तिने गायलेल्या ‘किल द बिल’या गाण्याचा ट्विटरवर हॅशटॅग तयार होऊन त्याला चळवळीचं रूप आलेलं आहे. ‘समलैंगिक, तृतीयपंथियांनाही नैसर्गिकरित्या ते जसे आहेत तसे जगण्याचा पूर्ण हक्क आहे.’ याच मूलभूत मानवी हक्कासाठी मॅक्सिन एंजल ओपोकू ही तृतीयपंथीय प्रस्थापित व्यवस्थेशी एकाकी लढते आहे.

आणखी वाचा : इन्सुलिनची शंभरी : रोमांचक शोधाची कहाणी

बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड? (फोटो सौजन्य पीटीआय)
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
juvenile assault with knife in Mumbai news in marathi
जाड्या चिडवल्याने मित्रावर चाकूने हल्ला; दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Arvind Kejriwal Car Attacked
Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप

ऑगस्ट, २०२१ मध्ये घानाच्या संसदेत प्रस्तावित विधेयकाने ओपोकूसारख्या अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तृतीयपंथी आणि समलिंगी असा परिचय सांगणाऱ्या घानाच्या नागरिकांना पाच वर्षांच्या कारावासाची मागणी या विधेयकाद्वारे करण्यात आली आहे. संसदेत सादर झालेले हे विधेयक म्हणजे घानामधील नागरिकांच्या मूलभूत मानवी लैंगिक अधिकारांवरच घाला आहे, असे बिनधास्तपणे ओपोकूने आपल्या ‘किल द बिल’ या गाण्यामधून स्पष्ट केले आहे. समलिंगी, तृतीयपंथीय समुदाय घानामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तशी त्यांची ओळख असणे, यात त्यांचा गुन्हा काय, असा रोखठोक सवालच तिने या गाण्याच्या माध्यमातून विचारलेला आहे.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : रोहितच्या गर्लफ्रेंडऐवजी रुचिरा होऊन खेळली असतीस तर…

किल द बिल या गीतामुळे सध्या चर्चेत आलेल्या ओपोकूच्या ‘आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाण्याच्या’ एकल संघर्षाला देशविदेशातून पाठिंबा मिळतो आहे. ओपोकू म्हणते, संगीत हे माझ्या वकिलीचे साधन आहे. माझा आवाज, माझी मतं राजकारण्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत आणि होमोफोब्सपासून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत, माझे गाणे हा एकमेव मार्ग माझ्याकडे आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?

एका गीताने संपूर्ण घानामध्ये खळबळ उडवून देणारी ही ओपोकू आहे तरी कोण? फॅशन डिझायनर असलेली आई आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये असलेले वडील अशा या दांपत्याला ३ सप्टेंबर १९८५ रोजी झालेले हे सर्वात ज्येष्ठ अपत्य. पाच मुलांमध्ये सगळ्यात मोठी तीच. ओपोकूच्या बालपणीच्या आठवणी सांगताना तिची आई फॉस्टिना अरबा फोर्सन म्हणते, की लहानग्या ओपोकूला पाहताच आमच्या घरी येणारे बहुतेकजण तिच्या सौंदर्याची स्तुती करत असत. किती गोड, सुंदर दिसते तुमची मुलगी, असं म्हणत. त्यावर ती मुलगी नसून मुलगा आहे, असं मी आवर्जून सांगत असे. तेव्हापासूनच ओपोकूला मुलींची खेळणी, खेळ, कपडे अधिक आवडायचे. ओपोकूचे वडील सांगतात, की मुलाच्या शरीरात अडकून पडलेली ती एक मुलगी होती. आम्हांलादेखील ती आहे तशी स्वीकारायला बरीच वर्ष जावी लागली.

आणखी वाचा : मधुमेह : लक्षणे, चाचण्या व उपचार

२००८ साली घानाची राजधानी असलेल्या अक्राच्या उत्तरेला असलेल्या कोफोरिडुआमध्ये ओपोकूने हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटसाठी प्रवेश घेतला. तिथे एका महिलेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ओपोकूला गाण्यासाठी सहभागी करून घेतले आणि तिथेच तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. त्या कार्यक्रमात ओपोकूच्या आवाजाने सगळेच मंत्रमुग्ध झाले. आफ्रोपॉपच्या जातकुळीशी साम्य असलेल्या तिच्या आवाजाच्या माध्यमातून तिने नंतर अनेक स्पर्धात्मक कार्यक्रमांत यश मिळवले. प्रेम, प्रणय अशा विषयांवर तृतीयपंथी गायिका, संगीतकार म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती गात राहिली. २०१८ पासून तिची संगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली. सोशल मिडीयावर तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली तर ‘किल द बिल’ या अलिकडच्या गीताने तिच्या समर्थकांसोबतच शत्रूंमध्येही वाढ झाली.

आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?

घानामधील एकमेव तृतीयपंथी गायिका, संगीतकार अशी ओळख असलेल्या ओपोकूला आज मूलभूत हक्कासाठी, अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. ती म्हणते, घानासारख्या संकुचित विचारांच्या देशामध्ये प्रस्ताविक विधेयकाद्वारे ट्रान्सजेंडर, समलिंगी किंवा क्विअर समुदायाला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले आहे. घानाच्या अकान बोलीभाषेतून गायलेल्या ‘किल द बिल’ या गाण्यामध्ये तिने या सगळ्याला जाहीर विरोध केलेला आहे. त्या गाण्यामध्ये ती असं म्हणते, की हे प्रिय राजकारण्यांनो, ज्या घानावासियांनी तुम्हांला विश्वासाने मते दिली, त्यांना तुमच्या या प्रस्तावित विधेयकामुळे, कायद्यामुळे धक्का बसला आहे. त्यांची तुम्ही घोर निराशा केली आहे. अशा परिस्थितीत देशाला सुस्थिर करण्याची तुमची जबाबदारी आहे. तेव्हा तुम्ही हे बिल (विधेयक) रद्द (मारून टाका) करा. किल द बिल…. हे तिच्या गीताचे बोल आहेत. ती म्हणते, की ब्रिटीश वसाहतकालीन कायद्यानुसार समलैंगिक कृत्ये निषिद्ध, गुन्हा समजण्यात येत होती. आता काळ बदललेला आहे. समलिंगी, ट्रान्सजेंडर किंवा क्विअर असणे हा काही गुन्हा नाही. ती एक ईश्वरनिर्मित प्रतिमा आहे. त्यामुळे तिचा जसाच्या तसा स्वीकार करणं, त्यांचा सन्मान, आदर करणं हा त्यांचा मूलभूत लैंगिक अधिकार आहे. केवळ ते सामान्यांपासून वेगळे आहेत म्हणून त्यांना पाच वर्षे कैद करणं, तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणं म्हणजे मूलभूत मानवी अधिकार तसंच लैंगिक अधिकारांची पायमल्ली करण्यासारखं आहे. या गीतापूर्वीच्या ‘वो फि’ या गीतामधूनही तिने एलजीबीटीक्यू समुदायातील व्यक्ती ह्या कुटुंबाचा अविभाज्य घटकच आहेत, याविषयी मत ठामपणे मांडले होते.

आणखी वाचा : आई न होणाऱ्या स्त्रीला स्वार्थी ठरवले जाणे दु:खद: – जेनिफर अ‍ॅनिस्टन

घानामध्ये प्रस्थापितांच्या राज्यात येऊ घातलेल्या या प्रस्तावित विधेयकाविरूद्ध जाहीरपणे निषेध, विरोधाचा आवाज उठवणाऱ्या संगीत क्षेत्रातील एकमेव तृतीयपंथीय गायिका, संगीतकार असलेल्या ओपोकूच्या जीवावर सध्या हे सारे बेतले आहे. गेल्याच वर्षी तिच्या घरावर एका रात्री अचानकपणे जमावाने हल्ला करून बरीच नासधूस केली. त्या भयानक अनुभवाविषयी सांगताना ओपोकू म्हणते, की जमावाने ठरवलं असतं तर मला ते पोलीसांच्या ताब्यात देऊ शकले असते. परंतु असा हल्ला करून मला त्यांनी सर्वांसमक्ष यायला भाग पाडले. तेव्हापासून माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. रोजच्या जगण्यासाठी नोकरी करायची तर घराबाहेर पडणं गरजेचं आहे, परंतु तेही मी करू शकत नाही. माझा आवाज दाबण्याचा किंवा कायमचा बंद करण्याचा हा कुटील प्रयत्न आहे. माझ्यासारख्या व्यक्तींबाबत जे होते आहे त्याविरोधात संगीताचे अस्त्र वापरणे मी थांबवणार नाही. ही जोखीम मी पत्करणार. कारण हा माझ्या आणि माझ्यासारख्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. ही लढाई मी एकटीने लढत असले तरी ही लढाई जिंकले तर मी एकटीच जिंकणार नाही. तर तो विजय फक्त माझा नसेल तर माझ्यासारख्या अनेकांचा, अनेकींचा असेल हे निश्चित!
(शब्दांकन : साक्षी सावे)

Story img Loader