उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. प्राचीन काळापासून भारतामध्ये ही वनस्पती आहे व तिचा आहाराबरोबरच औषधातदेखील समावेश केला आहे. ही मिरटेसी या कुळातील वनस्पती आहे.

आणखी वाचा : मासिक पाळीत ‘लीकेज’ची चिंता वाटते? मग हे वाचाच!

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

औषधी गुणधर्म

जांभूळ हे दीपक, पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे. तसेच कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. जांभळाच्या बियांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध: पोटची मुलगी परक्याचं धन कसं?

उपयोग

  • जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो त्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वाचेच आरोग्य चांगले राहण्यासाठी व जांभळाच्या औषधी गुणांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच याचा आवर्जून आस्वाद घ्यावा. जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.
  • पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे. जांभूळ हे दीपक, पाचक असल्याने न पचलेले अन्न पचण्यास मदत होते.
  • यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७-८ जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे उकळवावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात ३-४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.

आणखी वाचा : आहारवेद : शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी फणस

  • गर्भाशयाच्या बीजकेशांना सूज आल्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व निर्माण होते. अशा वेळी हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जांभूळ बी १०० ग्रॅम, मंजिष्ठा ५० ग्रॅम, कारले बी ५० ग्रॅम, अशोका चूर्ण ५० ग्रॅम व सारिवा ५० ग्रॅम या सर्वाचे चूर्ण एकत्र करून सकाळी १ चमचा व रात्री १ चमचा घ्यावे. यामुळे बीजांडकोषाची सूज (पीसीओडी) हा आजार आटोक्यात येतो.
  • जांभळाचे बी व साल देखील मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी १५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, आवळा ५० ग्रॅम, ५० ग्रॅम मिरे, ५० ग्रॅम कडुलिंबाची पाने व ५० ग्रॅम कारल्याच्या बिया. यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेणे. यामुळे मधुमेह हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.
  • पोटात येणारा मुरडा व अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी १ कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात.
  • स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेतप्रदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभनकार्य करीत असल्याने या आजारावर गुणकारी आहे.

आणखी वाचा : आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ

  • एखाद्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत असेल तर त्या स्त्रीला जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस द्यावा. यामुळे जीवनसत्त्व ई मिळते व त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स निर्मितीला चालना मिळाल्यामुळे व स्तंभनकार्यामुळे गर्भपात रोखला जातो.
  • दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.
  • मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.
  • चरकाचार्यांनी यकृतवृद्धी या आजारावर जांभळे खाण्यास सांगितले आहे. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक आम्ल रसामुळे यकृताचे कार्य व्यवस्थित चालते.
  • गर्भावस्थेत जांभळे भरपूर खावीत वा त्याचे सरबत प्यावे. यामध्ये लोह, कॅल्शिअम, क आणि ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ चांगली होते.

आणखी वाचा : यशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन

  • आम्लपित्त अरुची हे विकार झाले असतील तर जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घेऊ न एकत्र करून एका भांड्यांमध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व ४-५ दिवस उन्हात ठेवावे, त्यानंतर तयार झालेला रस सकाळ- संध्याकाळ दोन चमचे घ्यावा याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

सावधानता
जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत.

sharda.mahandule@gmail.com