डॉ. मेधा ओक
मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्थूलता, पोटाचा वाढलेला घेर, इन्सुलिनला प्रतिकूलता व शरीरात वाढलेली चरबीची पातळी… हा रोग समुच्चय बरेचदा एकाच माणसात सापडतो. याची कारणे बरीचशी सारखीच आहेत आणि हे आजार एकमेकांशी निगडित आहेत. एकदा आपल्याला काय आजार आहे ते कळले की तो नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे असते. बरेच वेळा हे आजार काहीच लक्षणे दाखवत नाहीत आणि चोरपावलांनी शरीरात शिरतात म्हणून त्याला सायलेंट डिसिज असे म्हणतो. लक्षणे नसल्यामुळे दुर्लक्ष होणे साहजिकच आहे, म्हणून वर्षातून एकदा चाचणी करणे खूप गरजेचे ठरते.

आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

मधुमेहाला पोषक परिस्थिती निर्माण करणारी कारणे…
आनुवंशिकता, स्थूलता, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, स्वादुपिंडाच्या व्याधी, स्टिरॉइड्ससारखी औषधे, पाश्चात्त्य जीवनशैली, वाढलेला पोटाचा घेर या गोष्टी मधुमेहाला आमंत्रण देणारी स्थिती निर्माण करू शकतात. वयोवृद्ध, पुरुष, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया, अति महत्त्वाकांक्षा व अत्यंत धावपळीचे जीवन असलेल्या व्यक्तींनी जास्त सजग राहणे आवश्यक आहे. यातल्या काही घटकांत आपण बदल करू शकत नाही, पण जीवनशैलीत, आहारात, वजनात व व्यायामात नक्कीच चांगले बदल करू शकतो.

आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!

मधुमेहाची काही लक्षणे
वजन झपाट्याने कमी होणे, खूप तहान व भूक लागणे, वारंवार लघवीला होणे, अतिशय थकवा जाणवणे, सतत इन्फेक्शन होणे, जखम लवकर बरी न होणे, दृष्टीदोष, धुरकट दिसणे, वारंवार गर्भपात होणे, क्षयरोग होणे, मानसिक ताण किंवा नैराश्य येणे…
कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी सगळ्या चाचण्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. उपाशीपोटी व जेवणानंतर दोन तासाने, तसेच सरासरी साखर चाचणी जरूर करावी. उपाशीपोटी साखर १२६ mg/dl च्या आत व जेवणानंतर १८०च्या आत असणे खूप गरजेचे आहे. मधुमेह नसलेल्या माणसाची साखर उपाशीपोटी १००च्या आत व जेवणानंतर दोन तासांनी १४०च्या आत असते.जर सुरुवातीलाच योग्य आहार, व्यायाम व झोप घेतल्यास औषधाची मात्रा खूप कमी लागते. निदान झाल्यापासून पहिली पाच वर्षे जास्त काळजी घेऊन मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास उत्तम. दुष्परिणाम टाळता येतात किंवा खूप काळानंतर थोडेसे दुष्परिणाम दिसतात.

आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?

व्यायाम हवा
आहारातील चमचमीत पदार्थ, हॉटेलमधील जेवण, ‘रेडी टू इट’ पदार्थ, ‘क्विक बाईट’ यांसारख्या सवयी आपण निश्चितच बदलू शकतो. स्वयंपाकघरातील यंत्रे वाढल्यामुळे बटण दाबले की कामे होतात, त्यामुळे तिथेही कष्ट कमी झाले आहेत. प्रवासात जाणारा वेळ, शालेय अभ्यास वाढल्यामुळे व जागेच्या अभावामुळे व वाढणाऱ्या वाहनांच्या व माणसांच्या गर्दीमुळे चालणे, फिरणे व मैदानी खेळ बंद झाले आहेत. दुचाकी वाहन, गाडी असल्यास माणूस चालणे विसरेल की काय अशीच भीती वाटते! शारीरिक व्यायाम कमी झाला की अर्थातच वजन वाढते व पोटाचा घेरही वाढतो. मद्यपान व धूम्रपान यामध्ये भरच घालतात.

आणखी वाचा : हिवाळ्यासाठी तंतूमय पदार्थ आवश्यक

आहार
आहारतज्ज्ञाला भेटून जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात आणि सांगितलेला सल्ला आचरणात आणावा. भात, बटाटा, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, फळांचा रस, आइस्क्रीम आदी पदार्थ कमी खावेत. वेळेवर जेवावे, व्यवस्थित पाणी प्यावे, मधुमेहींना आहारात वर्ज्य करण्यासारखे काहीही नसते. पण ‘काय खाऊ’पेक्षा ‘किती प्रमाणात खाऊ’ हे महत्त्वाचे. टोकाचे कुठलेच प्रयोग खूप काळ यशस्वी ठरत नाहीत म्हणून दीर्घकाळ पाळता येतील असेच चांगले बदल करावे. मधुमेही किंवा हृदयविकार असलेल्यांसाठी वेगळे जेवण करायची गरज नाही. खरंतर पूर्ण कुटुंबानेच योग्य आहार घ्यावा. रुचकर पण कमी उष्मांक असलेला, कमी तेल वापरून केलेला आहार घेण्याची घरातील तरुण अथवा लहान मुलांनाही सवय लागल्यास अधिक फायदा होईल.

आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?

व्यायाम महत्त्वाचा
रुग्णाला तर गरजच असते, पण तरुणांनी किंवा मुलांनीही व्यायाम केला तर नवीन पिढीत आजाराचे प्रमाण कमी होईल, स्थूलता कमी होईल. ३० ते ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम सर्वात उत्तम. इतर आजार नसल्यास सूर्यनमस्कार, योगासने, सायकल चालवणे, पोहणे, धावणे, टेनिस, बॅडमिंटन असे खेळणे हे उत्तम. सुती सैल कपडे व व्यवस्थित बूट घालून ३० ते ४० मिनिटे मोकळ्या मैदानावर वा रस्त्यावर फिरून येणे चांगले.
नुसता आहार नियंत्रण व व्यायाम पुरेसा नसल्यास डॉक्टर मधुमेहासाठी, रक्तदाबासाठी औषधे देतील. तीही वेळेवर घेणे खूप महत्त्वाचे आहे. चाचणी करून डॉक्टरांना परत भेटून फेरबदल लक्षात घ्यावेत. अचानक औषधे बंद करू नयेत. गरज असल्यास इन्सुलिन दिले तर तेही घ्यावे. स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या विश्रांतीसाठी इन्सुलिन इंजेक्शन गरजेचे असते. तसेच कधी कधी शस्त्रक्रिया, गर्भारपण, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू अशी स्थिती असल्यास इन्सुलिन जास्त चांगले काम करते. बरेच वेळा इन्सुलिन तात्पुरते असते.

oakmedha51@gmail.com

Story img Loader