कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड ॲपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो. त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंत करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : आहारवेद – गर्भवतींसाठी आणि हाडांसाठी उपयुक्त करवंद

औषधी गुणधर्म

  • कवठामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात.
    उपयोग
  • कवठ हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते.
  • अरुची, मळमळ, उलटी या विकारांवर कवठ सेवनाने रुची निर्माण होऊन ही लक्षणे कमी होतात.
  • कवठ हे स्तंभनकार्य करीत असल्यामुळे जुलाब होत असतील तर कवठ सेवनाने जुलाब कमी होतात.

आणखी वाचा : विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

  • अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो.
  • लहान मुलांना कृत्रिमरीत्या बनवलेल्या जॅमऐवजी कवठाच्या गरात गूळ घालून मिक्सरमधून बारीक करून तयार झालेला जॅम पोळीला आतून लावून रोल करून खाण्यास द्यावे. यामुळे शरीरातील रक्ताचे व कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.
  • कवठाची पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवावी किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवावी. कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर व ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने ती आरोग्यसाठी लाभदायक असतात.

आणखी वाचा : आहारवेद: महिलांसाठी उपयुक्त ऊर्जावर्धक पेरू

  • कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात.
  • कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार आदी विकारांवर उपयुक्त आहे.

सावधानता
कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.
sharda.mahandule@gmail.com