डॉ. शारदा महांडुळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येकाच्या घरात भाताबरोबर ज्याचे वरण खाल्ले जाते ती तूरडाळ होय. तिच्या रुचकर चवीमुळे अगदी फोडणी न देता फक्त मीठ, हळद, हिंग टाकून याचे वरण खाल्ले तरी सर्वांना आवडते. अख्ख्या तुरीचे लाल व सफेद असे दोन प्रकार आहेत. संपूर्ण जगात तुरीची लागवड मुख्यत्वे करून जास्त प्रमाणात भारतात होते. त्यात गुजरात आणि दक्षिण भारतात याचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. मराठीमध्ये ‘तूर’, हिंदीमध्ये ‘अरहर’, इंग्रजीमध्ये ‘रेड ग्राम’, संस्कृतमध्ये ‘आधाकी’, तर शास्त्रीय भाषेत ‘कॅजानस कॅजन’ (Cajanus Cajan) या नावाने ओळखली जाणारी तूर ‘लेग्युमिनोसी’ या कुळातील आहे..
औषणी गुणधर्म :
आयुर्वेदानुसार : तूर तूरट, रूक्ष, मधुर, पचण्यास हलकी, तीक्ष्ण व उष्ण असते. ती अग्निप्रदीपक असून पित्तकर आहे. म्हणून पित्तप्रकृतीच्या लोकांनी व आम्लपित्ताची तक्रार असलेल्यांनी हिचे सेवन करणे टाळावे.
आधुनिक शास्त्रानुसार : तुरीमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, स्निग्धता, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे ही सर्व घटकद्रव्ये असतात. उपयोग :
१) सर्व प्रकारच्या कडधान्यांमध्ये तुरीला जास्त महत्त्व आहे. तिच्या चविष्ट गुणामुळे वरण, आमटीसाठी मुगापेक्षा तुरीच्याच डाळीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
२) तूर ही अग्निप्रदीपक, रुचकर, दीपक, पाचक असल्याने ज्यांना भूक लागत नाही. तोंड बेचव झाले असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर अशा वेळी तुरीच्या डाळीपासून केलेले वरण भातासोबत खावे.
३) रोजच पोळी-भाजी खाण्याचा कंटाळा आल्यास तुरीच्या डाळीच्या वरणात गव्हाच्या पिठाची पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्याच्या आकाराचे काप करून ते वरणामध्ये फोडणी देऊन शिजवावे व या गरम गरम चकोल्या गायीचे तूप टाकून खाल्ल्यास रुचकर लागतात व सकस आहार म्हणूनही याची गणना होऊ शकते.
४) अख्ख्या तुरीच्या दाण्यांपासून उसळ बनविली जाते. उसळ व ज्वारीची भाकरी हा कष्टकरी लोकांचा मुख्य आहार म्हणून ग्रामीण भागात अनेक कुटुंबात घेतला जातो. तुरीमध्ये प्रथिने व जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असल्याने कष्टकरीवर्ग, गरोदर व स्तनदा माता व लहान मुले या सर्वांचेच आरोग्य चांगले राहते.
५) तुरीच्या हिरव्या शेंगा सोलून त्यातील हिरव्या दाण्यांची खमंग व रुचकर उसळ केली जाते. ही उसळ पौष्टिक असते.
६) डाळ भिजत घालून त्यात कांदा परतून, कोरडा डाळ-कांदा कधीतरी भाजीमध्ये बदल म्हणून आहारात घेता येऊ शकतो.
७) तुरीच्या डाळीला चिंच, आमसूल, गूळ, लाल मिरची व गरम मसाला घालून सांबार बनविले असता ते रुचकर व चविष्ट होते.
सावधानता :
अशा अनेक प्रकारे आपण तूर किंवा तुरीची डाळ आहारात वापरू शकतो. फक्त ही डाळ पित्तकर असल्याने हिच्यापेक्षा मुगाची डाळ श्रेष्ठ असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. ही डाळ पित्तकर असल्याने तिचा पित्तकर गुण कमी करण्यासाठी वरणाला किंवा आमटीला गायीच्या तुपाची फोडणी द्यावी, याने पित्तशमन होते. तसेच पित्तप्रकृतीच्या व आम्लपित्ताची तक्रार असणाऱ्या व्यक्तींनी ही डाळ खाऊ नये. उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिचा वापर करणे टाळावे.