचं मनोभावे स्वागत करणार होत्या…

lokwomen.online@gmail.com

Story img Loader