‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकड्यांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा : आहारवेद: महिलांसाठी उपयुक्त ऊर्जावर्धक पेरू
औषधी गुणधर्म
- करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच, शिवाय आरोग्यासही हितावह आहे. सहसा मोठ्या शहरांमध्ये हा रानमेवा मिळत नसल्यामुळे बरेच जण याच्या स्वादापासून व यातून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांपासून वंचित राहतात.
- रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
- करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
- करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ॲसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
आणखी वाचा : बॅक टू ‘ब्लाऊजलेस’ साडी!
- सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
- करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
- अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
- आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील, तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोड्या-थोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
- करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
- करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोड्या थोड्या अंतराने पीत राहावे.
आणखी वाचा : आहारवेद: स्रियांच्या विकारांमध्ये उपयुक्त आंबा
- करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर करवंद सेवनाने पोट व आतड्यांचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते.
- करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
- करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
- गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.
सावधानता:
ही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत. हा रानमेवा अवश्य खावा असा आहे.
sharda.mahandule@gmail.com