लावणी कलाकार गौतमी पाटील

सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चांपेक्षा जास्त चर्चा ही तुझीच म्हणजे एका लावणी कलाकाराची होत आहे. कदाचित ही पहिलीच वेळ असावी, जेव्हा एखाद्या लावणी कलाकाराला रातोरात इतकी प्रसिद्धी मिळाली असावी. तर पत्रास कारण की…. गेल्या काही दिवसांपासून तू सातत्याने चर्चेत आहेस. त्याचे कारण म्हणजे तुझे लावणीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ. तू चर्चेत असल्यामुळे सहजच तुझे व्हिडीओ पाहायला गेली, पण तू त्यात कहरच केला आहेस. तू केलेली लावणी पाहून मला उत्तर प्रदेश, बिहारमधील कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या अश्लील डान्सची आठवण झाली.

What Raj Thackeray Said About Ajit Rande?
Raj Thackeray : डॉ. अजित रानडेंना ‘अशा’ पद्धतीने हटवणे अत्यंत चुकीचे: राज ठाकरेंची परखड भूमिका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Govind Bagh, Baramati, Sharad Pawar,
बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
Tanaji sawant Ajit Pawar
Tanaji Sawant : “शेतकरी तानाजी सावंतांना औकात दाखवतील”,’त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल; महायुतीत बिनसलं?
minister dharmarao baba atram marathi news
मंत्र्यांच्या बंगल्यावर तिऱ्हाईताकडून खातेबैठका
Raj Thackeray
Badlapur Sexual Assault : “४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र…”, बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक; पोलिसांना म्हणाले…

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाप्रकार म्हणून लावणीची ओळख आहे. महाराष्ट्राची ओळख सांगाताना ज्या काही मोजक्या गोष्टींबद्दल सांगितलं जातं त्यामध्ये लावणीचं नाव आवर्जून घेतलं जातं. लावणी कित्येकदा तमाशाचा भाग म्हणूनही सादर केली जाते. या कलाप्रकारात शृंगार आणि भक्ती या दोन्ही गोष्टी असतात. लावणीद्वारे ‘लास्य’ रसाचे दर्शन घडते. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम म्हणून लावणी या नृत्य प्रकाराकडे पहिले जाते. यासारख्या अनेक गोष्टी माझ्याबरोबर तुलाही ठाऊक असतीलच. पण गौतमी तू केलेली लावणी पाहिल्यानंतर यातील एकाही गोष्ट त्या विभित्स नृत्यामध्ये असल्याचं मला तरी जाणवले नाही.

का कुणास ठाऊक पण तू केलेल्या लावणीत मला फक्त एक अश्लील डान्स करणारी कलाकारच दिसली. ताल, लयबद्धता, नृत्य, अदाकारी याचा कोणताही संगम तुझ्या डान्समध्ये अजिबातच नव्हता. तू मंचावर फक्त कंबर हलवण्यापासून ते विचित्र हातवारे करत फक्त अश्लील चाळे करण्यात मग्न होतीस. एखादी बाई भर कार्यक्रमात शे सव्वाशे माणसांसमोर आपल्या साडीवरचा पदर करते आणि विचित्र पद्धतीने नाचते, हे पाहिल्यानंतर तुझा प्रचंड संताप आला. तू केलेली हातवारे अश्लील आहेत हे समजण्यासाठी वयाची १८ वर्ष ओलांडण्याचीही गरज नाही इतका हा किळसवाणा प्रकार होता.

लावणीची बरीचशी गाणी ही दोन अर्थांची असतात हे मलाही मान्य आहेत. पण हातभर चांगलं चोपून चापून चोळी नेसून लावणी करणाऱ्या अनेक कलावंत मी तुला दाखवू शकते. यमुनाबाई वायकर, विठाबाई नारायणगावकर, राजश्री नगरकर, सुलोचना दिदी, सुरेखा पुणेकर यांच्या लावण्यांची सर कशालाही येऊ शकत नाही. पण तू लावणीचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतला आहेस. तुझ्या त्या कार्यक्रमातील व्हिडीओ पाहून, त्यातील अश्लील हातवारे पाहून तो पुढचा व्हिडीओ पाहूच नये इतकी किळस मला आली. तुझ्या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज असतीलही पण तरी एक स्त्री म्हणून किंवा एक लोककला जपणारी व्यक्ती म्हणून तू या गोष्टी लावणीच्या नावाखाली करणं चुकीचंच आहे.

