कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी तयार केली जाते. भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषत: दक्षिणेकडील-बंगळुरु, उटी, म्हैसूर, केरळ या राज्यांमध्ये होते. डोंगरउतारावर रांगेत कॉफीच्या वृक्षांची लागवड केली जाते.

आणखी वाचा : नातेसंबंध: नवऱ्याला तुमचं ऐकायला हवंय?

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…

कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्याची पावडर करतात व कॉफी हे पेय तयार करतात. या बिया भाजल्यानंतर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा सुगंध निर्माण होतो. कॉफी या पेयात कॅफिन (१.२ टक्के), टॅनिक ॲसिड (५.८ टक्के), कलॉल या नावाचे तैलद्रव्य असते. या तैलद्रव्यामुळे कॉफीला उत्तम सुगंध येतो. अनेक वेळा चिकोरी नावाचे द्रव्य कॉफीमध्ये मिसळतात. त्यामुळे कॉफीला वेगळा स्वाद निर्माण होतो. बरेच लोक अशी मिश्र स्वरूपाची कॉफी पिणे पसंत करतात. कॉफीच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत. इन्स्टंट कॉफी तयार करताना कुंबाडिया, चिंचोके व कासुंदराच्या बियांचे चूर्ण मिसळतात. काही लोक अभिमानाने सांगतात की, आम्ही चहा पीत नाही फक्त कॉफी पितो. परंतु चहा आणि कॉफीचे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. चहा व कॉफीमध्ये स्वत:चीअशी पोषणमूल्ये जवळपास नाहीतच. त्यामुळे अति कॉफी घेऊ नये.

आणखी वाचा : Jammu Kashmir काश्मीरमधून आणि काश्मीरमध्ये… महिला व मुलांच्या दुहेरी तस्करीचा चिंताजनक ट्रेण्ड

गुणधर्म

हिवाळ्यामध्ये खूप थंडी पडल्यास किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून कधी प्रवास करण्याची वेळ आली, तर थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी क्वचित कधी तरी अर्धा कप कॉफी पिणे ठीक आहे. कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन स्फूर्ती येते. सुस्ती व आळस कमी होऊन मेंदूला चालना मिळते, मज्जासंस्थेला उत्तेजना मिळते.

दुष्परिणाम

अति कॉफीमुळे शरीराला उष्णता प्राप्त होत असली तरी त्यामधील चिवटपणा व कडूपणा याच्या दुष्परिणामामुळे मलावष्टंभ निर्माण होतो, उष्णतेचे विकार जडतात. हातापायांची, डोळ्यांची आग होणे, निद्रानाश, छातीत धडधडणे, पित्ताचे विकार वाढणे, ज्ञानतंतू कमकुवत होणे, वंध्यत्व निर्माण होणे, शुक्रजंतूंची संख्या कमी होणे असे अनेक विकार जडतात. म्हणून उष्ण प्रदेशातील लोकांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये. तसेच इतरांनीही रोजच कॉफी सेवन करू नये.

आणखी वाचा : Fashion ‘मिनी स्कर्ट’ची निर्माती मेरी क्वांट कोण होती?

कॉफी पेय तयार करताना त्यात साखर मिसळतात. त्यामुळे कॉफी शरीरास अजूनच घातक ठरते. कॉफी व साखरेच्या दुष्परिणामामुळे लठ्ठपणा, हृदरोग, अति रक्तदाब, कॅल्शिअम कमतरता असे अनेक विकार जडतात. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे मांसपेशींवर व मज्जातंतूंवर वाईट परिणाम होतात. कॅफिनमुळे आहार कमी प्रमाणात घेतला जातो. त्यामुळे भूक मंदावते. जास्त प्रमाणात, वारंवार कॉफी घेतल्यामुळे लोह आणि कॅल्शिअमचे शरीरामध्ये शोषण होत नाही किंवा ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे ॲनिमिया व हाडांचा ठिसूळपणा हे आजार वाढीस लागतात. कॉफी हे पेय जास्त प्रमाणात उकळले तर त्यातील रसायने ही पेयामध्ये जास्त उतरतात व यामुळे रक्तवाहिन्यांचा संकोच होऊन रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. अशी रसायने काढून टाकलेली इन्स्टंट कॉफी काही कंपन्यांनी बनवली आहे. परंतु ही कॅफिन काढून टाकलेली कॉफी जास्तच हानिकारक ठरते.

कारण कॅफिन काढण्यासाठी जी रासायनिक विद्राव्ये वापरली जातात ती आरोग्यास अधिक अपायकारक ठरतात. त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नये. क्वचित प्रसंगी थंडीपासून रक्षण करण्यासाठी एक बदल म्हणून अर्धा कप कॉफी प्यावी, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढून ताजेपणा वाटेल; पण कॉफीचे रोजच वारंवार जास्त प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थपणा वाढून मानसिक ताण वाढतो. कारण कॅफिन हे एक प्रकारचे विषच आहे, त्यामुळे कॉफीचे दररोज सेवन टाळावे.

पर्यायी पदार्थ

काही लोक चहापेक्षा कॉफी पिणे प्रतिष्ठेचे मानतात. मात्र, हा केवळ एक समज आहे. चहा व कॉफी ही दोन्ही पेये टाळून उत्साह निर्माण होण्यासाठी नैसर्गिक आरोग्यपूर्ण पेय प्यावे.
कृती – ७-८ तुळशीची पाने, ४-५ पुदिना पाने, अर्धा इंच आले, अर्धा चमचा आवळा पावडर, २ चमचे लाल गूळ व दीड कप पाणी हे सर्व मिश्रण एक कप पाणी होईपर्यंत उकळावे व नंतर हे पेय गाळून प्यावे. ही सर्व घटकद्रव्ये नैसर्गिक असल्यामुळे त्यांच्यामधील पोषण मूल्यद्रव्य (अँटीऑक्सिडंट) भरपूर प्रमाणात शरीरास मिळतात व त्यामुळे नक्कीच आरोग्य सुधारते. त्याचबरोबर हळद, ओवा, शतावरी कल्प टाकून दूध पिणे हेही आरोग्यास उत्तम आहे.
sharda.mahandule@gmail.com