Gitika Talukdar First Women Sports Photographer : पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची धूम सुरू झाली आहे. विविध खेळातील निपुण खेळाडू या क्रिडोत्सवात त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. परंतु, ही स्पर्धा केवळ खेळाडूंपुरती मर्यादित नसते. अनेक कलाप्रकारातील कलाकारांनाही या स्पर्धांमध्ये त्यांच्या कलेची चुणूक दाखवण्याची संधी मिळते. त्यापैकी एक म्हणजे फोटोग्राफर. स्पोर्ट्स फोटोग्राफर म्हणून अनेक फोटोग्राफर उदयाला येतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी फार कठीण असतं. परंतु, हा कठीण पल्ला गीतिका तालुकदार या फोटोग्राफर तरुणीने लिलया पार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या काही महिला क्रीडा छायाचित्रकारांमध्ये आता तिचं नाव अभिमानाने घेतलं जातं. डेक्कन हेर्लडने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गीतिका तालुकदारने (Gitika Talukdar) २००६ पासून स्पोर्ट्स फोटोग्राफीला सुरुवात केली. ती मुळची गुवाहाटीची असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (IOC) कडून मान्यता मिळालेली ती एकमेव आणि पहिली महिला छायाचित्रकार आहे. अनेक अडथळे असताना, कोणताही गॉडफादर पाठीशी नसताना मी मोठा पल्ला गाठू शकले. IOC मध्ये मला मान्यता दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असं गितीका म्हणाली.
हेही वाचा >> Olympics 2024: महिला प्रशिक्षकांचा टक्का कमी का?
क्रीडा पत्रकार म्हणून गीतिकाने (Gitika Talukdar) करिअरला सुरुवात केली होती. “मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात गुवाहाटी येथील २००६ च्या राष्ट्रीय खेळांमधून केली. चार फिफा विश्वचषक, आयपीएल, आयएसएल आणि आयसीसी सामने, तसंच विविध एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय लीग सामने कव्हर करण्याची संधी मला मिळाली आहे. करोनाच्या काळात आयोजित केलेल्या टोकियो ऑलिम्पिक खेळही मी कव्हर केले”, असं गीतिका म्हणाली. टोकिओ ऑलिम्पिक कव्हर करणारी ती एकमेव महिला छायाचित्रकार होती. एवढंच नव्हे तर तिला तिच्या उच्च कामगिरीमुळे २०२० मध्ये दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित सोल नॅशनल युनव्हर्सिटीमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी दक्षिण कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाकडून शिष्यवृत्तीही मिळाली होती.
“आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत असू तर चमत्कार नक्की घडतात”, यावर गीतिकाचा विश्वास आहे. मला माझं क्षेत्र आवडतं, मी जेव्हा केव्हा कार्यरत असते तेव्हा मी खऱ्या अर्थाने आनंदी असते, असंही ती (Gitika Talukdar) म्हणाली.
गीतिका तालुकदार स्पोर्ट्स फोटोग्राफीबद्दल काय म्हणाली?
महिलांसाठी फोटो जर्नलिमझम हे एक कठीण काम आहे. कारण या क्षेत्रात संधी आणि वेतन यात प्रचंड तफावत असते. यामुळे कदाचित नकरात्मकता येऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारकडूनही अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात ही एक सकारात्मक बाब आहे. यामुळे खेळाडू तर तयार होतातच, शिवाय क्रीडा पत्रकार आणि क्रीडा फोटोग्राफरही तयार होतात”, असं गीतिका (Gitika Talukdar) म्हणाली.
हेही वाचा >> Mototanya : रशियातील सर्वांत सुंदर बाईक रायडरचं अपघाती निधन, मोटोब्लॉगर म्हणून तात्याना ओझोलिना कशी उदयाला आली?
स्पोर्ट्स फोटोग्राफीसह उत्तम गायकही
ती उत्तम स्पोर्ट्स फोटोग्राफर असली तरीही तिला स्वयंपाक बनवायला खूप आवडतं. ती तिच्या फावल्या वेळेत स्वयंपाक बनवते. शिवाय तिला गाण्याची आवड आहे. तिने अनेक गाणी तयार केली असून सवड काढून ती गाणी सुद्धा गाते. तसंच, ती चित्रपट शौकिन असल्याचंही तिने म्हटलं आहे.
पत्रकारिता आणि फोटोग्राफीबरोबरच गीतिका क्रीडा प्रशासक म्हणूनही काम करते. तिने मुलींसाठी क्रीडा शिक्षण प्रकल्प तयार केला असून तो लवकरच आसाममध्ये सुरू होणार आहे. खेळांमुळे मुलांचं आयुष्य बदलू शकतं, यावर माझा विश्वास आहे, असं ती म्हणाली.