आपण निरनिराळ्या कारणांसाठी चिकटपट्टी वापरत असतो. कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या, पुठ्ठ्याचे बॉक्स चिकटपट्टीनं चिकटवणं फार सोईचं जातं. पण आता चक्क कपडे चिकटवणारी चिकटपट्टीही वापरली जाऊ लागली आहे. विशेष हे, की तिचा वापर फॅशन डिझायनर्सपुरता मर्यादित राहिला नसून तुमच्या-आमच्यासारख्या ‘चतुरा’ही आपल्या पर्समध्येच ही चिकटपट्टी घेऊन वावरत आहेत!

ही अगदी सेलोटेपसारखीच दिसणारी पारदर्शक चिकटपट्टी असते. फक्त ही कापड चिकटवायला वापरतात. याला म्हणतात ‘बॉडी अॅण्ड क्लोदिंग टेप’ किंवा ‘फॅशन टेप’. पातळ आणि ‘डबल साइडेड’- म्हणजे दोन्ही बाजूंनी चिकटणारी ही टेप त्वचेवर लावली तरी त्रास होत नाही, असा उत्पादकांचा दावा असतो. नुसती कपड्यांना चिकटणारी ‘फॅब्रिक टेप’सुद्धा मिळते.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

आणखी वाचा : वाळलेल्या फुलांचा चिवडा… नव्हे, ‘पॉ-पुरी’ !

कधीकधी शर्ट, टॉप, फ्रन्ट ओपन ड्रेस असे कपडे घातल्यावर त्याच्या दोन बटणांच्या मध्ये थोडीशी फट राहते. घालणारी व्यक्ती थोडी जाड असेल, तर ही समस्या अधिक येते.

अशा वेळी स्त्रियांना त्या फटीतून ब्रा, कॅमिसोल किंवा पोट दिसेल याची काळजी वाटते. ही फट लपवायला अनेक जणी साधी सेफ्टीपिन लावतात, पण सेफ्टीपिन लावली आहे हे कपड्याच्या वरूनसुद्धा दिसून येतं. अशा वेळी कपड्याच्या आतल्या आणि बाहेरच्या फ्लॅपवर बॉडी-क्लोदिंग टेप लावून फट दिसेनाशी करता येते. चिकटपट्टी डबल साइडेड असल्यानं वरून तिथे काही चिकटवलंय असं मुळीच लक्षात येत नाही.

या चिकटपट्टीचा आणखी एक मोठा उपयोग आहे. अनेक स्त्रियांना खोल गळ्याचे कपडे घालायला आवडतात किंवा नवीन फॅशनच्या अनेक कपड्यांना गळा किंवा पाठीवर ‘कट आऊट डीटेल्स’ असतात. असे कपडे कितीही आवडले, तरी खोल गळा जरा आजूबाजूला हलला किंवा कशासाठी खाली वाकावं लागलं, तर काय, अशी धास्ती स्त्रियांना असते. किंवा कित्येकदा तुम्ही जर छातीच्या वर- गळ्याच्या भागात रोडावलेल्या असाल, तर खोल गळ्याचे कपडे अशा स्त्रियांना नीट बसत नाहीत, कपड्याचा गळा उगाच ‘फ्लोटिंग’ राहातो. अशा वेळी कपड्याचा फ्लोटिंग भाग आतमध्ये बॉडी टेप लावून थेट त्वचेला चिकटवतात. म्हणजे कपडे त्यांच्या जागेवर राहातात. फॅशनच्या नावानं फॅशनसुद्धा होते आणि ‘अनकम्फर्टेबल’ वाटत नाही. सिंगल स्ट्रॅपचे ड्रेस घालताना या टेपचा खूपच उपयोग होतो. कोणत्याही प्रकारचं ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ होऊ नये हाच यातला हेतू.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : प्राजक्ता माळी म्हणते, “‘तू फक्त लढ’ म्हणणारा आश्वासक मेन्टॉर महत्त्वाचा”

इथे आपण फक्त कपडे शरीरावरून हलू नयेत याची काळजी घेणाऱ्या बॉडी-क्लोदिंग टेपविषयी बोलतोय. पण ‘बॉडी टेप’/ ‘बूब टेप’ या नावांनी आणखी एक वेगळ्या प्रकारची टेप बाजारात मिळते. ती सहसा ‘सिंगल साइडेड’- एकाच बाजूने चिकटणारी, ताणल्या जाणाऱ्या बॅण्डेजसारखी, रुंद असते. फॅशन शोज् मध्ये, फॅशन फोटो शूट्समध्ये किंवा मोठमोठ्या सार्वजनिक समारंभांमध्येही मॉडेल्स आणि सेलिब्रिटी स्त्रिया अगदी पोटापर्यंत स्लिट असलेल्या गळ्यांचे गाऊन घालतात. खूपसे नव्या फॅशनचे कपडे चित्रविचित्र आकारांचे आणि ज्याच्या आत कोणत्याही प्रकारची ब्रा- अगदी ‘स्ट्रॅपलेस’ही घालणं शक्यच नसतं, असे असतात. या कपड्यांमध्ये ब्रा नसतानाही स्तनांना ‘सपोर्ट’ मिळावा आणि त्याचवेळी ‘क्लीव्हेज’सुद्धा ‘एनहान्स’ करून दाखवता यावं, असा या बूब टेपचा उद्देश असतो. पण तो एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे! टेप थेट त्वचेवर किंवा स्तनांच्या आजूबाजूनं लावताना ती नेमकी कशी/ किती घट्ट चिकटवावी, थेट त्वचेवर ती किती वेळ ठेवावी, त्वचेवरून टेप काढावी कशी, हे एक शास्त्र आहे. नीट माहिती करून न घेता ही टेप वापरल्यास चुकीच्या पद्धतीनं टेप चिकटून किंवा ती काढताना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात काय, तर आपण उत्सुकतेनं फॅशन मॅगझिन्स वाचतो, नवीन तऱ्हेचे अनेक कपडे पाहाताना, हे घालून ती बिचारी मॉडेल रॅम्पवॉक तरी करू शकेल का, की तिथेच काहीतरी ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ घडेल किंवा उघड्यावाघड्या कपड्यांच्या आत ब्रा न घालता या स्त्रिया इतक्या चिंतामुक्त होऊन कशा वावरू शकतात, अशी शंका सामान्यांच्या मनात उत्पन्न होत असते. पण आपल्याला वरवर छान, नीटनेटक्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींच्या मागे अशी ‘गिमिक्स’ लपलेली असतात, हे आलं ना आता लक्षात!

Story img Loader