-डॉ.लिली जोशी

सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी सरसकट आईबाप ५-६ मुलांना जन्म द्यायचे. घराजवळच्या शाळेत मुलांना घातलं, शिक्षकांवर त्यांची जबाबदारी टाकली, की पालकांचं काम मुलांची माफक असलेली फी भरणे आणि दरवर्षी मूल पुढच्या यत्तेत जातंय की नाही हे बघणे एव्हढंच असायचं.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

जी मुलं मूळचीच बुद्धिमान, चौकस असायची, ती स्वतःची प्रगती स्वतःच करून घेत असत. एखाद्याला खेळाची आवड असेल, चित्रकलेची किंवा अन्य काही करण्याची आवड निर्माण झाली, तर त्यासाठी आवश्यक ती सामग्री आणण्यासाठी आईबापांच्या विनवण्या करायला लागत. शालेय शिक्षण सोडून इतर काही करणं म्हणजे पैशांचा आणि वेळेचा दुरुपयोग अशी समजूत होती. पण आता काळ फार फार बदलला आहे. आताच्या कार्पोरेट जमान्यात आपलं मूल ही अभिमानानं मिरवण्याजोगी मालकीची वस्तू झाली आहे. मूल अभ्यासात तर हुशार पाहिजेच, पण त्यानं शालेय अभ्यासाव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत, नुसत्या केल्या पाहिजेत, नव्हे तर त्यात प्रभुत्व मिळवलं पाहिजे.

आणखी वाचा-सियाचीनमध्ये पहिल्यांदाच लष्कराकडून महिला डॉक्टरची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत कॅप्टन गीतिका कौल

बॅडमिन्टन, टेनिससारखा एखादा ‘चमकदार’ खेळ , गिटार- बैंजोसारखं एखादं ‘ग्लॅमरस’ वाद्य, रशियन किंवा वैदिक गणित, स्पॅनिश -जापानीज सारखी वेगळी भाषा, आंतरशालेय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग असं काहीतरी आपल्या मुलानं करावं, ज्याबद्दल परिचितांमधे बढाई मारता यावी, हे बऱ्याच पालकांचं स्वप्न असतं. केवळ हे यशच नाही तर ‘दिसण्या’मध्येसुद्धा त्या मुलानं बाजी मारायला हवी. रुबाबदार, ‘स्मार्ट लुक्स’ या अर्ध्या कच्च्या वयातही कमावले पाहिजेत. त्यासाठी जिमिंग करून बॉडी कमावली पाहिजे आणि लोकांनी नुसतं बघत राहिलं पाहिजे. आता हे स्वप्न त्यांच्या मुलासाठी असतं, की स्वतःच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मुलांनी पूर्ण कराव्या असा आग्रह त्यामागे असतो हे बघायला हवं. जे पालक विद्यार्थीदशेपासून ‘अचिव्हर्स’ होते, त्यांनी अशी इच्छा बाळगणं समजण्यासारखं आहे. पण ज्यांची स्वतःची शालेय कारकीर्द सर्वसामान्य होती, त्यांनीसुद्धा हा आग्रह धरावा याचं आश्चर्य वाटतं.

अत्यंत बुद्धिमान उच्चशिक्षित पालकांची मुलंही अचिव्हमेंट्सच्या बाबतीत अतिशय सामान्य असतात हे तर बरेचदा पहायला मिळतं. असं का बरं होत असावं ? लहानपणापासून आपल्या आईवडिलांचं असामान्य कर्तृत्व आणि त्यांची अनेक क्षेत्रातली उज्ज्वल कामगिरी यांच्या कहाण्या ऐकतच ही (दुर्दैवी) मुलं मोठी होत असतात. या कामगिरीला शोभून दिसेल, एव्हढंच नाही, तर वरचढ ठरेल असं काहीतरी आपल्याला करून दाखवायचंय, याच्या दडपणाखाली मुलं दबून जातात. त्यांनी कितीही झगडून काही केलं तरी पालकांच्या डोळ्यात ते भरतंच असं नाही. उलट ‘तुझ्या या क्लाससाठी इतकी फी भरली, त्या खेळासाठी तुला स्पेशल ट्रेनिंग ‘लावलं’, आणि तू त्याचं काय केलंस?, हे स्पेशल डिझायनर कपडे, शूज, महागड़ी रॅकेट यासाठीच घेतली का?’हे आणि असंच ऐकावं लागतं. साहजिकच ही मोठ्या यशस्वी माणसांची मुलं न्यूनगंडानी पछाडलेली जाऊन एक प्रभावहीन आयुष्य जगत असलेली दिसतात.

आणखी वाचा-Crime Against Women : “गुन्हे वाढले नाहीत, महिला पुढाकार घेऊन FIR दाखल करत आहेत”

इतर कुटुंबीय, परिचित किंवा समाजसुद्धा एक सर्वसामान्य मूल व्हायचं स्वातंत्र्य त्यांना देत नाही. पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचं मूल जन्माला आलंय, ते तुमची समाजातली प्रतिमा उजळण्यासाठी नाही. त्याला एक आनंदी आणि नॉर्मल जगण्याची संधी देणं हे तुमचं काम आहे. भले त्याची शैक्षणिक प्रगती नाव घेण्याजोगी नसेल, मान्य आहे की आजच्या तीव्र स्पर्धेनं भरलेल्या जगात जिकडे तिकडे चाललेल्या ‘रॅट रेस’ मध्ये तो मागे पडण्याची शक्यता तुम्हाला वाटत आहे, तरीही त्याचं भावविश्व वैफल्यग्रस्त करण्यात तुमचा हातभार नको. त्याला त्याची जागा, त्याचा कोपरा स्वतःलाच सापडू दे. तो अडखळला तर त्याला हात द्या. पण मुख्य म्हणजे तुमचं त्याच्यावरचं प्रेम त्याच्या प्रगतीपुस्तकातल्या आकड्यांवर अवलंबून नाही, हा विश्वास त्याला वाटू देत. घराबाहेरच्या तणावांनी भरलेल्या जगातून घरी आला की त्याला ‘आपली’ जागा सापडल्याचा दिलासा मिळायला हवा. तुम्हाला जर हे जाणवलं की तुमचं मूल अशा प्रकारे कोमेजत चाललंय, तर त्याच्या आनंदाकरता तुम्हीही जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. रात्रीचं एकत्र जेवण, त्यावेळची थट्टा मस्करी, आवडीचा एखादा पदार्थ, झोपेच्या वेळी त्याच्या जवळ थोड़ा वेळ घालवणं, मायेनं कुरवाळणं यांनी खूप फरक पडेल.

drlilyjoshi@gmail.com