प्रियदर्शिनी मुळ्ये

लग्न हा ते करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न ठरल्यावर आणि ते झाल्यावर पती-पत्नी उभयतांच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. पण स्त्रियांच्या दृष्टीने पाहिलं, तर हा विशेष भावनिक गुंतागुंतीचा काळ असतो. आपल्या भावी जोडीदारासोबत भविष्याची स्वप्ने पाहताना, एकमेकांच्या आवडीनिवडी, असं सर्व काही जाणून घेताना, आर्थिक  बाबींवर बोलणे मात्र थोडे राहूनच जाते!

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…

लग्नानंतर स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर तिच्या ‘आर्थिक आयुष्यात’सुद्धा जे बदल घडतात, त्यासाठी हल्लीच्या मुलीनी कोणता दृष्टीकोन बाळगावा आणि त्यासाठी काय करता येईल हे या लेखात पाहू या-

१. आर्थिक बाबींविषयी मोकळेपणे संवाद साधा –

एकमेकांना जाणून घेताना एकमेकांच्या आर्थिक बाबीही मोकळेपणाने बोला. मासिक उत्पन्न, केलेल्या गुंतवणुकी, घेतलेली कर्जे, मालमत्ता, इत्यादींविषयी खरेपणाने व्यक्त व्हा. तुम्हाला लग्नानंतरच्या एकंदरीत आर्थिक स्थितीचा त्यातून अंदाज येईल. अनेक स्त्रिया लग्नानंतर केवळ आपले माहेरच नव्हे, तर आपले गाव सोडून, प्रसंगी नोकरीही सोडून नवऱ्याच्या घरी जात असतात. त्यांच्यासाठी आणि एकूण सर्वच स्त्रियांसाठी हा आर्थिक अंदाज घेणे भविष्यातल्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

२. जोडीदाराची पैशांविषयीची मानसिकता जाणून घ्या –

आपले उत्पन्न कितीही असले, तरी आपले आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणुकीवर आपले विचार, मते, यांचा प्रभाव असतो. तुमच्या जोडीदाराची खर्च करण्याची पद्धत, राहणीमान, आर्थिक जबाबदारी उचलण्याची मानसिकता आणि तयारी, आर्थिक नियोजनाविषयी मत, तुमच्याकडून त्याला असलेल्या आर्थिक अपेक्षा, हे सर्व मोकळेपणाने जाणून घ्या.

३. लग्नानंतरच्या आर्थिक जबाबदाऱ्या समजून घ्या –

लग्न म्हटलं, की जबाबदारी आलीच! आजकाल मुली कमावत्या आहेत, त्या स्वतंत्र व्यवहार करतात, आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावतात. लग्नानंतरसुद्धा अशा काही जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागणार असतील, तर त्याबद्दल जोडीदारकडे आधीच व्यक्त व्हा. तुमच्या जोडीदाराच्या आर्थिक जबाबदाऱ्या काय आहेत, ते जाणून घ्या. त्या सगळ्या तुम्ही दोघं मिळून कशा पेलू शकणार आहात याचा तुम्हाला अंदाज येईल. यातून तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

४. भविष्यातील ध्येय निश्चित करा –

भविष्याची स्वप्ने पाहताना हळूहळू तुम्हाला तुमची ध्येय उमगत जातील. ती मिळवण्यासाठी तुम्ही आपसूकच पावलं उचलाल. पण त्यासाठी ध्येयनिश्चिती महत्त्वाची आहे. जोडीदाराबरोबर त्याबद्दल चर्चा महत्त्वाची आहे.

५. आर्थिक व्यवहाराचे तपशील व नोंदी ठेवा –

आता तुम्ही या कामाचा कंटाळा करत असाल, तरी लग्न ठरल्यावर मात्र हळूहळू तुम्ही तुमच्या आर्थिक बाबींच्या नोंदी व तपशील ठेवायला लागा. त्याची तुम्हाला हळूहळू सवय लागेल आणि मग एक टप्प्यावर त्याबद्दलचा कंटाळा नाहीसा होऊन तुम्ही सवयीने ते करू लागाल. या नोंदीकरणाचा फायदा असा असतो, की त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला आर्थिक निर्णय घेणे सोपे जाईल.

या तपशील व नोंदींमध्ये तुम्ही पुढील बाबी समावेश करू शकता –

दैनंदिन खर्च,चालू गुंतवणुकी, वारस आणि त्याचे तपशील, विमा पॉलिसी आणि त्याचे तपशील, घेतलेली कर्जे, त्यांचे हफ्ते, तुमच्या बँक मॅनेजर, सीए, कामाच्या ठिकाणची महत्त्वाची माणसे, इत्यादी लोकांचे संपर्क क्रमांक, तुमचे बँक आणि गुंतवणूक संदर्भातले लॉगिन आयडी आणि पासवर्ड इत्यादी.

लग्नामुळे वैयक्तिक आयुष्याबरोबरच आर्थिक आयुष्यालाही आकार येत असतो. आर्थिक बाबींवर जोडीदारांत संवाद आणि नियोजन योग्य असेल तर भविष्य आनंदी होते.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

priya199@gmail.com