सुरेश वांदिले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूटऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि बीटस पिलानी सारख्या देशातील नामवंत आणि दर्जेदार अभियांत्रिकी शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये मुलींची प्रवेश संख्या समाधानकारक नाही. याचं महत्वाच कारण या संस्थांच्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थिनींची कामगिरी ही समाधानकारक होत नाही. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत सवंर्गातील विद्यार्थिनींना या अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक आणि दर्जेदार प्रशिक्षण किंवा शिकवणी उपलब्ध होत नाही.

या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि शालेय अभ्यासक्रमाचं अध्ययन यामध्ये मोठी दरी आहे, असं लक्षात आलं आहे. या दोन्ही समस्यांचा मोठा फटका विद्यार्थिनींना बसत आलाय. त्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आली. या समस्या सुटल्या तर मुलांसमेवतच हुशार आणि प्रज्ञावंत मुलीही राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपला महत्वाचा सहभाग देऊ शकतील, असा विश्वास केंद्र सरकारला वाटतो.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने (केंद्रिय शिक्षण मंत्रालय) ही शिष्यवृत्ती दिली जाते.

आणखी वाचा – मुलींनो, परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असेल तर…

लाभाचे स्वरुप

देशातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारी करणाऱ्या ११ वीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मुलींसाठी या योजनेंतर्गत सहाय्य केलं जातं. या शिष्यवृत्तीअंतर्गत दोन वर्षासाठी मोफत ऑनलाइन आणि ऑफलाइन शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं.

अटी आणि शर्ती

(१) या मुलींनी शासनमान्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये अथवा सीबीएसईच्या शाळेत प्रवेश घेतलेला असावा. (२) या शिष्यवृत्तीसाठीची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते, तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शहरातील प्रशिक्षण वर्गसुध्दा लक्षात घेतला जातो. (३) या विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र किंवा  भौतिकशास्त्र/ जीवशास्त्र /रसायनशास्त्र या विषय घटकांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. (४) त्यांना दहावीमध्ये सरासरीने किमान ७० टक्के आणि गणित आणि विज्ञान या विषयात किमान ८० टक्के गुण मिळायला हवेत. (५) या योजनेचा लाभ केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या विद्यार्थिनीनांच दिला जातो. (६) या शिष्यवृत्तीसाठी निवड करताना पुढील प्रमाणे आरक्षण सुविधा दिली जाते-नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग- २७ टक्के, अनुसूचित जाती संवर्ग- १५ टक्के, अनुसचित जमाती संवर्ग- ७.५ टक्के, दिव्यांग- प्रत्येक श्रेणीत ३ टक्के. (७) सर्व संबंधित मुलींच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाखांपेक्षा कमी असावं.

संपर्क

(१) ransformingindia.mygov.in/scheme/udaan-cbse-scholarship-program, (२) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन शिक्षण संस्था, १७ रेसकोर्स अव्हेन्यू, नवी दिल्ली-११०००२, दूरध्वनी-०११-२३२१४७३७, (३) सचिव, सीबीएसई, शिक्षा केंद्र, २ कम्युनिटी सेंटर, प्रीत विहार, दिल्ली- ११००९२, दूरध्वनी- ०११-२२५२६७४५, फॅक्स- २२४५९७३५, ईमेल-scholarship.cbse@nic.in