डॉ. शारदा महांडुळे

व भाकरी असा जेवणाचा बेत घरोघरी केला जातो. मराठीत ‘मसूर’, संस्कृतमध्ये ‘मसूरिका’ किंवा ‘मसुरा’, इंग्रजीत ‘लेन्टिल’, तर शास्त्रीय भाषेत ‘लेन्स एस्कुलेंटम’ (Lens Esculentum) या नावाने ओळखली जाणारे मसूर ‘पॅपिलिओनसी’ या कुळातील आहे. मसुराची साल काळसर तपकिरी रंगाची असते. सालासह मसुराची उसळ बनविली जाते, तर त्याची साल काढल्यानंतर केसरी डाळीपासून आमटी किंवा फोडणीचे वरण बनविले जाते. हे दोन्ही अन्नपदार्थ अतिशय पौष्टिक असून, आरोग्य चांगले राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : मसूर मधुर, किंचित कषाय असून, ग्राही गुणधर्माचे आहे. ते शीतल, लघु असून कफ, पित्त दूर करणारे आहे.

आधुनिक शास्त्रानुसार मसूरमध्ये इतर कडधान्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने असतात. त्याचबरोबर पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, कॅरोटिन, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पौष्टिक घटक असतात. या सर्व घटक द्रव्यांमुळे मसूर उत्तेजक व शक्तिवर्धक असते. त्यामध्ये असणाऱ्या ‘ई’ जीवनसत्त्वामुळे ते लवकर पचते.

हेही वाचा >>> भांडण बाप-मुलाचं… शिक्षा आईला का?

उपयोग :

१) मसूरची उसळ, डाळीची आमटी किंवा वरण असे दोन्ही प्रकार प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात केले जातात.

२) एक वाटी मोड आलेले मसूर + दोन वाट्या तांदूळ घ्यावे व त्याला कोथिंबीर, हळद, धणे, जिरे, मोहरी, गायीचे तूप, तिखट यांची फोडणी देऊन भात शिजवावा. हा भात गरम असताना खाल्ल्यास उत्साह निर्माण होतो. तसेच वृद्ध, लहान बालके यांना पचावयास हलका असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते.

३) मसूर सारक गुणधर्माचे असल्याने ज्यांना बद्धकोष्ठता, मलावरोध यांचा त्रास होतो. त्यांनी अख्ख्या मसुराचे टोमॅटो घालून सूप बनवावे. या सूपला जिरे व गायीच्या तुपाची फोडणी द्यावी. हे सूप गरम असतानाच प्यायले असता आतड्यांची हालचाल वाढून त्यातील मल पुढे ढकलला जातो व शौचास साफ होते.

४) मसुराचे पीठ हे सौंदर्यवर्धक असल्याने ते पीठ चाळून त्यात दुधाची साय व हळद घालून शरीराला लावल्यास त्वचेवरील लव नाहीशी होऊन काळवंडलेली त्वचा कांतियुक्त होते.

हेही वाचा >>> गच्चीवरची बाग : भिंतीवरील हरित बाग

५) मसूरडाळीच्या पिठामध्ये लसूण, तिखट, हळद घालून धिरडे बनवावे. धिरडे नाश्त्यामध्ये सर्वांनी खावे. हे अतिशय पौष्टिक असल्यामुळे गरोदर माता, स्तनदा माता, शाळेत जाणारी मुले व घरातील वृद्ध मंडळी यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी याचा उपयोग होतो.

६) जर एखाद्यास उलटीचा त्रास होत असेल, तर त्याला भाजलेल्या मसूरडाळीच्या पिठामध्ये डाळिंबाचा रस कालवून प्यायला दिल्यास उलटी थांबते.

७) मसूरपासून तयार केलेला मसूरपाक शक्तिवर्धक व पौष्टिक असतो. मसूरपाक शीत, हलका, रक्तपित्त व कफ दूर करणारा असून, शरीरात थंडावा निर्माण करतो.

सावधानता :

मसुरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने ज्या रुग्णांचे युरिक ॲसिड वाढलेले आहे, त्यांनी मसूर खाणे टाळावे. तसेच मसुरातील युरिक ॲसिड शिजवताना कमी होते. त्यामुळे सहसा शिजवूनच त्याचा आहारात वापर करावा. एकावेळी मसूर अति प्रमाणात खाल्ल्यास अपचन उद्भवू शकते, म्हणून आहारात त्याचा प्रमाणातच वापर करावा.