तुझं दहीहंडी कार्यक्रमातील नृत्य असो किंवा सांगलीतील मिरजमधील मधील तुझा कार्यक्रम असो, मला हे सारं पाहून प्रचंड संताप वाटतो. लावणी कलाकार असलेल्या मेघा घाडगेंनीही यावर पोस्ट टाकलीय म्हणे… तुझी लावणी पाहून त्यांनी लावणीला कायमचा रामराम केलाय असं ऐकलं आहे. तर सुरेखा पुणेकर यांनीही तुझी चांगलीच कानउघडणी केली आहे. याबरोबर अनेकांनी तुझ्यावर टीकाही केली आहे. पण तुला मात्र यातील कोणत्याही गोष्टींचा अजिबातच फरक पडलेला दिसत नाही, म्हणूनच हे पत्र लिहिण्याची तसदी घेतलीय.

काही दिवसांपूर्वी तू पत्रकार परिषद घेतलीस खरी….! पण त्यात तू वर वरचं बोलत होतीस हे स्पष्ट जाणवत होतं. त्यावेळी जाहीरपणं माफी मागूनही तुझ्यात काही फरक पडलेलाच नाही. अर्थात त्या कार्यक्रमासाठी तुला बक्कळ पैसे आणि पाठबळ मिळत असेलच. पण काहीशा पैशांसाठी तू लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करतेस याची जाणीव तुला किती आहे याबद्दल न बोललंच बरं. कारण जर ती असती, तर तू ते करायला तयारच झाली नसतीस.

तुझ्या लहानपणापासूनच तू खूप धीराची आणि गंभीर आहेस असं जाणवलं. तुझी पार्श्वभूमीही वाचली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तू काढलेले दिवस, जन्मत: वडिलांनी तुझ्या आईला सोडून देणं, कालांतराने आईचा अपघात, तुझ्यावर येणारी जबाबदारी यामुळे तू कोणत्या मानसिकतेत असशील याची मला निश्चित माहिती आहे. पण यामुळे आपली लोककला असलेल्या लावणीचे आयटम साँगप्रमाणे सादरीकरण करणं मला तरी पटत नाही.

आपल्या लावणीला सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. लावणीतल्या श्रृंगार रसाला आजही प्रेक्षकांची पसंती आहे. आपल्याकडच्या लावणीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सबंध अंगभर कपडे, त्यावरील दागदागिने अन् केलेला साजश्रृंगार… पण याच गोष्टींकडे तू दुर्लक्ष केलंस. लावणी करण्यासाठी तेव्हाही किंवा आताही अंग प्रदर्शन करण्याची किंवा अश्लील हातवारे करण्याची गरज अजिबात नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यातून सर्व भाव, मिश्किलपणं येणारं हास्य, लाजणं आणि अदाकारी या गोष्टी जरी केल्या तरी प्रेक्षकांच्या हृदयात तुम्हाला निश्चित स्थान मिळते. पण आता लावणी, डान्स बार आणि आयटम साँग हे सारखंच झालंय की काय असं वाटायला लागलंय. यामुळे तुझ्या आणि माझ्या लावणीचा दर्जा मात्र घसरतोय हे नक्की….!!!

कारण कालांतराने तुझं वय झाल्यानंतर हीच लोक तुला एखाद्या कचऱ्यासारखं बाजूला काढतील आणि तुझ्याऐवजी दुसऱ्या गौतमी पाटीलला उभं करतील. तुझ्यापेक्षा अश्लील नृत्य तिच्याकडून करवूनही घेतील. पैशासाठी ती करेलही. पण यामुळे एकेदिवशी महाराष्ट्राचा बिहार नक्कीच होईल!!

तुझी कृपाभिलाषी
महाराष्ट्रात लावणी करणाऱ्या तुझ्याच मैत्रिणी