श्रेया सिद्दनगौडर (Shreya Siddanagowder) हे नाव आपल्या फारशा परिचयाचे नाही. पण तिची गोष्ट मात्र आपल्याला माहीत असायलाच हवी. सहा-सात वर्षांपूर्वीपर्यंत तीही एक साधीसुधी, कॉलेजला जाणारी, अभियांत्रिकी शाखेत शिकणारी १८ वर्षांची मुलगी होती. इंजिनियर होऊन भरपूर यश मिळवण्याची स्वप्न पाहणारी. एका अपघातात हे स्वप्न विखुरले. श्रेयाचे दोन्ही हात कोपरापासून तुटले. पण प्रगत व आधुनिक विज्ञान, आत्मबळ, घरच्यांचा पाठिंबा आणि सचिन नावाच्या एका मृत तरुणाच्या घरच्यांचा आधुनिक दृष्टिकोन यामुळे तिला पुन्हा एक संधी मिळाली.

सात वर्षांपूर्वी झालेला एक बस अपघात आणि काहीच दिवसांपूर्वी आयआयएम कलकत्ता येथे मिळालेला प्रवेश असा श्रेयाचा प्रवास आहे. २८ सप्टेंबर २०१६ या दिवशी श्रेया पुण्याहून मणिपालला जात होती. अपघातामध्ये बस पलटली आणि तुटलेली खिडकी आणि रस्त्याच्यामध्ये श्रेयाचे हात सापडले. तिने कोपरापासून खाली दोन्ही हात गमावले. पुढे वर्षभर तिच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू होत्या. साधारण वर्षभरानंतर म्हणजे ९ ऑगस्ट २०१७ रोजी श्रेयाच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. अशा प्रकारे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली ती आशियातील पहिली व्यक्ती होती. कोचीच्या अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ही शस्त्रक्रिया १४ तास चालली. तिला ज्याचे हात मिळाले तो सचिन नावाचा केरळमधील तरुण एका मोटारसायकलच्या अपघातात ब्रेनडेड घोषित करण्यात आला होता. सचिनच्या कुटुंबीयांनी त्याचे हातच नाही तर इतर अवयवही दान केले.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

हेही वाचा – नवरा-बायकोच्या आवडीनिवडी भिन्न असतील तर?…

या वर्षी तिने आयआयएम-कलकत्ता येथे प्रवेश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. कॅटसारखी अवघड परीक्षा आणि त्यानंतरच्या मुलाखतीच्या फेऱ्या यात चमकदार कामगिरी केल्यानंतर तिला या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाला आहे. पण हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. अपघातानंतर मनोधैर्य राखणे, आलेल्या परिस्थितीचा सामना करणे आणि ती सुधारण्यासाठी आपल्या बाजूने प्रयत्न करत राहणे या सर्व गोष्टी श्रेयाने केल्या. श्रेया स्वतःला अतिशय स्वतंत्र बाण्याची मुलगी मानते. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बरे होण्यासाठी तिला तीन वर्षे लागली.

श्रेयाला दहावी आणि बारावीला ९० टक्के गुण मिळाले होते. पुण्यातीलच सेंट उर्सुला हायस्कूलनंतर तिने सिटी प्राईड ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. तिला अभियांत्रिकीमध्येच रस होता. पण बदलेल्या परिस्थितीत ते शक्य नव्हते. २०१९ मध्ये तिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीसाठी तिने अर्थशास्त्र या विषयाची निवड केली. महाविद्यालयातील पहिले वर्ष कठीण होते. अनेक नवीन आव्हाने होती आणि प्रत्येक गोष्ट नव्याने शिकावी लागत होती. कॅन्टीनमध्ये स्वतःची प्लेट उचलण्यासारख्या गोष्टींशी जुळवून घेण्यात तिचे सुरुवातीचे काही महिने गेले. छत्री उघडणे, वेगवेगळ्या जाडीच्या पेनांनी लिहिणे आणि बुटांची लेस बांधणे यासारख्या अनेक गोष्टी ती पुन्हा शिकली. या काळात तिला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. नंतर परीक्षेसाठी लेखनिक घ्यायलाही तिने नकार दिला आणि स्वतःच पेपर लिहिले. दरम्यान करोनाकाळात पुण्याच्या सीओईपीने आयोजित केलेल्या टेड टॉक्समध्येही ती सहभागी झाली.

हेही वाचा – मुस्लीम रिक्षाचालकाने रस्ता बदलला आणि…

समांतरपणे आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्याची तयारीही सुरू होती. तिचा सीजीपीए स्कोअर ९.७४ होता आणि बंगळूरुमधील एका स्टार्टअपसाठी ती गुंतवणूक विश्लेषक म्हणूनही घरून काम करत होती. ऑनलाइन कोचिंग क्लासच्या मदतीने ती गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट उत्तीर्ण झाली आणि तिने मुलाखतीची तयारी केली. शाळेतील चांगली कामगिरी, कामाचा अनुभव आणि कॅटचे गुण यामुळे तिला आयआयएम-कलकत्ता येथे प्रवेश मिळाला.

केस विंचरल्यानंतर त्याला रबरबँड लावण्यासारख्या साध्या गोष्टी श्रेयासाठी सोपे राहिलेल्या नाहीत. पण रबरबँड लावता आला नाही तरी हेअरबँड लावता येतो हे तिला माहीत आहे. इंजिनियर होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले असले तरी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नक्कीच उत्तम कामगिरी करता येईल याची तिला खात्री आहे!

Story img Loader